लयलूट

परवा एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर विकत घेतला. त्याचे असे झाले चार दिवसांपूर्वी माझ्या बहीणाबाईचा संगणक खूप एरर देत होता. मी पाहिल्यावर तिला फॉरमॅट करूयात असे म्हणले. तिला मी करून आणून देतो असे म्हणालेलो. आणि तिनेही तीचा संगणक मला दिला. आता त्या नेटबुकला ना सीडी ना डीव्हीडी ड्रायव्हर. मग काय मी विंडोज एक्सपी सर्विस पॅक थ्री टाकणार कसा? त्याची साईझ साडेपाच जीबी. माझा चार जीबीचा पेन ड्राईव्ह. त्यामुळे एक्स्टर्नल डीव्हीडी राईटर घ्यावा लागला. मित्राला त्या एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत विचारली तर तो बोलला की अंदाजे दोन हजारापर्यंत जाईल. चिंचवड स्टेशनला डेटा केअर सेंटरमध्ये गेलो. तिथे जाऊन चौकशी केली तर त्यांनी सॅमसंग एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत चार हजार दोनशे सांगितली.

असो, ऐकून थोडा गोंधळून गेलो होतो. पण ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ तशी गत झाली होती. शेवटी करा बिल म्हणालो. बिल केल्यावर मी माझे डेबिट कार्ड आहे असे सांगितल्यावर दुकानदार , दोन टक्के टॅक्स लागेल असे म्हणाला. त्याला मी माझे डेबिट कार्ड आहे क्रेडीट कार्ड नाही असे सांगितले. मग शेवटी हो नाय करता रोख रक्कम दे असं त्याच मत पडलं. ठीक आहे म्हणून मी बाजूला असलेल्या एसबीआय चे एटीएमला खूप गर्दी होती. म्हणून बाजूच्या इमारतीत असलेले कॉसमॉस बँकेच्या एटीएम मध्ये जाण्यासाठी निघालो. त्याच कॉसमॉस बँकेच्या एटीएम डाव्या बाजूला हाउस ऑफ लॅपटॉप आहे. सहज मनात विचार आला की इथे एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची चौकशी करू म्हणून गेलो तिथे. तसे मनात चुकीचे करीत आहे अस राहून राहून वाटत होते.

पण शेवटी चौकशी केली तर हाउस ऑफ लॅपटॉपमध्ये एक्स्टर्नल डीव्हीडी राईटरची किंमत तीन हजार सांगितली. बर त्यांना दाखवा म्हणालो तर तोच ‘सॅमसंग’. मग काय दोन सेकंद काही सुचलंच नाही. दुकानात आत येत असतांना मी चुकीचे पाऊल उचलतो आहोत अशी शंका येत होती. वाटत होते आपण त्या डेटा केअरवाल्याला दगा देत आहोत. पण दोन सेकंदात त्याने मला फसवल्याचा आभास झाला. मग काय पुढच्याच सेकंदाला हाउस ऑफ लॅपटॉपमधून राईटर खरेदी केला. डेबिट कार्डवर त्याने काहीच चार्ज लावला नाही. तसे हाउस ऑफ लॅपटॉपवाला मला काही फार भावला नाही. कारण कदाचित त्या राईटरची किंमत अजूनही कमी असू शकते. असो, घेतल्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. पण दहा पावलांत बाराशे रुपयांचा फरक. थोड्या वेळाने त्या डेटा केअरवाल्याचा फोन आला की डेबिट कार्डवर चार्ज लावत नाही म्हणून. त्याला मी सांगितले की माझा निर्णय बदलला म्हणून.

अजून काय सांगणार? आधी वाटायचं सरकार खूप लुटत, तसे ते दर दोन महिन्यांनी लुटतात. आता तो विषय नको कारण ‘राम राज्याच्या’ कल्पना ‘मोहन राज्यात’ करून काय फायदा? पण सगळेच इथे लुट करायला बसलेत हे मान्य केले तरी इतकी ‘लुट’? डोक जाम बधीर झाले. जाऊ द्या. चार ठिकाणी चौकशी करून वस्तू विकत घेणेच उत्तम! नाहीतर आपली नुसतीच लुट नाही तर ‘लयलूट’ होईल.

Advertisements

3 thoughts on “लयलूट

  1. हे असे सगळ्याच वस्तुंबाबत होते.चांगले मांडले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s