जात

ते म्हणतात ना, जी जात नाही ती ‘जात’. खर आहे. काल पहाटे, (म्हणजे सुट्टीच्या दिवशी माझी पहाट दुपारी बाराच्या पुढे होते) जनगणनेसाठी एक बाई आल्या. माहिती घेत असतांना माझी ‘जात’ विचारली. ‘जात’ सांगितल्यावर बाईंचा चेहरा आणि वागण्यात सुद्धा बदल जाणवला. थोडं बेकार वाटलं मला. अजूनही ‘जातीपाती’ लोक पाळतात. शिक्षक लोक असे ‘जातीवंत’ झाले तर भविष्य अवघडचं आहे. जातीजातींमध्ये अजूनही तेढ आहेत. वरवर दिसून येत नाही पण आतून ‘लाव्हा’ खदखदतो आहे. असो, जनगणना आणि जात यावर मी काय बोलणार? बाळासाहेब जे बोलले तेच माझ मत आहे. Continue reading

वाहिनी साहेब

काय बोलाव आता? हे मित्र लोक ना, सगळे मित्र इकडून तिकडून सारखेच. परवा ‘परी’ सोबत गप्पा मारून कंपनीत आलो. नाश्ता करावं म्हणून मित्रांसोबत कॅन्टीन मध्ये आलो. काय सांगू किती खुश होतो. परी सुद्धा तीच्या टीममेट सोबत नाश्ता करायला आली होती. मी माझ्या मित्रांना ती दाखवली तर, माझा एक मित्र तिला ओळखत होता. मग काय, साहेब आधीच तिच्यावर फिदा. फारच काकुळतीला आला होता तिच्यासाठी. हो नाही करत शेवटी मलाच माघार घ्यावी. ती आणि तो एकाचं फ्लोरवर बसतात. आणि त्याला ती मनापासून आवडते. असो, मला कुणाच्या चित्रपटात ‘खलनायक’ चा रोल मुळीच करायचा नाही. Continue reading

परी

परवा जयंतीच्या दिवशी उशिरा उठायचा विक्रम केला. प्रयत्न करून देखील घरातून निघायला उशीर झाला. कंपनीत जाण्यासाठी लेट मॉर्निंगची देखील एक बस असते. म्हणून मग कंपनीच्या बस थांब्यावर गेलो. तर कोणीच नव्हते. म्हटलं शेवटी व्हायचं तेच झालं. थोडा पुढे गेलो तर कोणी तरी माझ्याकडे बघत होते. थांब्याच्या जवळ गेल्यावर रोज माझ्याच बस मधून येणारी एक ‘अप्सरा’. ती सोडून बाकीचे ‘नेहमीचेच’ महाराष्ट्राचे जावईबापू नव्हते. तिला बघून वाटलं की बस अजून येऊन गेली नसेल. पण सगळे जावई अचानक गायब कसे?, मनात बस निघून गेले की काय याची पाल खूप मोठ मोठ्याने चुकचुक करत होती. तरीही थांबलो. दोन मिनिटांनी मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे असे पहायचो. आणि नजरा नजर झाली की लगेच आम्ही दोघेही दुसरीकडे पहायचो. अस दोन चार वेळा झालं. Continue reading

पाच

पाच ह्या अंक बद्दल बोलाव तेवढे कमीच आहे. आणि माझ्या बाबतीत बोललं तर सगळया गोष्टीत पाच आहेच. माझ्या जन्म दिनांकात देखील शेवटी पाच, ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना देखील पाच. जन्म वर्षातही शेवटी पाच. काय गम्मत आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकिटाच्या क्रमांकात देखील शेवटी पाच होते. आता काहीच घडवून आणलेलं नाही. माझा पहिला मोबाईल नंबरच्या शेवटी देखील पाच होते. सध्याला माझ्या वयाच्या शेवटी देखील पाच आहे. आणि सध्याला असलेले माझ्या वजनात देखील शेवटचा अंक पाच आहे. Continue reading

काय बोलू?

यार हा लग्न विषय ना पिच्छा सोडत नाही आहे. जो बघाल तो माझ्याशी ह्याच विषयावर बोलतो. दोन-तीन दिवसांपूर्वी एका प्रतिक्रियेतून हाच प्रश्न विचारला होता. गेल्या महिन्यापासून हेच चालू आहे. माझ्या इमारतीतील सगळे कधीही भेटले की हाच प्रश्न. आणि माझ लग्न खर बोलायचं झालं तर मोडल. आता ह्याच दु:ख माझ्यापेक्षा माझ्या नातेवाईकांनाच जास्त झाल्याची शंका येत आहे. मध्यंतरी माझ्या कोकणातील काकूचा फोन आला. तिने मला ‘लग्नाचे कुठपर्यंत आले?’ असा प्रश्न केला. मी म्हटलं की ‘केंसल झालं’. पुन्हा ‘का?’ विचारल्यावर मी खर काय ते सांगितलं. Continue reading

सर्दी

परवा पासून ही सर्दी जाम मागे लागली आहे. बर सर्दी झाली ती सुद्धा उन्हाळ्यात. तसे मी कधीच आजारी पडत नसतो. पण यावेळी पडलो. अंगात जीवच नसल्याप्रमाणे वाटत आहे. काल दिवभर झोपून होतो. सर्दीमुळे थोडा खोकला आणि आवाजात बदल झाला. माझ्या डोळ्यात पाणी आले तरचं सर्दी होते. नाहीतर कितीही पाऊस असला तरी काही फरक पडत नाही. एकतर ‘मिनी आठल्ये’ पुन्हा आपआपल्या घरी गेल्यापासून जाम एकटेपणा जाणवतो आहे. त्यात आई देखील गावी गेलेली. मी इथे एकटाच. सगळ्यांची खूप आठवण येते. Continue reading

वाढता वाढता वाढे..

एकदा हनुमान लंकेत सीतामातेचा शोधासाठी गेला असतांना रावणाची सेना त्याला कैद करते. रावण हनुमानाची शेपटी पेटून देण्याची शिक्षा देतो. रावणाचे सैनिक हनुमानाची शेपटीला चिंध्या गुंडाळून पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण शेपटी मोठी होत जात असते. लंकेतील सगळया चिंध्या संपतात. मग राजवाड्यातील पडदे, नंतर जी मिळतील ती कपडे घेऊन शेपटीला गुंडाळले. तरीही शेपटी वाढतच चाललेली. तस चालल आहे महागाईचे. नाही नाही दरवाढीचे. कारण ही महागाई इतकी वाढण्याचे सारे श्रेय मनिसिंहला जाते. काय चुकीचे वाटते? Continue reading