वाचलो!

मागील आठवड्यात वडिलांचा फोन आला होता. पुन्हा एक ‘स्थळ’. झालं! मी काही म्हणायच्या आत वडिलांनी छत्तीस गुण जुळत आहेत. आणि मुलगी देखील दिसायला बरी आहे. मग येत्या रविवारी पहाण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. आता वडिलांना ‘नाही’ कसं बोलणार. ठीक आहे म्हणून मी फोन ठेवला. तरीच म्हणतोय, गेल्या आठवड्यापासून माझ्या डाव्या डोळ्याची पापणी का सारखी फडफडते आहे. परवा गेलो घरी. काल सकाळी श्रीरामपूरला पाहण्याचा कार्यक्रम होता. आईने मला तिचा फोटो दाखवला. फोटो बघण्याआधी आईला मी दोन वर्ष थांबता येत नाही का म्हणून वाद घालत होतो. पण तिचा तो फोटो बघितलं आणि वाद आपोआप बंद झाला. यार ती तर अप्सराच्याची पेक्षा सुंदर होती. मग काय गेलो निमुटपणे श्रीरामपूरला. तरीही माझा डाव्या डोळ्याची पापणी एवढी का फडफडते आहे, ते कळत नव्हते.

सकाळी मी, आई आणि वडील निघालो तर खर. पण बस मिळेना. मग खाजगी वाहनाने राहुरीपर्यंत गेलो. एक तर एवढे उन. त्यामुळे डोक्यावरील तेल कधी उडून गेले काही कळलंच नाही. त्यात एवढी हवा ना, की केसांची प्रचंड वाट लागली. राहुरीवरून पुन्हा श्रीरामपूर बस लवकर मिळेना. मग कशीबशी दुपारी एकच्या सुमारास मिळाली. तर त्यात एवढे गरम झाले ना. की माझा सगळं चेहरा त्या घामानेच काळवंडला. आता अस गेल्यावर मी तरी मला पसंत करेल का, आणि ती देखील असाच विचार करेल असा सारखा विचार मनात येत होता. दर पाच एक मिनिटांनी वडिलांना आज नको जायला अस सांगावसं वाटत होत. पण मनावर ताबा ठेवला. त्यांचे घर शोधायला अडीच वाजले. तीच्या घरचे देखील फार आतुरतेने वाट पहात होते. झालं! एकदा घरी गेल्यावर त्यांना जरा जास्तच आनंद झालेला. तीच्या आई वडिलांचा आनंद त्यांच्या चेहऱ्याने कळून येत होता.

जरा पाच दहा मिनिटे गप्पा झाल्यावर. मी तिची वाट पाहू लागलो. पण ती येण्याचे नावच घेईना. माझीही अधीरता वाढत चालली होती. मनात कशाला उगाच छळता. पण काय करणार ना! काही पर्यायच नव्हता. मग उगाचंच इकडच्या तिकडच्या गप्पा. अमुक काय करतो आणि तमुकच कसं चालल आहे. पाऊस आला होता का आणि गेला होता का? ह्याच निरर्थक गप्पा. शेवटी ती ‘कांदेपोहे’ घेऊन आली. बस्स! पाहून माझा काळवंडलेला चेहरा आणखीनच काळवंडला. म्हणजे तिची रीएक्शन देखील तीच होती. मी म्हटलं ना ती मला ह्या अवतारात कसे पसंत करेल. असो, थोडक्यात, फोटोत आणि वास्तवात फार फरक होता. आता काय बोलणार ढेकळं. मला काहीच रस नव्हता. मुळात काहीचं संवेदना होत नव्हत्या. तरीही मी आपला खुश असल्याचा खोटानाटां प्रयत्न करत होतो. आणि ती देखील सेम. आम्ही दोघे सोडले तर बाकीचे खुश. बहुतेक ती देखील माझ्याप्रमाणेच आई वडिलांना नापसंती कशी सांगावी याचा विचार करीत होती.

माझ्या वडिलांनी तिला अगदी ठरलेले, म्हणजे ‘स्वयंपाक’ वगैरे येतो का? असले प्रश्न विचारले. तीच्या वडिलांनी तर मला आधीच प्रश्न केले होते. नंतर मला तिला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचार अस तिचे वडील म्हणाले. मनात येत होते की तिला म्हणावे ‘पुण्याची बस किती वाजता आहे?’. पण मी शांत राहिलो. तिला मला काही विचारायचे आहे का अस तीच्या वडिलांनी तिला विचारल्यावर तिने ‘नाही’ अस उत्तर दिले. तसे आम्ही दोघे एकमेकांना बघायचो पण काहीच बोलत नव्हतो. खरे तर आमच्या दोघांनाही बोलण्यासारखे काहीच राहिले नव्हते. तिचा मामा आणि माझे वडील दोघांच्या पत्रिकेच्या बद्दल बोलत असतांना नक्षत्राचा काहीतरी घोळ झाल्याचा लक्षात आले. मग माझ्या वडिलांनी ताबडतोप तिची आणि माझी मूळ कुंडली पहिली. तर जन्म दिनांक, आणि ठिकाण सोडले तर पत्रिकेतील सर्वच गोष्टी सारख्या होत्या. मग काय अस चालत नसते असे वडील पूर्वी मला म्हणाले होते. मी काय समजायचो ते समजलो. मनात खरंच ‘जय हो’ चालू झाले होते. पण ती का नाराज आहे हे काही मला कळत नव्हते.

मग मी स्वतःहून तीच्या वडिलांना आम्ही दोघे दुसरीकडे जाऊन बोलले तर चालेल का अस हिम्मत करून विचारले. त्यांच्या होकारानंतर आम्ही मागील पडवीत गेलो. मग बोलता बोलता तिने खरे काय ते सांगितले. एक तर तिला तिचे एम.ए चे सेकंड इयर झाल्यानंतरच लग्न करायचे होते. पण घरच्यांच्या दबावाने ती लग्नाला तयार झाली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला शिकायची खूप इच्छा होती. लग्न करून घर-संसार करण्यात इच्छाच नव्हती. मग मला समजले की माझा डाव्या डोळ्याची पापणी एवढी का फडफड करत होती. आणि तिनेही मनातलं एवढ बाहेर काढल्यावर मला हास्यमुद्राचे दर्शन दिले. आम्ही पुन्हा बाहेर आल्यावर आमचे दोघांचे चेहेरे खुललेले आणि बाकीच्यांचे काळवंडून गेलेले. तिथून निघाल्यावर मी वडिलांना हे स्थळ ‘नको’ म्हटले. बहुतेक त्यांचे देखील पत्रिकेच्या घोळामुळे बहुतेक नकार झाला होता. त्यामुळे त्यांनीही काहीचं आग्रह किंवा कारण विचारली नाही. मग पुण्याला येतांना मस्त झोप काढली. आणि डाव्या डोळ्याची पापणी देखील फडफडण्याची थांबली. मुळात मला अशी मुलगी एक्स्पेक्टेड नाही आहे. बोललो म्हणून ‘वाचलो!’. नाहीतर उगाचंच दोघेही जीव दुखी: झाले असते.

Advertisements

4 thoughts on “वाचलो!

  1. बरं झालं… वाचलात…
    बाकी किती ते टॅग्ज… घाबरलो की!

  2. पावसाळा आल्याने तो टॅगचा ‘क्लाऊड’ भलताच मोठा झालेला दिसतो! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s