विंडोजच्या आईचा घो

आई कोणाला नाही माहित? बाबा विंडोज आणि आई हे तर सगळ्यांनाच माहिती आहेत. संगणक नावाच्या घरात दोघेही सुखाने राहतात. दोघांचा ‘बग’ नावाचा लाडका मुलगा. असा ‘आम्ही दोघे आमचा एक’ संसार. कुठल्या संगणक घरात राहत नाहीत ते सांगा. तिघे मिळून घरमालकाचे चांगलेच ‘वेलकम’ करीत असतात. जगातील सर्वात मोठ्या ‘मायक्रोसॉफ्ट’ बिल्डरच्या इमारतीत राहणारे कुटुंब. बाबा विंडोज रोज आपल काम फारच संथ गतीने सुरु करतात. त्यांचा बिझनेसचा लोगो ‘डंबरु’ आहे. आणि त्यांची ‘नॉट रिस्पोंडिंग’ ही टॅग लाईन. Continue reading

Advertisements

पाणी पाणी रे

चार दिवसांपूर्वी हीच वेळ पिंपरी-चिंचवडवर आली होती. दोन दिवस पाणीच आल नव्हत. आणि आजकाल दिवसातून चार तास वीज देखील नसते. काल म्हणे ‘जागतिक जल दिन’ होता. माझ्या गावी तीन दिवसाआड ‘जल तास’ असतो. पंधरा वर्षांपासूनचा हा चाललेला ‘जल’ तास.  आता पुण्यातही ‘जल’ तास होईल की काय भीती वाटते आहे. नेहमीचंच आहे म्हणा. या विषयात नाविन्य अस काही नाही. आता वर्तमानपत्र, मिडिया वाले. आपल्या जुने रेकोर्ड पुन्हा लावतील. आणि आमचे ‘दादा’ त्याच त्याच रटाळ सूचना करतील. पण शेवटी व्हायचं तेच होईल. त्यामुळे आत्ताच आपली काही तरी सोय बघितलेली बरी. उद्या पाणी नाही आल तर निदान अंघोळ बुडायला नको. अशी काही तरी सोय लावली म्हणजे झालं. Continue reading

राशी आणि स्वभाव

माणसावरून राशी स्वभाव की राशीवरून माणसाचा स्वभाव हा प्रश्न असा आहे, की अंडे आधी की कोंबडी. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला होता. तेव्हापासून त्याला पाहतो आहे. त्याचा स्वभाव अगदीच रुष्ट. म्हणजे एकदा काय झालं, क्लासमध्ये तो एका स्टुलावर बसून संगणकावर काम करत होता. आमच्या शिक्षिकेने त्याला बघून म्हणाल्या की खुर्ची घेऊन बस. तीन तास त्या स्टुलावर बसून तुझी पाठ दुखेल. पण हा काय ऐकतोय. तिने ह्याला प्रेमात, रागात सगळ्या भाषेत त्याला सांगून बघितलं. पण त्याने नाही म्हणजे नाहीच. शेवटी ती शिक्षिका वैतागून निघून गेली. आमचा मस्त टाईमपास झाला. पण त्याचा स्वभाव अजूनही असाच आहे. माझी इथली लहान बहिण. एकदा तिला माझ्या काकूने घर झाडायला सांगितलं. ती झाडून घेणार नाही म्हणाली. झालं काकूने रागावून देखील काय फायदा झाला नाही. म्हणजे माझी बहिण अशीच आहे. दोघांची म्हणजे त्या माझ्या मित्राची आणि माझ्या लहान बहिणीची ‘धनु’रास आहे. Continue reading

