हिंदुत्व

दोन दिवसांपूर्वी त्या याहूवर चाटींग वर एक ‘गे’ भेटला होता. अल्स विचारल्यावर त्याला म्हटलं ‘मी मुलगी नाही रे’. आणि कुठून म्हटलं अस करून टाकल. कसाबसा पिच्छा सोडवून घेतला. नाही तरी आता काय म्हणतात ‘कायदा’ केला आहे त्यांच्यासाठी. परवा आपल्या सर्वोच्य न्यायालयाने असंच आणखीन एक ‘लिव्हींग रिलेशनशिप’ला मान्यता दिली. माझ्या मागील कंपनीत एक ‘लिव्हिंग रिलेशनशिप’वाली होती. आता तीचा तो बॉयफ्रेंडचे हे दुसरे ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ होते आणि तिचा हा पाचवा ‘बॉयफ्रेंड’ कम पहिला ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ पार्टनर होता. चांगल आहे. ऐकल्यावर दोन दिवस काय सुचलंच नाही. पण आता हे सर्रास चालत.

अनेक जण काय त्या ‘कमिटमेंट’ मध्ये असतात. म्हणजे पाच एक वर्षांपासून एकत्र असले की त्यांना ‘कमिटमेंट’ मध्ये आहे म्हणतात, अस ऐकले आहे मी. त्याही पद्धतीच्या माझ्या दोन मैत्रिणींना मी पाहिलं आहे. असो त्यात सुद्धा काय वाईट नाही. प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. निदान शंभर दीडशे जणांसोबत फ्लर्टिंग करण्यापेक्षा हे हजार पटीने चांगल. माझ्या मित्राने त्याचा किस्सा सांगितला होता. हा त्याच्या मैत्रिणीला म्हणाला की ‘तुझा स्वभाव फ्रेंडली आहे.’ त्यावर त्याच्या मैत्रिणीने ‘ज्यांना मागे पुढे कोणी नसते त्यांचा स्वभाव असा असतो’. आता अशा मैत्रिणीचे किमान दीडशे मित्र असतात. आणि ती सगळ्यांसोबत ‘फ्रेंडली’ असते. हे मी स्वतः पहिले आहे, म्हणून बोलायची हिम्मत केली.

पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या पुण्यातील तशाच असतात. म्हणजे अशाही अनेक मुली मी पहिल्या आहेत. एकदा लोकलमध्ये अशाच एका छान मुलीला पहिले होते. आणि प्रेम असणे म्हणजे काही गैर नाही. पण त्या प्रेमाने वाद निर्माण नको व्हायला. म्हणजे ह्या दोघांच्या प्रेमामुळे त्यांच्या दोन कुटुंबात वाद निर्माण झालं तर, किंवा पार प्रसंग हाताबाहेर नको जायला. महिन्यातून एक दोन प्रकार पुण्यात घडतात. दोन कुटुंबात मारामारी, मग पोलीस केस. मग त्याचा त्रास दोघांनाही आणि त्यांच्या आई वडिलांना सहन करावं लागतो. बहुतेक याचा विचार करून सर्वोच्य न्यायालयाने हे असले ‘गे’, ‘लिव्हिंग रिलेशनशिप’ चे निर्णय दिले असावेत.

बघा ना, श्रीरामाच्या वाढदिवसाला ‘लिव्हींग रिलेशनशिप’ ला मान्यता. चांगल गिफ्ट दिल. म्हणजे आमच्या घरात तरी संपूर्ण वातावरण ‘हिंदुत्व’ आहे. म्हणजे वडिलांना धर्मात न बसणाऱ्या गोष्ठी कधी आवडल्या नाही. आई देखील तेवढीच कट्टर. रोज देवपूजा, घरी आलेल्या पाहुण्याला किमान फळे, चहा. जेवणाच्या वेळी आल्यावर जेवण केल्याशिवाय त्याला पाठवत नाही. रोज संध्याकाळी मी, बंधुराज आणि वडील रामरक्षा आणि मारुती स्तोत्र न चुकता म्हणायचो. आता तिघेही तीन ठिकाणे असल्याने एकत्र बसून म्हणत नाही. थोडक्यात, वडिलांनी कधीच त्यांचा आणि आमचा वाढदिवस साजरे केले नाहीत. कारण एकच वाढदिवसाचा खर्च धार्मिक कामात लावायचा. मग त्यातून दरवेळी गणेशोत्सवाला ‘भंडारा’ होतो. पाचशे लोकांचा स्वयंपाक केला जातो. गल्लीतील माझे मित्र मंडळी देखील गणेशोत्सव, हनुमान जयंती साजरी करतात. आईलोग त्यांचे ‘काकड आरती’ वगैरे चालू असतेच.

आता ह्या झालेल्या आणि मान्य केलेल्या कायद्याचे कधी गल्लीतील कार्ट्याने वापरला किंवा कार्टीने लिव्हिंग रिलेशनशिप वगैरे केल तर.. कधी विचार करून मन सुन्न होते. आमची गल्ली म्हणजे एक मोठ्या कुटुंबाप्रमाणे आहे. सगळेच नाराज होतील. कारण, अशा पद्धतीचा विचार माझ्या आई वडील आणि गल्लीतील वडीलधाऱ्या मंडळीकडून कधी झालाच नाही. कोणतीही गोष्ट अशी व्हायला हवी की त्याने त्या त्या कुटुंबात नाराजी निर्माण नको व्हायला. सगळेच आनंदी झाले तर ती गोष्ट करायला हरकत नाही. हिदुत्वबद्दल बोलले तर आमचे आदर्श एकवचनी आणि एक पत्नी होते. रामाचा आदर्श असलेल्या आपल्या देशात आता लव कुश एकत्र सेक्स आणि राम सीतेला लग्न न करता राहायचे अधिकार मिळाले आहेत. पण काही हरकत नाही. आजकाल राम आणि सीता कुठे आहेत? इथला प्रत्येक मुलगा स्वतः रोमिओ आणि मुलगी ज्युलिअन आहे असेच समजते. माझा या गोष्टींना विरोध नाही. पण मन नक्कीच नाराज झालं आहे.

Advertisements

One thought on “हिंदुत्व

  1. हेमंत, अगदी मनातलं बोललात! मलाही अनेकदा अशाच गोष्टींचा त्रास होतो. पण एकूण काय, तर आता सर्वच लोक स्वैरपणे विचार करु लागलेत; असं दिसतय!! जाउद्यात, आपण आपली तत्वं, संस्कार सोडायचे नाहीत. शेवटी ते आपल्या आई-वडिलांकडून आलेले असतात, काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s