गप्पांना विराम

आज मी माझी ऑर्कुट, फेसबुक, हायफाय, जी टाल्क, स्टायल एफ एम, लिंक्ड इन यातील खाती बंद केली. थोडक्यात, गप्पांना विराम दिला. काही दिवसांपासून अस करू का नको याचा विचार करत होता. आज करून टाकल. कंपनी बदलल्या पासून मित्रांचे खुपंच ‘खतरनाक’ अनुभव येत होते. म्हणजे सगळेच एकदम प्रोफेशनल्स सारखे वागत होते. आता आपल्यांना काय म्हणणार? सगळेच मराठी. आपलेच दात आणि आपलीच जीभ. आणि त्यामुळे या नवीन कंपनीत आल्यापासून तसल्या फंदात पडलो नाही. मी कोणाशीही बोलायला गेलो तर त्याचं प्रत्युतर येतंच नसायच. उलट काहींनी मला ब्लॉक केल. असो, अस काही घडेल याची कल्पना नव्हती. बर त्यांचा रिप्लाय का नाही आला म्हणून विचार करण्यात माझा अख्खा दिवस जायचा.

ते बाकीच्याशी खूप गप्पा मारतात. कालच माझ्या मैत्रिणीला फेसबुकवर असंच हाल हवाल विचारले. पण तिचेही काही प्रत्युतर नाही. तीला आधी देखील मी एकदा असंच जी टाल्कमध्ये बोलायला गेलो. त्यावेळी देखील हेच घडल. म्हणजे ती एकच नाही अनेक आहेत. मीच स्वतःहून त्यांना पिंग करतो. पण त्यांना उत्तर द्यायची इच्छा नसते की माझ्यामुळे त्रास होतो देव जाणे. बर जुन्या कंपनीत असतांना मी अस कोणतीच गोष्ट केली नव्हती की ज्याने त्यांनी असे करावे. बर असे एखाद्या वेळेस घडले असते तर मला काहीच नसते वाटले. पण तीन महिन्यांपासून हेच चालल आहे. खूप बेकार वाटत आहे. म्हणजे आपण कोणाशी गप्पा मारायला जाव आणि त्याने काहीही न बोलता सरळ आपल्या कानाखाली वाजवावी. मुळात या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मला हा ‘गप्पा’ विषय बंद करावं लागला.

या कंपनीत आल्यापासून माझ्या जुन्या कंपनीतील सगळ्यांचीच खूप आठवण येते. पण सगळे इतक्या लवकर विसरतील अस वाटलं नव्हत. आता एक साधा फॉर्म १६ मिळायला महिना लागेल अस सांगितलं गेल आहे. असो. आज मुळात काही गप्पा मारायचीच इच्छा नाही. काल माझ्या बहीणाबाईचा फोन आला होता. आणि मी सुद्धा या सगळ्या गोष्टींनी इतका वैतागलो होतो. तिची काहीही चूक नसतांना मी माझा राग तिच्यावर काढला. असो, बहिणाबाई ‘त’ वरून ताकभात ओळखणाऱ्या आहेत. आणि खूप प्रेमळ आहे. तिच्याशी गप्पा मारल्यावर खूप छान वाटले. कोणी तरी आहे असे वाटले. थोडा राग देखील शांत झाला. नवीन कंपनीत आल्यापासून दिवसभर काम करतो आणि रेडिओ ऐकतो. घरी आल्यावर संगणक. विचारच नको यायला. कारण विचार, आठवणी मला येतात. आणि जे काही दुख-आनंद होतो तो देखील मला होतो. त्यांना काहीच वाटत नाही. पण यापुढे अशी घडलेली चूक पुन्हा घडणार नाही. त्यांनी स्वतः आता संपर्क केला तर चांगलंच आहे. पण यापुढे कधीच मी त्यांच्याशी स्वतः कोणत्याही पध्दतीचा संबंध ठेवणार नाही. आणि आठवण देखील. असो, माझ्या गप्पांना आता विराम देतो. बाकी बोलूच.

Advertisements

6 thoughts on “गप्पांना विराम

  1. मला वाटतं की टाळी दोन्ही हाताने वाजते. कंपनी सोडली की संबंध संपले असं सहसा होत नाही. मी तुला एवढं सांगु शकतो की लोकांना तुझ्याशी interaction करायला उत्सुकता वाटत नाही. मी हे का सांगतोय हे पुण्यातल्या एखाद्या वृश्चिक राशीच्या आणि तुला ओळखणार्या फटकळ मुलीला विचार. मुली सहजा भीडभाड ठेवत नाहीत म्हणुन सांगितल.

  2. अरे जाऊदे कशाला फुकाचे टेन्शन घेतोस..अन ते रीप्लाय देत नाहीत याचा राग बिचाऱ्या ओर्कुट व फेसबुक वर कशाला काढायचा…चालायचं म्हणून सोडून द्यायचं…त्रास होतो कारण आपण करून घेतो….

  3. सगळी खाती बंद करण्याच्या किंवा त्यांपासून दूर राहण्याच्या निर्णयाशी एकदम सहमत! कारण अधूनमधून तसं करणं फारच गरजेचं बनतं… आता नक्कीच मनाला मोकळं मोकळं वाटेल…

  4. Hemant,

    tu ajun motha jhala nahis asa dista….ek mhanaje loka aaplyasathi bolat nahit ani tehi ek nahi barech mhanaje kai te samajun ghyala jamat nahi aahe ka??? ani dusara mhanaje mitra maitrini he aadhi karun ghyachya astat re…kamawar hotat tya olakhi…garaj aste ti tya weli bolnyachi aata tu tithe nahis mag ti garaj samapli…tyathi ek don chagle loka bhetu shaktat pan tula tari bhetli nasawit…tar tyamule tu orkut FB band karun kai farak padnar aahe?? mhanaje tula nahi re itaranna….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s