संकेत

संकेत म्हणा किंवा पुर्वाभास. पण जीवनातील प्रत्येक गोष्टींचा आधी संकेत मिळत असतो यावर आता माझा विश्वास बसायला लागला आहे. मग ती घटना चांगली असो किंवा वाईट. फक्त फरक एवढा असतो की घडलेला संकेत हा संकेत होता याची कल्पना संकेतच्या वेळी येत नाही. म्हणजे मी मुंबईला येण्याआगोदर मी एका कंपनीत संगणकावर काम करीत बसलो आहे. आणि कोणी तरी व्यक्ती माझ्या मागून काम झाले का अस विचारते. आणि मी रागात त्याला ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणतो. अस एक स्वप्न पडले होते.

ज्यावेळी पडले त्यावेळी काही अंदाजच नाही आला. जवळपास सहा महिन्यांनी मी मुंबईला नोकरीच्या निमित्ताने आलो. बॉसला पाहिल्यावर, चेहरा ओळखीचा वाटला. पण कुठे पहिला हे लक्षात आल नाही. काही महिन्यांनी असच एक काम मी करत होतो. आणि तो सकाळपासून ‘काम झाल का?’ म्हणून मागे लागला. दर दहा-वीस मिनिटांनी विचारायचा. त्याला बर्याच वेळा मी ‘आज त्या कामाला अख्खा दिवस त्याला लागेल’ अस सांगत होतो. पण तो राहून राहून तोच प्रश्न. शेवटी संध्याकाळी इतका वैताग आला की रागात त्याला मी ‘काम झाल की सांगतो’ अस म्हणालो. अस म्हणाल्यावर तो शांत झाला. मग कुठे तरी हा प्रसंग बघितला अस वाटायला लागल. विचार केल्यावर ते स्वप्न आठवलं. आता रोजची पडणारी स्वप्न उठल्यावर लक्षात राहतात अस नाही. पण काही काही आठवतात.

मुंबईलाच असतांना एका फ्रेंच दाढीच्या व्यक्तीने ‘बाईक आहे का?’ तर मी त्याला म्हणालो की ‘लोकल आहे की’. असा एवढाच प्रसंग स्वप्नात पडला. आणि जवळपास आठ एक महिन्यांनी मी माझ्या मागील कंपनीच्या इंटरव्यूच्या वेळी माझ्या बॉस ने तोच प्रश्न विचारला. आणि मीही स्वप्नात दिलेलं उत्तर दिले. इंटरव्यू झाल्यानंतर तो व्यक्ती कोण ते कळलं. असो, अशी अनेक स्वप्न पडतात. पण ज्यावेळी पडतात त्यावेळी तो ‘संकेत’ आहे हे कळत नाही. गोष्ट घडल्यावर समजते. मुंबईहून पुण्याला आल्यावर ‘ती’ ने तिच्या आवडत्या मुलाशी लग्न केले अस तिची लहान बहिण मला सांगत होती अस एक स्वप्न, ती गोष्ट घडण्याच्या दीड वर्ष आधी पडल होते. त्यानंतर दोन तीन दिवस जाम टेन्शन आले होते. पण ज्यावेळी तिची लहान बहिण तीच गोष्ट, अगदी स्वप्नातल्याप्रमाणे सांगत होती त्यावेळी मात्र बातमीपेक्षा जास्त स्वप्न पडलंच कस यावर विचार येत होता.

आजकाल माझी कधी डावी, तर कधी उजवी डोळ्याची पापणी फडफडते. पहिल्या स्थळाच्या वेळी उजवी डोळ्याची पापणी खूप वेळा फडफडत होती. वडील म्हणतात की, पुरुषांची उजवी आणि स्त्रियांची डावी बाजूच्या पापणी, भुवयी, डोळा फडफडणे शुभ असते. दुसर्या स्थळाच्या वेळी माझी डावी पापणी खूप फडफडत होती. तिच्याशी बोललो तर तिला लग्नच करायचे नव्हते. माझाही नकार समजल्यावर तिचा चेहरा खुलला. आणि पापणी फडफडायचे बंद झाले. पण आता पुन्हा डावी तर कधी उजवी फडफडते आहे. काहीच समजत नाही आहे. एकदा माझ्या आत्याला माझ्या आजीची अंतयात्रेचे स्वप्न पडले होते. आणि जेव्हा पडले त्याच रात्री माझी आजी गेलेली होती. असो, हे संकेत सगळ्यांनाच येतात. आता ही काही अंधश्रद्धा, किंवा बुवाबाजी नाही. पण ज्या गोष्टी घडतात त्याचा संकेत नक्की मिळतो. संकेत ओळखणे तेवढे अवघड असते. सगळी स्वप्न म्हणजे संकेत अस नाही. आणि फडफडणे देखील संकेत नाही. पण कधी कधी स्वप्न आणि फडफडणे संकेत असू शकतात, असा तर्क मागील काही घटनांवरून लावला तर चूक नाही असे वाटते.

Advertisements

10 thoughts on “संकेत

 1. पुढच्या अनुभवांसाठी ध्यान करीत राहिल्यास उत्तम होईल!

