परीस्पर्श

कस सांगू यार, परीचा स्पर्श झाल्यापासून सगळंच खूप छान वाटत आहे. परवा कंपनीची बससाठी मी नेहमीप्रमाणे उभा होतो. माझ्या रुटला दोन बसेस आहेत. एक माझ्या कंपनीच्या मुख्य इमारतीसाठी आणि दुसरी जिथे मी काम करतो. मी आणि ‘परी’ त्या दुसर्या बसमधून जात असतो. त्या दिवशी पहिली बस आली. पण त्याचा चालक दुसर्या बसचा म्हणजे ज्या बसने मी नेहमी जातो त्या बसचा. परी आणि मी ती माझीच बस म्हणून त्यात चढलो तर आतमधील लोकांनी मला ही मुख्य इमारतीची बस आहे असे सांगितले. मी आणि ती खाली उतरत असतांना चुकून माझा आणि तिचा ‘स्पर्श’.

आहाहाहा! काय सांगू, अजूनही आठवण झाली की अंगावर शहारे येतात. ती खरंच परी आहे. किती कोमल आहे ती! दोनचार मिनिटे मला काही सुचलंच नाही. चक्कर यावी आणि समोरचे सगळ गोल गोल फिरत आहे असा भास व्हावा तसं होत होते. तिला ‘सॉरी’ बोलून मी बाजूला झालो. झालेल्या प्रकाराने मला तर जाम सुचतच नव्हते. म्हणजे अस नाही की कोणत्या मुलीचा याआधी ‘स्पर्श’ झाला नाही. पण अस काहीच नाही वाटल. एकदा तर, म्हणजे मी पुण्यात नवीन होतो. त्यावेळी त्या मोठ्या बीआरटी बसमध्ये चढलो. आणि मागून कोणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. आणि त्याच वेळी बस निघाली.

त्यावेळी माझा झोक समोर असलेल्या मुलीवर गेला होता. म्हणजे तिच्या आणि माझ्यामध्ये फार फार तर एक सेंटीमीटरचे अंतर असेल. त्यावेळी मला वाटल होते, आता ती माझ्या श्रीमुखात देईल. आणि खर सांगू का भीतीने घाम फुटला होता. पण ती रागावण्या ऐवजी हसत होती. त्यावेळी भीती वाटत होती. पण यावेळी मी स्वप्नात आहे असंच वाटत होत. अजूनही तसंच वाटत आहे.  काय सांगू तिचा तो ‘स्पर्श’, एखाद्या फुलाच्या पाकळीला हातात घेतल्यावर जाणवतो ना अगदी तसा. किंवा रेशीम वस्त्राला स्पर्शानंतर येणारा अनुभव. अगदी तसाच्या तसा अनुभव आला.

मुळात ती एवढी छान आहे ना! म्हणजे मला हवी तशी. तो स्पर्श झाल्यापासून ते आहे ना ‘परी परी है एक परी..’ हंगामा मधील. ते ऐकावेसे सारखे वाटत आहे. तसं त्या गाण्याची पन्नास पारायण मी या दोन दिवसांत करून टाकली आहेत. वाटत होती तिला राग आला असेल. पण घडले उलटे. माझी बस आल्यावर ती माझ्या बाजूच्या सीटवर बसली. पण यार बोलायची हिम्मतच होत नाही माझी. कालही मी ज्या सीटवर बसलो होतो. त्याच्याच बाजूच्या सीटवर ती बसली होती. पण सगळ व्यर्थ! मला हिम्मतच होत नाही. हे आता माझे नेहमीचच झाल आहे. यार तिलाही मी आवडलो तर!!! किती छान होईल. असो, सोडा मित्र आठवला की सगळंच शून्य…

Advertisements

9 thoughts on “परीस्पर्श

 1. Kaay he? Kashala svatahache ase haal karun gheta? Haloo haloo bolane vadhva ho.

  vishay nighat jataat jevha avadat asatat ekmekana tevha.

  Vishay nighat gele,vadhat gele tari te shubh chinh samjayache.

  Ani tumchya mitrache soda ho.

  Mulgi kaay seat ahe ka rumaal takoon pakadoon thevayala. Ti ek jivant vyakti ahe na? Tila janoon ghya..tila tumhi avadalaat tar tila tumhi na milane ha tichyavar anyaay ahe.

 2. इतर कोणाशीही आपण अगदी बिनधास्त बोलू शकतो… पण जी मुलगी आपल्याला आवडते, ज्या मुलीची आपल्याला पर्वा आहे, तिच्यासमोर अशीच स्थिती होते!

  तिच्याशी बोलणं जमत नसेल तर इतरांचं ऐकून तिच्याशी बोलण्यासाठी स्वतःवर दबाव आणू नकोस! तू स्वतःची अवस्था ज्यास्त चांगल्या प्रकारे ओळखतोस बरोबर!? मग स्वतःसाठी थोडासा वेळ घे! मनाला अगदी “सहज” तयार करण्याचा प्रयत्न कर, त्यावर दबाव आणू नकोस. कारण मग बोलायचंच म्हणून काही चुकीचं बोललं जाण्याची अथवा काही चुकीची कृती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  माझं ऐकशील तर
  १. सहज घे, शांत मनाने बिनधास्त बोल. ती काय विचार करेल!? असा तू विचार करु नकोस.
  २. मन शांत होत नसेल, तर वेळ घे! त्याला शांत कर!
  ३. आणि तरीही शांत होत नसेल तर त्याबाबत कसालाच विचार न कराता येणार्‍या काळावर सारं काही सोडून, तू आजच्या कामांत स्वतःला व्यस्त करुन घे.

  थोडक्यात मला सांगायचंय काय!? तर तू स्वतःचे हाल करुन घेऊ नकोस! कारण शेवटी आपल्याला काय हवं आहे!? समाधान!

 3. बस पहिली आणिक चालक तुमच्या बसचा…

  हा हा हा

  तुम्हाला रक्षिले नियतीने।

  परमेश्वरी लीला अगाध आहे म्हणतात ते खोटे नाही…

  ये आसानी से किसी के बस (समझ) में आनेवाली बात नही है।

 4. लेखाचे नांव “परीस स्पर्श” केलेत तरीही काही बिघडणार नाही…

  परिस स्पर्श होता लोह झगडतसे असे काहीसे असणारा श्लोक रामदास गुरुजींनी लिहीलाय त्याच्या कुठल्याश्या ग्रंथात

 5. हेमंत, “थ्री ईडीयटचा” संवाद (मराठीत)

  ५० वर्षानंतर अश्याच कोणत्या बसने प्रवास करत असशील, तेव्हा विचार करशील, अरे, आपण त्यावेळी बसमध्ये शेजारी बसणाऱ्या मुलीला आपली आवड सांगितली असती तर …..

  रिकाम्या जागी काय असेल हे जाणु शकतोस … गो अहेड मॅन …

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s