हो की नाही

काय सुचेनास झालं आहे. वडिलांचा सकाळी फोन आला होता. मला त्यांनी ‘पुण्यातील त्या स्थळाबद्दल तुझा काय निर्णय आहे’ अस विचारलं. वडिलांना संध्याकाळी फोन करून सांगतो म्हणून म्हटलं. सकाळपासून खूप विचार केला पण हो म्हणू की नाही म्हणू अस झालं आहे. कारण त्या स्थळाने पाहण्याच्या कार्यक्रमानंतर ‘हो’ म्हणून सांगितले. मग पंधरा दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. त्यानंतर पुन्हा काय झाले कुणास ठाऊक, महिना उलटल्यानंतर पुन्हा ‘हो’ झाले. परत आठ दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. आणि आता दोन महिन्यानंतर त्या स्थळाचा ‘बोलणी करायला कधी येता’ असा फोन आला. त्यांना वडिलांनी आता नक्की ‘हो’ आहे का अस विचारल्यावर ते म्हणाले आता आमचा निर्णय झाला आहे. मग वडिलांनी मी मुलाशी बोलून तुम्हाला कळवतो म्हणून त्यांना सांगितले. आता काय निर्णय घ्यावा? Continue reading

Advertisements

बँकांची लफडी

सकाळी मित्राचा फोन आला. फोन उचलला तर तो बोलला ‘अरे, आजही बँकेचे काम झाले नाही’. असो, मी फ़क़्त हसलो. कारण आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची बँकांना सुट्टी आहे हे मला माहित होत. त्याच्या सांगण्यावरून मी त्याच्या जळगावच्या नातेवाईकाच्या खात्यात पैसे ऑनलाईन जमा केले. त्याला त्याच्या नातेवाईकाच्या मदतीला दोन तासात पैसे पाठवायचे होते पण ते करायला तीन दिवस लागले. दोन दिवस त्याने दोन तीन बँकेच्या पाच एक शाखांचे उंबरठे झिजवले होते तरी त्याचे काम झाले नाही. आज सुट्टी बघून तो जाम चिडला होता. Continue reading

भयकथा

भूत असते की नाही माहित नाही. पण भूतावर अनेक दंतकथा आहेत. या चिंचवडमध्ये पूर्वी चिंचेची आणि वडाची खूप झाडे होती. पवना नदीच्या दुसऱ्या बाजूला बाजूला, म्हणजे थेरगावमध्ये एका चिंचेच्या रात्री भुते असतात. असे लोक म्हणायचे. त्यावेळी एल्प्रो कंपनीची सेकंडशिप चार ते रात्री बारावाजेपर्यंत असायची. एकदा काही कामगार सेकंडशिप करून कंपनीतून सुटल्यावर अशाच गप्पा मारत सायकलीवर घरी जात असतांना एका नवीन कामगाराला इतर कामगारांनी त्या चिंचेच्या झाडाजवळ भूत असल्याची गोष्ट सांगितली. त्याने या सगळया खोट्या गोष्टी असतात, भूत वगैरे नसतात. असे त्या बाकीच्या कामगारांना म्हटले. त्यावर त्या कामगारांनी ‘मग हिम्मत असेल तर त्या झाडापाशी रात्रीच्या वेळी जाऊन दाखव’ अशी अट घातली. त्या नवीन कामगाराने देखील ताबडतोप ताबडतोप ती अट स्वीकारली. Continue reading

मन भटकंती

काल कंपनीच्या बसमधून कंपनीत जात असतांना एक मुलगी माझ्याकडे बघत होती. असो, आधी मी तिच्याकडे बघायचो. काल चक्क ती माझ्याकडे बघत होती. तसे आम्ही रोज एकमेकांकडे बघतो. पण कधीच बोलत वगैरे नाही. तिच्याही घरी माझ्याप्रमाणे तीच्या लग्नाची बोलणी वगैरे चालू आहे. आता हे कळायला मला फारसे श्रम करावे लागले नाहीत. परवा मी, माझी मैत्रीण संध्याकाळी फिरायला गेलो होतो. काही तरी खावे म्हणून ‘बर्गर’ घेतला. मी खात असतांना सहज लक्ष गेल तर एक छानशी मुलगी माझ्याकडे एकटक नजरेने बघत होती. बहुतेक तिचेही मन माझ्याप्रमाणे भटकत असावे. थोड्या वेळाने आमच्या दोघांच्या बाजूला ती आणि तिचा तो येऊन कच्ची दाबेली खात होते. तर तो माझ्या मैत्रिणीकडे बघत होता. बहुतेक त्या दोघांचेही मन अजून जुळलेली नाहीत. Continue reading

