वडिलांची जागा

आज वडिलांच्या रोजच्या बसण्याच्या जागी बसून बोलत आहे. असो, ही माझी पहिलीच वेळ आहे. काय करणार गावी नेटला रेंजच्या खूप अडचणी आहेत. आता घराबाहेर रेंज मिळते. आणि घरात फक्त पहिल्या खोलीत. वडील ज्या ठिकाणी बसून त्यांची रोजची काम करीत असतात. त्याजागी आणि त्यांच्याकडे बघण्याची हिम्मत झाली नव्हती. आज प्रसंगच तसा आहे. आणि आई वडील पहिल्याच खोलीत झोपतात. दुसरीकडे बसलो तर माझे पाय त्यांच्या तोंडाच्या दिशेने येतात. म्हणून आज हिम्मत केली आहे. म्हणजे ते अस कधीच जागेवर बसायचं अस म्हणाले नाही. पण या जागेचा दराराच एवढा की, अंगात विजेचा संचार होतो आहे. बोलायचं खूप काही आहे. पण बोटे मनाच्या ताब्यातच राहत नाही आहे. या ओळी लिहायलाच मला दहा पंधरावेळा खाडाखोड करावी लागली. आणि त्यामुळे मनात देखील खुपंच काहूर माजलं आहे.

याच जागेसमोर उभा राहून मी त्यांची अनेक कामे ऐकली आहे. आणि बोलणे देखील खाल्लेले आहे. खरं बोलायचं झालं तर, आमच्या घररूपी देशाचे हे सर्वोच्य न्यायालय आहे. या न्यायासनावर घराचे नव्हे तर आमच्या कुटुंबाचे निर्णय घडतं असतात. माझी या ठिकाणी बसायची पात्रता कुठल्याच अंगाने नाही. मी खूप लवकर पघळतो. माझा स्वभाव खूप अतिरेकी आहे. पण वडिलांचा स्वभाव खूप शांत, विचारी आणि वेळ पडल्यावर कठोर आहे. मी कठोर होतो पण कधी ज्यावेळी खरंच कोणाचा खूप जास्त राग येतो. पण त्या रागात लवचिकता नाही. मी मग शांतच होत नाही. म्हणजे एकदा शाळेत असतांना शुल्लक कारणावरून माझ्या मित्राशी बाचाबाची झाली. मग तो राग शांत व्हायला आठ वर्ष लागली. आत्ताचेच ‘मुर्ख आयटीवाला’ हा शब्द अजूनही डोक जाम सरकवत.

त्यावेळी ब्लॉगवर यायचंच नाही इतका संताप अनावर झाला होता. वडील इथं बसून घेत असणारे निर्णय आणि त्यांची वागणूक याची मी माझ्याशी तुलना करतो आहे. माझे वडील त्यांच्याशी झालेल्या गोष्टी किंवा इतरही कोणता प्रसंग असा सांगत नाही. याउलट माझे हे नक्की. म्हणजे परवाचीच आलेली प्रतिक्रिया अगदी सूचक होती. पण ही पण गोष्ट खरी आहे की मी फ़क़्त ‘मी’ यावरच केंद्रित असतो. माझ्या या अशा बोलण्याने इतरांना कधीच गोत्यात आणलं नाही. किंवा त्यांची गुपित कधीच उघडी केली नाही. माझ्या विषयी जे मला वाटत तेच मी बोलतो. थोडक्यात मी आधी ‘फळ’ काय मिळेल याचा विचार करतो आणि मग ‘कर्म’.

ही जागा अशी आहे ना! की इथं बसून मी माझ स्वरूप, स्वभाव आणि माझी बोलण्याची भाषा यात कुठेही मृदुता आणता येत नाही आहे. जसे देवघरासमोर आपण खोटे बोलण्याची हिम्मत होत नाही. मनात खूप काही आहे. पण बोलण्याला आज रुष्टतेची झालर लागत आहे. प्रत्येकाच्याच घरात अशी एक जागा नक्की असते. ज्या ठिकाणी आपण आपला स्वभाव अगदी जशाच्या तसा होतो. त्यावर आपण आपल्या बुद्धिमत्तेची मृदू कडा आणि लाघीव बोलण्याची गोडी लावू शकत नाही. हा विषय तर मनातही आला नव्हता. पण या जागेचाच प्रभाव म्हणावा लागेल की मी माझेच विश्लेषण करीत आहे. घरातील दारा समोरची जागा. एक साधी चटई, त्यावर एक चादर आणि त्यावर एक मुलायम वस्त्र. मागे एक टेकायला वडिलांनीच घरी बनवलेली पांढऱ्या खोळीची लोड कम उशी. ज्यावर मी आता संगणक ठेवला आहे ते एक जुन्या पध्दतीचे वह्या ठेवायचे कपाट, त्यावर पत्त्यांची डायरीचा बॉक्स. आणि माझ्या उजव्या बाजूला काही पुस्तकांनी भरलेले दोन पाट. मन फारच उदास होत आहे. आत्ता मी इथंच थांबतो. बाकी बोलूच.

Advertisements

2 thoughts on “वडिलांची जागा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s