वाहिनी साहेब

काय बोलाव आता? हे मित्र लोक ना, सगळे मित्र इकडून तिकडून सारखेच. परवा ‘परी’ सोबत गप्पा मारून कंपनीत आलो. नाश्ता करावं म्हणून मित्रांसोबत कॅन्टीन मध्ये आलो. काय सांगू किती खुश होतो. परी सुद्धा तीच्या टीममेट सोबत नाश्ता करायला आली होती. मी माझ्या मित्रांना ती दाखवली तर, माझा एक मित्र तिला ओळखत होता. मग काय, साहेब आधीच तिच्यावर फिदा. फारच काकुळतीला आला होता तिच्यासाठी. हो नाही करत शेवटी मलाच माघार घ्यावी. ती आणि तो एकाचं फ्लोरवर बसतात. आणि त्याला ती मनापासून आवडते. असो, मला कुणाच्या चित्रपटात ‘खलनायक’ चा रोल मुळीच करायचा नाही.

जाऊ द्या, परीची आता वाहिनी साहेब झाली. दिवसभर जाम बोर झालं. पण आता अशा दुखांची सवय होते आहे. मला ना असेच मित्र भेटत आले आहेत. म्हणजे तसे ते खूप चांगले आहेत. पण मला आवडलेली ‘परी’ यांनाही आवडते. मी नगरला संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. तीच आणि माझ खूप छान जमायचं. पण काय करणार, माझ्या एक मित्र तीच्या प्रेमात पडला. आता तिला त्याचे सगळे कळायचे. पण तिला त्यात काहीही रस नव्हता. आणि तो देखील इतका बुजरा होता की, प्रत्येक गोष्टीत मलाच पुढाकार घ्यावा लागायचा. बर, सगळं त्याच ऐकून त्याला माझ्या आणि तीच्या विषयी शंका यायची. शेवटी शेवटी तर त्याला मी त्याच्या ‘प्रेमकहाणी’ मधील खलनायक वाटायला लागलो. मग त्या दोघांची गाडी पुढे जावी म्हणून मी तिच्याशी बोलणे बंद केले.

बर, तीही खूप बहाद्दर. सर्व गोष्टी कळत असून न कळल्याचे दाखवायची. त्या बिचाऱ्याला छळायाची. शेवटी तिचे दुसऱ्याशी लग्न झाले. आणि हा मला अजूनही दोष देत आहे. दुसरी एक मैत्रीण होती. तिच्यावर तर माझे एक सोडून पाच मित्र. आम्ही दोघांनी त्यांचे नाव ‘पांडव’ ठेवले होते. असो, त्यांच्यासाठी त्यावेळी मी ‘दुर्योधन ‘ होतो. म्हणजे खलनायकच. ‘ती’ नंतर माझ्या जुन्या कंपनीतील आवडली होती. पण तिला माझ्यात रस नव्हता. नव्या कंपनीत आलो. तर नेहमी बसने जाता येता एक मुलगी रोज मला बघायची, आणि माझ्या डेस्कच्या जवळच तिचाही डेस्क आहे. छान आहे. पण माझ्या एका मित्राला ती आवडली. मग काय या प्रेमकहाणी मध्ये देखील ‘साईड हीरो’चा रोल. त्यानंतर अजून एक छान वाटली. पण तिथेही एक मित्राचे तिच्यावर ‘प्रेम’.

मध्यंतरी, माझ्या एका मित्राला त्याच्या कामात माझी मदत हवी होती. म्हणून त्याने मला बोलावले. त्याची मदत करीत असतांना त्याची मैत्रीण तिथे कोलमडली. झालं काम झाल्यानंतर ह्याने त्या विषयावरून मला अर्धा तासाचे ‘दोस्ती’ या विषयावर व्याख्यान दिले. आणि परवा ‘परी’ची वाहिनी साहेब झाल्या. इति श्री मित्र कृपा. मला एक कळत नाही की नेहमी मला साईड हीरो किंवा खलनायकचा रोल का मिळतो? मी हीरो असलेला चित्रपट कधी येणार कुणास ठाऊक? बहुतेक तो चित्रपट येण्यापर्यंत माझा ‘चिनीकम’ होणार याची शंका वाटते.

Advertisements

8 thoughts on “वाहिनी साहेब

 1. नियतीने नेमून दिलेला खलनायकाचा पार्ट व्यवस्थित पार पाडावा.

 2. अरे माझी अवस्था काही वेगळी नव्हती..
  माझ्या एका मित्राचं मन माझ्या क्लास्मधल्य़ा माझ्याच आवडत्या मैत्रीणीवर आलं.
  मी त्या साठी तिचा नाद सोडला. पण हा माझ्या मागे.. माझी सेटींग करुन दे म्हणाला…
  दोस्त के लिए करना पडा..
  कॉलेज सुटल आणि मी तिच्यासोबत स्टेशनकडे निघालो..
  तिला म्हटलं तुझ्याशी मह्त्वाचं बोलायचय..
  ती: बोल ना काय बोलायचय..
  मी: आय लव्ह यु.. (थोडा पॉझ) (ती शॉक). अस प्रसाद तुला म्हणु पहातोय.. (ती रागात).. 😉

  तिने आता तिस-याशीच लग्न केलंय.. 😉 आणि साहेबाच (प्रसादचं) ४थ प्रकरण फळाला लागलं..;-)

 3. Baap re… Mitrasathi evadha tyaag…??? Muli kadhich karat naahit maitrini sathi itka tyaag….!!! Tuhi try kar mihi karate…pudhe jyaache tyaache Nashib….asa attitude asto…!!!
  Aso, yeil yeil tumachahi picture yein aani hit pan hoil… 😀
  ( BTW, pahilyandach aale ithe..mast aahe blog…)

 4. Shirish Kanekar chya Kanekari madhye sangitalele “Varg-Bandhu” amhi sada sarvada Varg-Bandhu tya pudhe jayache kadhi prasangach aale naahi… any ways tumhi ekate tar nakkich nahi…Mothya mothya Companit ashya chotya chotya goshti hotach asatat…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s