माऊवादी

आम्ही माऊवादी, सरकार उगाचंच आमच्याविरुद्ध शस्त्राचा वापर करीत आहे. बघा ना! आम्ही लाल वस्त्रे घालून, अरे असा काही विचार करू नका. आम्ही ओशोवाणी ऐकून तसले काही उद्योग करीत नाही. आम्ही फक्त क्रांती करतो. हो! खोट वाटत का? दांतेवाड्यात आम्ही काय ७६ सैनिकांना मारलं. आमच्या लॉर्ड माऊ ने हे अस केल म्हणजे क्रांती झाली अस म्हटलं आहे. कोण माऊ? काहीतरीच काय विचारता. गिनीज बुक कधी तरी चाळा. सर्वात जास्त बायका करणारा हाच तो नरश्रेष्ठ. नुसत्याच केल्या नाहीत तर नंतर त्यांना मारून टाकले. बघा! नाहीतर तो तुमचा श्रीराम. आत्ताच दोन दिवसांपूर्वी ते लिंबूसरबतंम् येऊन गेले. आम्हाला लाल कपड्यात बघितल्यावर, ते लिंबूसरबतंम् लूंगी सोडण्याची भाषा करायला लागले. Continue reading

मोबाईल

सकाळी मोबाईलची रिंग वाजली. आजकाल रिंग वाजली तरच सुट्टीच्या दिवशी जाग येते. नाहीतर सूर्यदेव डोक्यावर आल्यावर माझी पहाट होते. आवरून बँकेच्या कामासाठी बँकेत गेलो. तिथे दारातच एक भीमरूपी फोनवर बोलत उभा. कसाबसा बँकेत शिरलो. चेक भरण्याची स्लीप भरत असतांना एकजण फोनवर अकाऊंट नंबर घेत होता. बर, पैसे जमा करायचे एका बँकेत आणि हा पठ्या आला दुसऱ्या बँकेत. बर झालं स्लीप भरल्यावर निदान मला विचारलं. नाहीतर चेक ड्रॉपबॉक्स टाकल्यावर विचारले असते तर जाम पंचाईत झाली असते. काय हुशार लोक असतात. Continue reading

मी कोण?

परवा आमच्या चिंचवडमधील एका मुलीवर झालेल्या बलात्काराची बातमी वाचली. आता तर खुपंच बेकार वाटत आहे. हिंजवडीच्या घटनेनंतर मुळात मन उदास झालं आहे. त्यात ह्या घटनेने अजूनच मन गोंधळून गेल आहे. सगळी आपली माणस. जिच्यावर तो प्रकार घडला ती आणि तीच्या आई वडिल काय परिस्थितीत असतील. असा विचार मनात सारखा येतो. आणि मग आपणच याला जबाबदार आहोत असे वाटते. त्या ‘भोसले’ला ‘चौरंगे’ करावं अस सारखं मनात येत आहे. फार फार काय होईल? पण निदान समाज चिडू शकतो ही तर कळेल. असो, जर सरकारने त्याचा ‘चौरंगे’ केला नाही आणि मोकळा सोडला तर मी देखील ‘चाफेकर’ बंधूंच्या शहरात राहतो हे नक्की दाखवून देईल. रामाच्या, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या आणि गप्प बसायचं, हे कोणी सांगितलं? रक्त खवळते, मन जागरण गोंधळ घालते. डोके प्रतीहल्याच्या योजना बनवते. मग अजून किती वेळ ‘निर्जीव’ असल्याचे नाटक करायचे. माझ्या शहरातील मुलींवर कोणीही कधीही आपली हौस भागवायची. आणि सगळ्यांनीच बघ्याची भूमिका घ्यायची. Continue reading