मजेदार भाषांतर

शुद्ध मराठी खूप मजेदार आहे. विशेषतः ज्यावेळी आपण भाषांतर करतो. म्हणजे ‘बिल गेट्स’चे मराठीत ‘शुल्क पत्रकाचे दार’, जॉर्ज बुश चे मराठीत भाषांतर ‘झाडी हवाबाज’, बराक हूसेन ओबामा चे भाषांतर ‘धन्य एक सुंदर तुला’, ‘इंडिया’चे भाषांतर ‘पाण्याचे शरीर’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे मराठीत ‘भारताची वेळ’ होईल . असे अनेक मजेदार प्रकार आपण रोजच्या जीवनात वापरतो.

उदाहरणार्थ दात घासायला ‘ब्रश’ वापरतो. ‘ब्रश’ ला मराठीत ‘कुंचा’ म्हणतात. ‘शर्ट’ ला मराठीत ‘सदरा’. आणि ‘पॅंट’ला ‘विजार’. मायक्रोसॉफ्ट ला मराठीत भाषांतर ‘सूक्ष्ममऊ’ आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड ला मराठीत ‘सूक्ष्ममऊ शब्द’. एक्सेल ला मराठीत ‘उकृष्टता’. पॉवर पॉइंट ला मराठीत ‘शक्ती बिंदू’ भाषांतर होते. एडॉब ला मराठीत भाषांतर केले तर ‘उन्हात वाळवलेली विट’ असा होतो. आणि ‘फोटोशॉप’चे ‘छायाचित्रांचे दुकान’ असा होतो. असो, नावाप्रमाणेच सॉफ्टवेअर आहे. अरे ‘सॉफ्टवेअर’ मराठीत भाषांतर करायचे झाल्यास ‘मुलायम वर्तन’ असे होईल.

‘डेस्क’ला मराठीत ‘मेज’. आणि ‘डेस्कटॉप’ ला मराठीत भाषांतर ‘मेज शिखर’ असा होतो. हॉलीवूडला मराठीत ‘पवित्र लाकूड’ असे भाषांतर होईल. ‘फॅन’ ला मराठीत ‘पंखा’ अस भाषांतर होते. आणि ‘एसी’चे भाषांतर ‘ए पहा’ असा होईल. तर ‘मोबाईल’ भाषांतर केले तर ‘भ्रमणध्वनी’. ‘हेडफोन’ चे भाषांतर केले तर ‘डोक श्रावित्र’ असे होते. ‘मेगा ब्लॉक’ मराठीत ‘मोठा खंड’, पेन्सिल ला मराठीत ‘तूलिका’ अस म्हणतात. आणि वर्डप्रेसचे भाषांतर केले तर ‘शब्द दाब’.  ‘पोस्ट’चे भाषांतर केले तर ‘पद’ असे होते. ‘केटेगरी’ चे मराठीत भाषांतर ‘वर्ग’ असा होतो. हायवे ला मराठीत ‘उच्च मार्ग’. इंटरनेट ला मराठीत ‘अंतरजाळ’. ‘मेल’ला मराठीत ‘पत्र’ असे म्हणतात. आमीर खानाचा ‘थ्री इडियट’ चित्रपटाचे मराठीत नाव ‘तीन मूर्ख’ असे होईल. ‘शोले’ मराठीत भाषांतर ‘अनेक विस्तव’ असा होईल.

जर मराठीचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले तर ‘महाराष्ट्रा’चे ‘ग्रेट नेशन’. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे भाषांतर केले तर ‘ग्रेट नेशन री-कन्स्ट्रॅक्षन मिलिटरी’ असा होईल. माहेरची साडीचे इंग्लिश भाषांतर ‘होम टाऊनस सारी’. आणि सासर ला इंग्लिशमध्ये ‘इन लॉझ टाऊन’. एक म्हण आहे ना, ‘गोगल गाय पोटात पाय’ ती जर इंग्लिश मध्ये केली ‘पुअर काऊ लेग इन स्टमक’ अस होईल. ते म्हणतात ना ‘गड आला पण सिंह गेला’ ते जर इंग्लिशमध्ये केले तर ‘फोर्ट इज कम बट लॉयन इस गॉन’ अस होईल. जर ‘नटरंग’ चित्रपटाचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले. तर ‘अप्सरा आली’ गाणे अस असेल ‘हे.. सॉफ्ट बॉडी, ब्युटीफुल इल्ल्यूषन.. डन फुल स्टार बाथ | आय वेअर गोल्ड एंड वेट इन मनी.. लूक लाईक डायमंड शाईन’ आणि गाण्याचे नाव असेल ‘गोर्जीयस इस कमींग’. आणि चित्रपटाचे नाव असेल ‘हिरोज कलर’. श्वास चे भाषांतर केले तर ‘ब्रीदिंग’ असे होईल. ‘झेंडा’ इंग्लिशमध्ये ‘फ्लॅग’ आणि ‘ विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती … ‘ चे ‘विठ्ठला विच फ्लॅग गिव्ह मी इन हॅण्ड..’ असे होईल.

‘सकाळ’ वर्तमानपत्राचे इंग्लिशमध्ये ‘मोर्निंग’, ‘लोकमत’चे ‘पीपल्स वोट’, ‘पुढारी’ चे ‘लीडर’, ‘सामना’चे ‘मॅच’ होईल. असो, असे अनेक गोष्टींची भाषांतरे मजेदार आहेत. आपण शुद्ध मराठीत अर्थ काढले असते तर अनेक विनोद नावातच झाले असते.

Advertisements

8 thoughts on “मजेदार भाषांतर

 1. चोराच्या मनात चांदणे याचे इंग्रजी भाषांतर काय होईल ?
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  स्टार्स ईन द माईंड ऑफ थिफ.

  आणि

  सकाळी सकाळी माझे डोके फिरवू नका याचे काय कराल ?
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  .
  डोन्ट रोटेट माय हेड इन द मॉर्निंग मॉर्निंग…. चालेल काय ?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s