भीमरूपी महारुद्रा

ही इसवी १५२८ मधील गोष्ट आहे. मीर बाकी नावाचा एक बाबर राजाच्या सरदाराने अयोध्या जिंकली. पराभवानंतर अयोध्येत हाहाकार माजला. दिसेल त्याला मीर बाकी मारत सुटला. त्यावेळी अयोध्येत कोणताही कुष्ठरोगी एक वर्ष राहिला तर त्याचा कुष्ठरोग नाहीसा होतो असा लौकिक होता. शरयू नदीच्या काठाचा आणि राम मंदिराचा तर बोलबाला तर साऱ्या देशभर होता. त्यामुळेच आपल्या नावाची एखादी वास्तू असावी अशी बाबराची इच्छा होती. मीर बाकीने, अयोध्येतील राम मंदिर उध्दवस्त केले. आणि तिथे एक भव्य मशीद बांधायचा घाट घातला. अयोध्येतील लोकांचा विरोध न जुमानता मशीद बांधायचेच असा निश्चयाच त्याने केला होता. त्याच्या लष्करी ताकद पुढे कोणाचे काय चालणार होते? मंदिर उद्ध्वस्त झाल्यावर त्याच मंदिराच्या पायावर मशीद उभी करायचा निर्णय त्याने घेतला. झालं! कामासाठी मजूर लोक आले. कामाला सुरवात झाली.

पहिल्या दिवसअखेर एक मोठी भिंत बांधून झाली. संध्याकाळी सर्व मजूर काम संपवून घरी गेले. मीर बाकीने आपल्या राजाला हा गोड संदेश देखील पोहचवला. राजा देखील आनंदी झाला. दुसऱ्या दिवशी पुढील कामाची सुरवात करण्यासाठी मजूर लोक मंदिराच्या जागेवर येऊन त्यांना धक्काच बसला. आदल्या दिवशी बांधलेली भिंत पडलेली. मीर बाकीला हे वृत्त कळताच त्याची पायाची आग मस्तकात गेली. त्याने एक भला मोठा पहारा बांधकामाभोवती ठेवण्याचा आदेश दिला. मजुरांनी पडलेली भिंत पुन्हा बांधली. सायंकाळी मजूर आपले काम संपवून घरी गेले. पहारा वर्तुळाकार बांधकामाच्या रीतीने उभा केला होता. रात्र झाली. सकाळी बघतात तर पुन्हा भिंत पडलेली.

मग मात्र मीर बाकी स्वतः आला. हा अयोधेतील लोकांचा प्रताप आहे  असा विचार करून अयोधेतील लोकांना मारझोड सुरु केली. आणि पुन्हा दुप्पट पहारा बसवून कामाला सुरवात केली. पण व्यर्थच. रोज कामाला सुरवात व्हायची. संध्याकाळपर्यंत झालेल्या कामावर सैन्य नजर ठेवायचे. रात्र झाली की का कोणास ठाऊक मध्यरात्री अचानक सैन्याला डुलकी लागायची. सकाळी बघितलं तर बांधकामाची नासधूस झालेली. बाबर राजा देखील या गोष्टीमुळे हैराण झाला. महिना उलटून गेला तरी बांधकाम पुढे सरकतच नव्हते. या रोजच्या होणाऱ्या गोष्टींमुळे मजूर आणि सैन्यात भूतप्रेताच्या अफवा उडू लागल्या. कोणी म्हणायचे मंदिर पाडल्याचा हा दैवी प्रकोप आहे. कोणी म्हणायचे मारले गेलेल्या लोकांची भुते बनली आणि ते सर्व बांधकाम पाडत आहेत. या सर्व गोष्टींमुळे मीर बाकी भांबावून गेला. याआधी असा प्रकार त्याने कधीच अनुभवला नव्हता. राजाला देखील काही कळत नव्हते.

मग त्याने काशीतील काही पंडितांना याबद्दल विचारले. पण राजा आपल्या धर्माचा नाही. म्हणून तेही काही वदेना. त्यांना धमकावण्याचे प्रकार करून देखील काही फरक पडेना. शेवटी पैशाच्या लोभाने काही पंडित सांगायला तयार झाले. राजदरबारात त्यांना बोलावण्यात आले. पंडितांनी राजाला सांगितले की, तुम्ही ज्या रामाचे मंदिर उद्ध्वस्त केले आहे. त्याचा एक भक्त हे सगळी कृत्य करीत आहे. सुरवातीला सर्वांनाच हा प्रकार आश्चर्यदायक होता. असा कोण भक्त आहे की जो कुणालाच दिसत नाही. पण बांधकाम पडतो आहे. राजालाही खरे वाटेना. मग त्याने विचारले की, एका रात्रीत तो एवढे बांधकाम कसे पाडतो? त्यावर त्याला असे कळले की तो खूप बलशाली आहे. रात्री येऊन एका लाथेत सर्व बांधकामाची वाट लावतो. मग अजून थोडी माहिती काढल्यावर राजाला समजले की तो भक्त एक ‘वानर’ आहे. आणि त्या वानराचे नाव आहे ‘हनुमान’.