 2. ह्या कुडमुड्याच्या अंदाजानुसार बहुदा आपली चक्र जागृती थोडीफार तरी झाली असणार आहे… त्यातील पुढील अभ्यास करावासा वाटला तर भारतीय पुस्तके आहेतच परंतु “Stalking The Wild Pendulum” नावाचे एक इंग्रजी छोटेसे पुस्तक वाचायला नक्कीच अभ्यासपूर्ण आणि औत्सुक्यपूर्ण ठरेल… लेखक – Yitzak Bentov…

 3. हेमंत तुमचा अनुभव वाचला

  तुम्हाला होणारे पुर्वाभास हे तुमच्या जन्म पत्रिकेतिल ग्रहांमुळे असण्याची शक्यता आहे

  तुमच्या लग्न स्थानात चंद्र + नेपच्युन यांची युती असेल किंवा तुमच्या लग्न स्थानात नेपच्युन असेल

  तपासुन पहावे

 4. Ho mazya hi babtit asach hho agadi lahanpanapasum mala swapnat pahilel khar hot . panpnya dola phadphadto ani Kahitari honar asa sarkh janvat rahat.

 5. हो मलाही पुर्वाभास स्वप्नात नेरमीच.होतात पण ती घटना प्रत्यक्ष घडताना हे अस आपण मागे बघीतल्याच आठवत. इतकच नाही तर माझ्या आयुष्यात किवा घरच्यंच्या बाबतीतील वाइट घटनांचे पुर्वसंकेत मिळतात. प्रचंड अस्वस्थ वाटायला लागत काहीतरी होणार आहे जाणवायला लागत. पापणी फडफडते. काही अदृश्य शक्ती बरोबर वावरतेय, लक्ष ठेवतेय, काही संकेत देतेय अस वाटत. स्वप्नात सतत पाणी िदसत, त्या पाण्यातून मी पोहत वर येतेय अस नेहमीच दिसत. कोणीतरी मागे लागत य पकडायचा प्रयत्न करतय त्याला हरवून मी यशस्वी होते .अस िदसत , आणि हे स्वप्न न वाटता ते खर मी जगत होते. ते पाण्याचा , माणस, वस्तुंचा स्पर्श खरा आसल्याचा जाणवताे . इतकच काय माझे वडील वारले त्याच्य ६ महिने आधी तोच प्रसंग तीच माणस सगळ पाहीलेल . झोपेत जोरजोरात रडत होते पण आवाज निघत न्हवता,डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होते पण उघडतनव्हते. उू उू असाच आवाज एकून आइबाबानीच पाणी मारून उठवल. हे सगळ त्यांना सांगितल कोणीच विश्वास ठेवला नाही. पुन्हा लाहान बहीण सिरीअस आहे, मावशी वारली हे स्वप्न खरे झाले, लग्नानंतर नवरयाचा अॅक्सीडेंटचे स्वप्न पडले त्यानंतर आशा घटना घडायला लागल्या की तेच संकेत मिळू लागले जीव घाबरयला लागला दसरयाच्या आदल्या मी नवर्यला कामाला जावू नका , नउ दिवसाचा उपवास घरीच सोडा परोपरीने सांगितले आमच भांडण ही झाले पण ते न एकता कामाला गेले त्याच दिवशी दुपारी १ वाजता त्यांच्या मेकपोडक्शन कंपनीत दसरा सेलिब्रशन ला जेवणासाठी जाताना बाईकला ट्र कने उडवले . देवेच्या कपेने जीव वाचला पण गुडघ्याला जबर दुखापत झाली अॅापरेशन करावे लागले त्यापायाला अजूनही खूप त्रास होतो.
  हया सगळ्या मुळे स्वप्न आणि एकट राहण्याची मला खुप भीती वाटते. पण स्वप्न अजुनही पडतात. ही घटना आपण पाहिलीय कळत, पाणी दिसतच, स्वप्नात ल्या वस्तु, पाणी ,प्राणी, बायकामाणस यासर्वांचे स्पर्श जाणवतात मग, दिवसभर अस्वस्थ वाटत राहते .

 6. Ho,sir mala hi swapan purvabhas hot at agadi lahan pana pasun. Papani phaphadate. Kadhi davi kadhi ujavi, achanak mood change hoto Kahitari janavat has kahi taxi honar janavat rahat. Pan ti ghatana ghadlya banter achanak athavat at he tr apan kutbetari baghitaly, kahi vaait ghadlya banter janavat tya divashi aplyalay tyach veli he janavat hot has koni tari sangnyacha prayatn karat hot. Mi gharat sangital ki purvi mazi thatta karayche ma asa apalyach babatit ka hot asav. ajunhi asa hot . swapna padtata te ghadtana pahilaychi janiv note kahi vaait ghatanache sanket miltat. Pan mala he ka hot hyach karan sodhavs vat at. asa las ekadyala bhavishyatlya ghatna dish shaktata. Apanhi charchaughan sarkhe ahot mag he las hot.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s