भगवा

आपला देश ‘भगवा’ म्हणायला एवढे का घाबरतो हे कळत नाही. सगळ्याचं गोष्टीत भित्रेपणा. मुळात जन्मता: या गोष्टी आपल्यावर का बिंबवतात. शाळेत असतांना तिरंग्याचे तीन रंग म्हणजे ‘केशरी’, पांढरा आणि हिरवा अस शिकवलं जायचे. अजूनही तेच शिकवतात. मध्यंतरी हॉलंड फुटबॉलच्या वर्ल्ड कप मधील एक सामना जिंकला. सकाळ मध्ये बातमी ‘नारंगी विजयी’ आणि तीच विजयाची बातमी ‘सामाना’ वर्तमानपत्रात ‘भगवा विजयी’.

इंद्रधनुष्यातील सात रंगांची नावे  तांबडा, ‘नारंगी’, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा. मला एक कळत नाही. भगवा रंग आणि ‘केशरी’, ‘नारंगी’ रंगात नावे सोडून काय फरक आहे?  रंगाचे नाव घ्यायला कशाला घाबरायला हवे? भगव्याला ‘भगवा’ म्हणले तर कुठे बिघडले? सूर्याची कोवळी किरणे, किंवा सूर्य उगवतांना किंवा मावळतांना जी कांती असते त्याच्या रंग ‘भगवा’ असतो. आता ‘भगवा’ रंगाला आपल्या हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. आपले पवित्र वस्त्र देखील ‘भगवे’ असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज देखील भगवा होता. मग या ‘भगवा’ शब्द का घेत नाही कुणास ठाऊक.

भारताच्या तिरंग्याचे तीन रंगातील पहिला रंग ‘केशरी’ ऐवजी ‘भगवा’ म्हणले तर काय राष्ट्रध्वजाची प्रतिमेला काही धक्का पोहचेल? मला तरी नाही वाटत. ‘नारंगी’ बहुतेक संस्कृत शब्द असावा. भारताच्या क्रिकेट संघाच्या गणवेशात देखील ‘भगवा’ रंग आहे. पण त्याला आम्ही ‘ऑरेंज’ म्हणतो बुवा. असो, ज्याची त्याची इच्छा म्हणा. पण निदान मी तरी ‘भगव्या’ रंगाला भगवाच म्हणतो बुवा. शिवरायाच्या स्वराज्याचे तो भगवा म्हणजे प्रतिक आहे. अमेरिका आणि कॅनडा मध्ये अभियांत्रिकी विद्यार्थींना पारितोषिक समारंभाच्या वेळी ‘भगवा’ रंगाचा विशिष्ट ड्रेस परिधान करावा लागतो. नेदरर्लंडचा राष्ट्रीय रंग ‘भगवा’ आहे. जगातील अनेक राजकीय पक्षांचा रंग देखील भगवाच आहे. खोट वाटत असल्यास नेटवर ‘ऑरेंज कलर’ असा शोध घ्या. माझ फक्त एवढंच म्हणणे आहे की आपण ‘भगवा’ रंगाला ‘नारंगी’ किंवा ‘केशरी’ अशी पर्यायी नावे का द्यायची?

Advertisements

One thought on “भगवा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s