मग राजाने अजून बंदोबस्तात वाढ केली. आणि कामाला पुन्हा नव्याने सुरवात केली. पण तरीही तेच. बांधकाम पुढे होतंच नव्हत. शेवटी पुन्हा पैसे देवून पंडितांना विचारल गेल की यावर उपाय सुचवा. त्यावर त्या काशीच्या पंडितांनी बांधकामाची ‘पूजा’ करा. राजा हे ऐकून हैराण झाला. पण त्याला दुसरा काही पर्याय नव्हता. आणि मग त्यावेळी इतिहासात प्रथम मशिदीच्या बांधकामाची यथायोग्य पूजा करण्यात आली. बांधकामाच्या सुरवातीला उर्दूत ‘सीता कुंज’ अशी एक भली मोठी पाटी बसवण्यात आली. सीता कुंज म्हणजे सीतेच घर. आणि मग बांधकामाला सुरुवात झाली. मातेच घर म्हणाल्यावर त्या ‘भीमरूपी महारुद्र’ हनुमानाचा राग शांत झाला. आज त्या चिरंजीव हनुमानाची जयंती.

Advertisements

7 thoughts on “भीमरूपी महारुद्रा

 1. तुझे ट्विट्स वाचुन जाम करमणुक होत असते. येडछाप असतात पण मजा येते. तु अधेमधे खरंच चांगल लिहित असतोस. स्पेशली तुझे काल्पनिक प्रसंग रचुन वर्तमान प्रसंग रचण्याचे कसब चांगले आहे. पण दुसर्याच दिवशी काहीतरी बावळट छाप लिहुन सगळ क्रेडिट घालवुन टाकतोस. तु अजुन मोठा झाला नाहीयेस हेच खरं. आणि मला तरी अजुन नाही कळाल की इतक सगळ पर्सनल ब्लॊगवर लिहिण्याची काय गरज आहे? I mean कोणीही तुझा पगार सांगु शकेल,तुझं आणि तुझ्या घरच सगळ काही सगळ्या जगाला माहिती होतय. बघ तुझी मर्जी, चांगल्या भावनेने सांगतोय. हे असल काहीतरी रोज लिहिण्याचा रतीब घालण्यापेक्षा काही दिवस थांबुन बघ काय करतोयस ते. उद्या लग्न झाल तरी तुझी बायको तुला काय म्हणते हे ब्लॊगवर लिहित बसशील. अशा माणसाशी कोण लग्न करेल ज्याला कुठे काय बोलाव हे पण कळत नाही. प्रतिक्रिया लांबली आहे पण तुझ्या भल्यासाठीच आहे.

 2. ज्यांनी हनुमानाची उपासना केली आणि काही विशेष अनुभव घेतले त्या कंपूत आम्हीही हजर आहोत त्यामुळे ह्या कथेचे सूक्ष्म आम्ही जाणतो आणि ते सत्य असणार ह्याची आम्हांस खात्री आहे…

  बाकी सच तो श्री हनुमानजी ही जानत है।

 3. स्वतःला माणूस म्हणवून घेताना माणसाने स्वतःशी प्रथम प्रामाणिक रहायला हवे…
  तसे केल्यास आपल्याला उत्तम जोडीदार मिळेल ह्यात शंका नाही…
  कधितरी मी स्वतः असाच एक हेमंत होतो असे म्हणू शकेन परंतु म्हणत नाही अशासाठी की ती कदाचित अतिशयोक्ती ठरू शकते (माझ्या चांगुलपणाची…)
  माझ्या मित्रांनीही मला असाच घडवायचा प्रयत्न केला पण अजूनही ते किंवा मी थकलो नाही… 🙂
  प्रयत्नांति परमेश्वर!

 4. सॊरभच्या प्रतिक्रियेबाबत बोलायचं झालं तर…

  मला वाटतं हेमंत तू अगदी मनापासून लिहितोस आणि म्हणूनच तुझं लिहिलेलं मला आवडतं. हममऽ ब्लॉग किती पर्सनल करायचा!? हे मात्र तुलाच ठरवायचं आहे.

  मलाही तू लिहित आहेस तसंच! अगदी मनोसोक्त लिहायची खूप ईच्छा होती. मग त्यात अगदी पर्सनल गोष्टीही आल्याच… पण त्यानंतर अगदीच पर्सनल लिहिण्यापेक्षा जरा हातचं राखून लिहावं असं मला वाटलं… पण त्यात ‘लिहिण्याचं’ खरं समाधान नक्कीच मिळणार नव्हतं! …म्हणून मग माझं माझ्या पर्सनल ब्लॉगकडं दूर्लक्ष होत गेलं…

  यातून सुरेख मधला मार्ग काढला आहे तो ‘संवादिनीने’ – http://samvaadini.blogspot.com/. म्हणजे बघ! सारं काही पर्सनल लिहायचं… अगदी मनसोक्त लिहायचं! पण काळ, स्थळ आणि नावं बदलून. आणि हा ब्लॉग सुरु करण्याआधीच तुही टोपण नाव घेतलं असतंस तर बरं झालं असतंस…

  पण शेवटी आवर्जून हे सांगावंसं वाटतं की, पर्सनल ब्लॉग हा इतर ब्लॉगपेक्षा अधिक जवळचा वाटतो. आणि तू आज ज्या पद्धतीने लिहित आहेस, तसं लिहिणं सोडून दिलंस… तर नक्कीच मला वाईट वाटेल… पण शेवटी हा माझा छोटासा स्वार्थच म्हणावा लागेल… त्यामुळे बाकी तू तुला जो योग्य वाटेल तो निर्णय घे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s