‘क’ची एकता

सकाळी कंपनीत जाण्यासाठी आवरत होतो. तेवढ्यात शेजारी भांडणाचा आवाज येत होता. काय झाल म्हणून मी बाहेर आलो. आणि पहिले तर शेजारी मोठ्या आवाजात टीव्हीवरील मालिका. अस दोन तीन वेळेस घडल आहे. एकदा रडण्याचा आवाज आला होता. म्हणून त्यावेळी देखील मी शेजारी पाहतो तर टीव्हीची मालिका. या एकता बाईनी सगळ्यांना त्या कौटुंबिक मालिकांनी वेड लावलं आहे. एक संपली की दुसरी. ती संपली की तिसरी मालिका. मालिका संपतच नाही. कुठे शेवटच नाही. मी टीव्ही पहातच नाही. पण हे शेजारी आहेत ना!! आवाज एवढा असतो की जणू काही माझ्याच घरात टीव्ही चालू असल्याचा आभास होतो.

त्या जितेंद्रने त्या बयेच जर वेळेवर लग्न करून दिल असते तर तिचीच ‘कसौटी जिंदगी की’ झाली असती. बर त्या बयेच ना संसार ना लग्न. मग हिला कल्पना कुठून सुचतात? देव जाणे. सगळ्या मालिकांची थीम एकंच. एक सुखी कुटुंब. आणि मग त्यात कोणी तरी मामा, काका येतो. नाहीतर मामी, आजी. आणि घरात कलह निर्माण करतो. आणि आणखीन मसाला म्हणजे घराघरातच लफडी होतात. आता आधी काकाकडे जेवण करायला जायचो. त्यांचा टीव्ही लावून जेवण्याचा अलिखित नियम. मग नाईलाजास्तव पाहावा लागायचा कार्यक्रम.

मुंबईला असतांना देखील माझी मावशीकडे देखील हेच. कॉलेजला असतांना एका काकूंकडे घरगुती मेस लावली होती. त्यांना देखील त्याच मालिकांचे वेड. बर कोणती कौटुंबिक मालिका बघा. त्याची दिग्दर्शक हीच एकता. बर एकता नावाचा अर्थ एक आणि हिच्या मालिकांनी सगळंच्या घरात ‘कलह’. कुठे आहे एकता? बर त्या मालिका संपता संपत नाहीत. हिरोईन त्रास सहन करते. हजार भागांनी शेवटी विजयी होते. मग तिची मुले. आणि त्याही पुढे जावून त्यांची त्याची मुले. संपत नाही. बर अनेक बोल्ड सीनचा मसाला असतोच. कोणाकडेही भेटायला जा. पहिले दोन मिनिटे ते आपल्याशी बोलणार. आणि पुढे एकताबाईंच्या मालिका सुरु होणार. मग जावून काय फायदा? अस प्रश्न पडतो.

माझ्या मासाहेब आधी दहाच्या पुढे जागत नव्हत्या. आता ‘इमॅजिन’ असलीच कोणती तरी मालिका साडे दहाला लागते. आणि ती मालिका पहाणे हा तिचा नियमच होऊन गेला आहे. टीव्हीवरील सगळेच कार्यक्रम चांगले नसतात अस मी म्हणत नाही. पण ‘एकता’बाईंचे सगळेच कार्यक्रम ‘फालतू’. पण त्या मालिका इतक्या ‘हिट’ कशा होतात हे सुद्धा आश्चर्यच म्हणल पाहिजे. माझ्या मित्राला असंच बोलतांना विचारलं की तू मालिका पाहतोस का, तर तो बोलला घरी गेलो की ‘मी पाहत नाही. पण गावी गेलो की ती बहिणी खातर पहावी लागते’. एकताला बहुतेक ‘क’ लकी दिसतो. कारण तिने काढलेल्या जवळपास सर्वच मालिकांची नावे ‘क’ ने सुरु होतात.

आता बघा ना ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कुछ इस तरह’, ‘कहानी घर घर की’, ‘करम अपना अपना’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कस्तूरी’, ‘कयामत’, ‘कसम से’, ‘के. स्ट्रीट पाली हिल’ , ‘कही किस्सी रोज़’, ‘कार्तिका’, ‘कब कैसे कहाँ’, ‘कभी सौतन कभी सहेली’, ‘कहानी तेरी मेरी’, ‘कही तो मिलेंगे’, ‘कहीं तो होगा’, ‘कैसा ये प्यार है’, ‘कलश’, ‘कम्मल’, ‘कॅडी फ्लोस’, ‘कन्यादान’, ‘कर्म’, ‘कर्मा’, ‘कश्ती’, ‘कविता’, ‘काव्यांजली’, ‘क़यामत’, ‘केसर’, ‘किंग – आसमान का एक राजा’, ‘कितनी मस्त है ज़िंदगी’, ‘कहना है कुछ मुझको’, ‘कुसुम’, ‘कोई दिल में है’, ‘कोई अपना सा’, ‘कोशिश… एक आशा’, ‘कॉस्मीक चॅट’, ‘कुछ झुकी पलके’, ‘कुछ खोना है कुछ पाना है’, ‘कुंडली’, ‘कुटुंब’, ‘क्या हादसा क्या हकीकत’, ‘क्या होगा निम्मो का’, ‘क्या कहें’. बस्स!!! क..क…सिरीयल तिने निर्मिलेल्या चित्रपटात देखील आहे. ‘कोई आप सा’, ‘क्या कूल है हम’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘कुछ तो है’, ‘क्यों की… मैं झूठ नहीं बोलता’. आणि हे सुद्धा झूठ नाही आहे. ‘क’ ची एकता.

Advertisements

3 thoughts on “‘क’ची एकता

  1. या मालिकांत दाखविल्याप्रमाणे आपलाही आचरटपणा-कावेबाजपणा यश देऊन जाईल या अपेक्षेने या मालिका पाहिल्या जातात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s