रेशनकार्ड मिळाल

शेवटी आठ महिन्यानंतर पांढऱ्या रंगाच ‘केशरी’ रेशनकार्ड मिळाल. मागील वर्षी आठ मे मध्ये फॉर्म भरला होता. काल जेव्हा ते मिळाल, त्यावेळी खरंच मला पुत्रप्राप्ती एवढा आनंद झाला. पाच एक मिनिटे काय करावं सुचलंच नाही. आईला ताबडतोब फोन सांगितलं. तिला विश्वास बसेना. या आनंदात पुढची ठरलेली काम सोडून तडक घरी आलो. अस घडेल याची आशा मी सोडून दिलेली होती. काय करणार, कोगलाईमध्ये इतकं घडतं आहे. सुरवातीला तो फॉर्म भरला. तिथल्या कर्मचाऱ्याने तो व्यवस्थित तपासाला. आणि वीस रुपये घेऊन तो जमा करून घेतला. मग अजून एका महिला कर्मचारीने तो फॉर्म आणि जोडलेली कागदपत्रे तपासली. आणि मला पंधरा जूननंतर चौकशी करा म्हणून सांगितले. Continue reading

पुणेकरांचा संपर्क

काय बोलाव कळत नाही आहे. पुणेकर सगळे अगदी सारखेच कसे काय? माझा काका. माझ्या घरापासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो. पण मागील एका वर्षात मोजून तीनदा घरी आला. बर, फोन नावाचा काही प्रकारच नाही. कधीच स्वत:हून फोन करत नाही. आणि मी मुर्खासारखा दर शनिवार – रविवार पायपीट करत जातो. अधून मधून फोन मीच करायचा. माझी एक बहिण तिथेच रहाते. एका वर्षात दोनदा माझ्या घरी आली आहे. काय बोलाव. तीच ही तेच कधीच फोन करत नाही. कधीही बघा. मोबाईलमध्ये पैसेच नाही. अजून माझ्या दोन बहिणी, आमच्या बहिणाबाई चिंचवडमध्ये राहतात. त्या चाफेकर चौकापासून माझ घर दोन किमी अंतरावर आहे. बर त्या दोघींकडे गाड्या आहेत. दोघींकडे महिन्यातून एक माझीच चक्कर होते. त्या कधीच माझ्या घरी येत नाही. Continue reading

मुलगी पाहिजे

याहूची पुणे लोकल चाटींग रूममध्ये तीन दिवसांपासून जातो आहे. जाम मजा येते. दोन दिवसांपूर्वी ते याहू मेसेंजर संगणकावर टाकल. आणि लॉगीन केल. ती रूम उघडली आणि झालं की सुरु. कोणीही यायचं आणि ‘अल्स प्लीझ’ नाही तर डायरेक्ट ‘एम २४ पुणे’. काय मूर्खांचा बाजार असतो. हसून हसून पोट दुखायची पाळी येते. सगळीच मुले. ह्यांचे आयडी ‘लव फोरेव्हर’, ‘यु आर लकी बिकॉझ आय क्लीक्ड यु’, ‘इंडिगो चाईल्ड ५’. काय आयडी आहेत. आणि सगळ्यांची ध्येय हेच ‘मुलगी’. बर चुकून आयडी वरून समजली की ही मुलगी आहे की झालंच. सगळे एखादया लांडग्यासारखे तीच्या मागे लागतात. मग शेवटी ती पाच एक मिनिटांतच आपला गाशा गुंडाळते. Continue reading

जप

ही आई पण ना. वडिलांनी मला एका मंत्राचा जप करायला सांगितला आहे. या डिसेंबरपर्यंत. आता रोज रात्री मी तो करतो. पण आमच्या आईसाहेबांना कितीही केला तरी कमीच वाटतो. आधी रोज जप एक माळ करायचो. म्हणजे १०८ वेळा. तर आईसाहेबांना कमी वाटायचा. आता रोजच्या पाच माळा जप केला तरी आई साहेबांना कमीच. दहा माळा करत जा असा सल्ला दिला. एक तर मी त्या दोघांच्या समाधानासाठी हे सगळ करतो. आणि करतो ते राहिलं बाजूला. ह्याचं आपल कमी कमी होत आहे. माझे आई वडील, दोघांचा देवावर खूप विश्वास. काय बोलणार. आणि माझा त्या दोघांवर विश्वास. म्हणून जप चालला आहे. आता अडीच वर्ष ‘ती’ चा जप करून काही झालं नाही. तर आता ज्या देवाला कधी पहिलच नाही. त्याचा जप करून काय होणार आहे? देव जाणे. Continue reading