संगणक म्हणजे काय?

काल माझा जिवलग मित्र भेटला होता. असो, नाक दाबल्यावर तोंड उघडते अस म्हणतात ते काही चुकीच नाही. दुपारी जेवणानंतर सहज कामाविषयी विषय निघाला. तो मला माझ्या कामातील एका गोष्टीची माहिती विचारात होता. त्याला तो विषय समजून सांगण्यासाठी त्याला सहज प्रश्न केला की ‘संगणक म्हणजे काय?’. तो म्हणाला ‘म्हणजे?’. त्याला म्हटलं ‘ मला व्याख्या नको सांगू. मला फक्त एवढ सांग की संगणक कशाला म्हणायचं’. तो थोडा वेळ थांबून म्हणाला की ‘टीव्हीची सुधारित आवृत्ती म्हणजे संगणक’. झालं! दोन पाच मिनिटे मला हसूच आवरलं नाही. साहेब पाच वर्षांपासून ‘संगणक’ क्षेत्रात कार्यरत आहेत. आणि साहेबांचा हुद्दा देखील मोठा आहे. पण संगणक म्हणजे नेमक काय याच उत्तर देता आले नाही. मग म्हणाला ‘संगणक म्हणजे मनोरंजनाचे साधन’. मग काय अजून हसू आवरेना.

कस बस हसू आवरत म्हणल, ‘ते सोड, समज मी कधी संगणक पहिलाच नाही. आणि आता मला सांग की संगणक कसा असतो ते’. मग का स्वारी आधीच या प्रश्नाने हैराण झालेली. मला म्हणाला ‘घरी चल संगणक कसा असतो ते दाखवतो’. त्याला बोललो ‘अस नाही उत्तर दे’. मग तो म्हणाला ‘तू सांग, एखाद उदाहरण’. त्याला म्हणालो ‘ टीव्ही जर एखाद्याने पहिला नसेल. आणि त्यांनी मला टीव्ही बद्दल विचाराल तर मी त्याला अस सांगेन, टीव्ही म्हणजे अस खोकं की ज्याच्यात आपण गाणी, मालिका, बातम्या आणि चित्रपट पाहू शकतो’. मग म्हणाला ‘संगणक म्हणजे ज्यात आपण चित्रपट, गाणी बघू शकतो’. झालं त्याला काही नीट उत्तर देता येत नव्हत. मी नगरला दोन करत होतो. त्यावेळी दोघांच्या वेळेत खूप अंतर होते. मग करायचं काय म्हणून मी एका सरकारमान्य इन्स्टिट्यूटमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस’ शिकवायचो. पार्टटाईम असून देखील पगार चांगला मिळायचा. आणि घरी सुद्धा मी नोकरी करतो म्हणून सगळे खुश.

तिथ कोणी नवीन संगणक शिकायला विद्यार्थी आला की मी त्याला सुरवातीला हा प्रश्न विचारायचो. बर येणाऱ्या विद्यार्थ्यात आणि माझ्यात वयात काहीच अंतर नसायचे त्यामुळे मला त्यांना, आणि त्यांना मला कधी असे वेगळे किंवा शिक्षक आणि विद्यार्थी अस काही रहायचेच नाही. दोस्तच बनून जायचे. त्यावेळी देखील संगणक शिकायचे आहे असे बरेच विद्यार्थी असायचे. पण कोणालाच ‘संगणक म्हणजे काय?’ याचे उत्तर येत नसायचे. कारण कोणी या प्रश्नाचा विचारच केलेला नसायचा. जस माझ्या मित्रच झालं. एकदा हा प्रश्न मी माझ्या कोर्सच्या शिक्षिकेला केला होता. प्रश्न विचारल्यावर सगळे मुले मुली हसत बसले. आणि त्यामुळे माझ्या शिक्षिकेला वाटलं मी तिची चेष्टा करत आहे. मग काय, माझ्यावर रागावल्या की असले फालतू प्रश्न विचारात जावू नको म्हणून. असो, माझा मित्र म्हणाला ‘तू सांग, संगणक म्हणजे काय?’. त्याला म्हणालो ‘बघ, संगणक ही अशी मशीन आहे की ज्यात इनपुट टाकल्यावर त्यावर प्रक्रिया होऊन त्याच तुला हवं तस आउटपुट येत’. त्याला काहीच समजलं नाही.

एखादी माहिती हवी छापील स्वरुपात हवी आहे. आपण संगणकावर बसून कीबोर्डच्या सहाय्याने माहिती लिहितो, तयार करतो. आणि ती माहिती प्रिंटरच्या साह्याने छापील स्वरुपात बाहेर काढतो. उदाहरण खुपंच शुल्लक दिल. पण नवीन असणाऱ्याला तुम्ही संगणकातील घटक, त्याची प्रक्रिया किंवा सोफ्टवेअर बद्दल सांगायला गेले तर त्याच्या सगळेच डोक्यावरतून जाते. असो,  त्याला वेग वेगळी उदाहरणे दिल्यावर त्याला पटले. पण प्रश्न खूप साधा आहे. आणि आपण अनेक पद्धतीने याचे उत्तरही देवू शकतो. फक्त प्रश्न असा आहे की, या लहान लहान गोष्टी दुर्लक्षित केल्यावर कधी कुणी विचारल्या तर गफलत होते. बाकी काल जाम मजा आली.

Advertisements

10 thoughts on “संगणक म्हणजे काय?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s