लग्न

कालपासून काहीच सुचत नाही आहे. परवा वडिलांचा आणखीन एका स्थळबद्दल फोन आला होता. त्यात हे डोक दुखण्याचे कमी होत नाही आहे. बहुतेक पुढच्या महिन्यात ते स्थळ पाहण्याचा कार्यक्रम ठरेल. ‘अप्सरा’ बद्दल बहिणाबाईशी बोलायला परवा गेलो होतो. पण तीच ‘सॉफ्टवेअर मधील नको’. काय बोलू आता तिच्याशी. आईने बहिणाबाईला फोन केला होता. ते आधी म्हटले ना मी मागील दोन आठवड्यापूर्वी पाहिलेले ते ‘सोलापूर’च्या स्थळाबद्दल. मी चुकून ‘सांगली’ म्हटले. क्षमा असावी. आत्ता वडिलांचा पुन्हा फोन आला होता ‘की त्या स्थळाचा सारखा फोन येत आहे. त्यांना काय सांगायचे म्हणून’. आता माझ्या आई आणि वडिलांना ते स्थळ पसंत पडलेले आहे. पण मला काहीच वाटत नव्हते. म्हणजे सगळे छान आहे त्या स्थळाचे. फक्त काय तो ‘लुक’ नाही. बाकी सर्व व्यवस्थित. Continue reading

Advertisements

डोक

आज डोक जाम दुखत आहे. कशामुळे त्याचे कारण कळत नाही आहे. आता मला डोके आहे की चर्चा नको. उगाचंच, ‘लोकसभा’ नको. तिथे देशातील सर्वात हुशार प्राणी आपली कला सादर करीत असतात. आता त्यांना डोक आहे की नाही यावरही चर्चा नको. उगाचंच, एकमत होईल. तसे म्हटले तरी ते देखील हाच विचार करीत असतील. कारण आपणच त्यांना तिथे बसवतो. मग पुढे ते काय करतात ते दिसतेच आहे. Continue reading

हेडफोन

कानातले घातल्याशिवाय आजकाल कोणी कुठेही जात नाही. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. रोज सकाळी बसमध्ये जवळपास सर्वच ‘बुजगावणे’ ते कानातील घालून असतात. आज माझ्या शेजारी बसलेली सुद्धा! आणि बाईकवरील हिरो आणि होंडाना पर्याय नाही म्हणून की फॅशन म्हणून त्यांनाच माहित. माझे मित्र आहेत ना काही, बाईकवर रस्त्याच्याकडेला गप्पा मारतांना सुद्धा ते कानातील काढणार नाहीत. Continue reading

अप्सरा

कालपासून सगळंच बदललं आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही आठच्या आत पहाट झाली नव्हती. पण काल मी सव्वा पाचला उठलो. आणि पळायला सुद्धा गेलो. जी घटना पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच घडली होती. आणि आज तर बळजबरी पाचपर्यंत अंथरुणात पडून होतो. एक माझ्या कंपनीत मुलगी आहे. असो, देवाची कृपा म्हणायची आधी ज्या मला आवडल्या त्यांना मी नाही आवडलो म्हणून. ती एक अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना! ‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’. अगदी बरोबर आहे. मी उगाचंच देवाला नाव ठेवत बसलो होतो. Continue reading

गुरु पोर्णिमा

परवाच्या ताज्या बातम्या, ‘गुरु’पोर्णिमा धुमधडाक्यात साजरी झाली. आपल्या आजींनी आणि बडी बेगमने कारागृहात नाही तीर्थस्थळात जावून गुरूंचे दर्शन घेतले. गुरूंनी देखील मोठ्या मनाने आशीर्वाद दिला अस ऐकण्यात आले. आणि बेगम बरोबर मनमोहन खान होताच! गुरूंनी या सर्वांना त्यांची गुरुवाणीने या शिष्यांना मंत्रमुग्ध केले. पुढच्या वर्षी सगळे शिष्य मिळून गुरूला ‘देशाचे नागरिकत्वाची’ भेट देणार आहेत अस ऐकायला मिळालं आहे. Continue reading

पावसाचे थेंब

गेल्या दोन तीन दिवसांपासून इतके मस्त वातावरण आहे ना! पावसाचे थेंब असले छान पडत आहेत. आत्ता तर, सूर्य नाही पण सीएफएल चा प्रकाश पडावा तसा प्रकाश पडला आहे. एकदम मस्त! मी आत्ताच भिजून आलो आहे. लोक एवढी पावसाला का घाबरतात कुणास ठाऊक? पाऊस पडत असतांना आकाशात बघायचं, ते कोटी कोटी थेंब पडतांना असले जबरदस्त दिसतात ना! आणि रात्रीच्या वेळी तर विचारूच नका. रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात पहा कसले छान दिसतात थेंब. अस शॉवर चालू असल्यासारखे वाटते. वातावरणात एक प्रकारचे चैतन्य आहाहा! Continue reading

पासवर्ड

आता इतक्या वेबसाईटची अकौंट झाली आहेत ना! आणि प्रत्येकाचे ते यूझर नेम आणि पासवर्ड लक्षात ठेवणे म्हणजे दिव्य आहे. आज ते जीमेलाचा पासवर्डमध्ये गोंधळ झाला होता. आठवतच नव्हता. सहा महिन्यांपूर्वी युझर नेम आणि पासवर्डसाठी एक एक्सेलची फाईल बनवून त्यात आठवेल तितके यूझर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवले होते. आणि त्याही फाईलचा पासवर्ड आता आठवत नाही. आता सगळेच पासवर्ड सारखे करायचा प्रयत्न केला होता. पण युझर नेमचे झंझटमुळे शेवटी सोडून द्यावी लागली. Continue reading