रांग

काय बोलाव आता ‘रांग’ बद्दल. जीवनातील एक अपरिहार्य गोष्टच झाली आहे. बसचे रिझर्वेशन, बसमध्ये बसण्यासाठी, कॅन्टीनमध्ये जेवण घेण्यासाठी, अगदी सार्वजनिक स्वछगृहात देखील रांगच. त्या कसाब आणि गुरूची फाशी देखील रांगेत. परवा पुणे स्टेशनमध्ये रात्री दहावाजून दहा मिनिटांची लोणावळा लोकलच्या तिकिटासाठी तिकीट खिडकी समोर उभी असलेल्या रांगेत उभा राहिलो. मोबाईलमध्ये वेळ बघितली तर नऊ पंचेचाळीस झाले होते. आणि रांगही फार मोठी नव्हती. असतील वीस एक माणसे. नेहमी प्रमाणे मध्येच घुसून तिकिटे काढणारे देखील कमी नव्हते. कोणी घुसायला लागला की रांगेत असलेले लोक हिंदीतून त्याला घाण शिव्या द्यायचे. ऐकायलाही खूप किळस यायची. पण रांगेत घुसणारे काही ऐकत नसायचे. दहा वाजता मी ज्या खिडकीसमोर उभा होतो. ती खडकी बंद झाली. आणि दुसर्या बाजूची खिडकी उघडली.

पुन्हा तिथे रांगेत उभा राहिलो. आणि पहिले तर आधी जिथे उभा होतो त्याही मागे गेलेलो. आणि रांगही प्रचंड प्रमाणात वाढलेली. वेळ जात होती. पण रांग पुढे सरकतच नव्हती. लोकल फलाट क्रमांक एक वर येण्याच्या घोषणा चालू होती. वेळेप्रमाणे माझी चिंता वाढतच चालली होती. त्यात मध्येच घुसून तिकीट काढणारे काही संपत नव्हते. मध्येच पाच स्त्रियांचे एक टोळके, आता त्यांच्या वर्तणुकीवरून ‘टोळके’ म्हणायला हवे. धक्काबुक्की करून त्यांनी तिकिटे काढली. मग काय शेवटची दोन चार मिनिटे उरली लोकल येण्याची. त्या बायका गेल्यावर पुन्हा तिथे रांगेत मधून घुसणारे वाढले. माझ्या पुढचे काका मला म्हणाले ‘बहुतेक तिकीट मिळणे कठीण दिसते’. मी नुसताच ‘हो ना’ अस म्हणालो. त्यांनी मला विचारलं ‘कुठे जायचे आहे?’. मी म्हणालो ‘आकुर्डी’. ‘लोकल ने?’ ते म्हणाले ‘पण वेळ तर झाली’. मग काय वेळ बघितली तर खरंच दहा वाजून दहा मिनिटे झालेली. फलाटवर डोकावले तर लोकल अजून आलेली नव्हती. मग कुठे जीवात जीव आला.

मग काय सुटलो. त्या काकांना डोळ्यांनी माझ्या जागेकडे खुणावत सरळ खिडकी जवळ गेलो. रांगेत मध्येच शिरणारे लोक होतीच तिथे. त्यांना बघून, थोड्या मोठ्या आवाजात ‘आम्ही रांगेत वेडे म्हणून उभे आहोत का?’ असे म्हणले. एक दोघांनी सोडून बाकीचे आपला शिरण्याचा प्रयत्न करीत होतेच. मग काय, माझ्यातला राज ठाकरे जागा झाला. आधी पेक्षा ही मोठ्या आवाजात ‘कळत नाही का? रांगेतील बाकीच्यांनाही घाई आहे’. आणि मग त्या तिकीट देणाऱ्या अधिकाऱ्याला देखील ‘मध्ये घुसून लोकांना तुम्ही कशाला तिकिटे देता?’ खडसावले. तो अधिकारी काहीच बोलला नाही. पण मग काय तिथेच उभा राहिलो. आला की हाकला म्हणून समजा. मग मी पुन्हा रांगेत आलो. एक मिनिट झाले नसतील तर एक म्हातारा आला आणि मध्ये घुसून तिकीट काढायला लागला. पुन्हा खिडकी समोर जावून त्याला ‘साहेब, कसली घाई आहे?’ अस विचारलं. त्याचा बाजूच्याने त्याचे तिकीट विचारले तर ‘प्ल्याटफॉर्म’ तिकीट. मग काय अख्खी रांगच हसायला लागली.

तेवढ्यात लोकल फलाटावर आली. माझी हृदयाचे ठोके एक्स्प्रेसच्या वेगाने पडायला सुरवात झाली. रांग अजून बरीच बाकी होती. एक वेळ मनात तिकीट न काढताच लोकलमध्ये जावून बसावे की काय असे वाटत होते. पण नंतर मनातून तो विचार काढला. उगाच एखादा टीसी आला तर पंचाईत होईल. म्हणून मग तसाच रांगेत उभा राहिलो. मी खिडकी जवळ गेल्यावर एका माणसाने ‘प्ल्याटफॉर्म’ तिकीट काढतोस का विचारले. काय करणार फारच काकुळतीला आला होता. तिकीट अधिकाऱ्याला माझ्या लोकलच्या तिकिटाचे सुट्टे पैसे दिले. उगाच त्यासाठी लोकल चुकू नये म्हणून. माझे तिकीट काढून झाल्यावर एक ‘प्ल्याटफॉर्म’ तिकीट मागितले. तर तो अधिकारी माझ्याकडे बघून ‘कशाला लोकांची घाण घेतोस?, त्याला सांग की सुट्टे दे.’ मी त्या माणसाला सुट्टे द्यायला सांगितले. आणि पळत पळत जावून लोकल पकडली. असो, लोकल लगेच निघाली. खूप दिवसांनी लोकलच्या गेटवर उभा राहिलो. लोकल पकडल्यावर जणू काही देव मिळाल्याचा आनंद झाला होता. शेवटी ‘रांग’ खूप काही अनुभव देतेच ना.

Advertisements

One thought on “रांग

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s