दाखला

दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत त्याच्या कॉलेजात गेलो होतो. त्याने एम.बी.ए करायचे ठरवले आहे. त्यासाठी त्याला हरवलेल्या दाखल्याची नक्कल हवी होती. जातांना मला त्याचा प्राचार्याने आदल्या दिवशीच्या दिलेल्या ‘दाखला का हरवला?’ याविषयावरील व्याख्यानाचा सारांश सांगत होता. आम्ही दोघेही कॉलेजमध्ये प्रवेश करताच त्याच्या जुन्या आठवणी धरणाचा बांध फुटून वेगाने पाणी पसरावे. तसे याच्या आठवणी आणि किस्से मला सांगत सुटला. मस्त! सगळे इथून तिथून सारखेच असतात. प्राचार्यांनी त्याला आधल्या दिवशी दाखला हरवला म्हणून पोलिसात एफ.आई.आर करायला लावली. आता ह्याच्या सर्व महत्वाच्या कागदपत्रांची अख्खी फाईलच हरवली. त्यात तो दाखला देखील गेला. प्राचार्यांच्या केबिनमध्ये आधीच कोणी तरी होते. म्हणून अर्धा तास वाट पहावी लागली.

आतमध्ये सहीसाठी माझा मित्र गेल्यावर आदल्या दिवशीचा व्याख्यानाचे शेवटचा अंक पाहायला मिळाला. तिथून मग आम्ही बाजूच्या एका मोठ्या हॉलमध्ये असलेल्या अकाऊंट सेक्शन मध्ये गेलो. आता तिथे प्रत्येकाची लहान लहान केबिन. आणि जुन्या बँकेच्या रुपाला शोभेल अशा काचा आणि काचेवर कुठला सेक्शन आहे त्याचे नाव. ह्याने तेथील अकाऊंटंट बाईंना दाखल्याची नक्कल हवी आहे आणि त्यासाठी लागणारे पैसे किती याच्या चौकशीला तोंड उघडल तर बाईंना अंगावर पाल यावी तसे बाईंनी ‘अकाऊंटची वेळ तर कधीच संपली’. अस उत्तर देऊन मोकळ्या. ह्याने मला कंपनीतून सुट्टी मिळणार नाही. आणि जेवणाच्या वेळी आलो तर दुपारचं होईल. पण त्या बाई ह्याचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी ‘तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला सांगून काय फायदा?’. खूप वेळ घासाघीस चालू होती. तीही ऐकून घेत नव्हती आणि हाही पठ्या पिच्छा सोडत नव्हता. मी आपला बाजूला उभा राहून हा ‘रिअलिटी शो’ पहात होतो. कारण मला काही ती काम करेल अस वाटत नव्हते.

मी सहज बाजूच्या सेक्शनमध्ये काय करतात हे बघत होतो तर तिथे एक बाई विद्यापीठाचे निकाल विद्यार्थ्यांना देत होत्या. सुरवातीला एक दोघांना ‘पेढे घेऊन ये मग रिझल्ट देते’ असा प्रेमळ हुकुम देत होत्या. आणि ती मुलेही आनंदात पेढे आणून देत होती. इकडे शेवटी ती पैसे जमा करणारी बाईंना आधी विचार अस म्हणाली. मग हा तिथे जाऊन तेच ‘पिच्छा’पुराण सुरु केले. आणि ती देखील ह्याचे म्हणणे ऐकून घेण्याआधीच नन्नाचा पाढा सुरु केला. शेवटी तिने थकून आधी वाचनालयातून सही आण, मग पुढचे काय ते बघू अस म्हणाली. मग आम्ही बाजूच्या एका मोठ्या इमारतीत गेलो. कॉलेजचे वाचनालय ठीकठाक होते. आत गेल्यावर बाजूच्या ‘ओळखपत्राशिवाय सहीशिक्का मिळणार नाही’ची पाटी होती. ह्याने त्याचा दाखला मिळावा असं कॉलेजचा अर्ज त्या प्युन समोर ठेवला. त्याने अर्ज पाच एक मिनिटे बघितलं मग म्हणाला ओळखपत्र. माझ्या मित्राने ‘पॅनकार्ड, ड्राइविंग लायसन्स दाखवले’. तर तो प्युन ‘कॉलेजचे ओळखपत्र दाखव’ अस म्हणाला. मित्राने ‘मी १९९६ साली कॉलेज सोडले. आता २०१० ला कसा काय माझ्याकडे ओळखपत्र असेल?’. मग त्या प्युनसाहेबांनी ‘कॉलेज प्रवेशाच्या पावत्या दाखव’ असा वटहुकूम दिला.

झालं! मला हसू आवरेना! माझा मित्र माझ्याकडे हसत त्याला म्हणाला ‘मी १९९२ साली प्रवेश घेतला होता. त्यावेळचे कोणतीच कागदपत्र माझ्याकडे आत्ता नाहीत’. मग त्या प्युनने एक सुस्कारा सोडला आणि ‘शिक्का मिळणार नाही’ असा निर्णय सुनावला. ह्याचाही पुन्हा ‘पिच्छा’पुराण सुरु झाले. मग हो नाही करता त्या वाचनालयाचे मुख्य साहेब आले. आमच्या दोघांच्या समोर एक व्यक्ती कुठेही काही न विचारता आत गेला आणि एक कागदावर सही करून घेतली. आणि शंभर रुपयाची भेट त्यांना दिली. मुख्य साहेब नको नको करीत होते पण त्यांने घ्या असा आग्रह केला. त्याच्या नंतर माझ्या मित्राला सही आणि शिक्के मिळाले. पुन्हा बाहेर येतो तर ती दाखल्याची फी जमा करणारी बाई भेटली. आणि ‘आम्ही किती काम करतो’ याचे दहा पंधरा मिनिटांचा एक सेशन उभ्या उभ्याच घेतला. मग पुन्हा पहिल्या इमारतीत त्या अकौंटंटकडे पुनः तेच. बाजूलाच ते ‘रिझल्ट’ सेक्शन. तिथे एक मुलगी आली. तशी छान होती. तिने तिची गुणपत्रिका मागतली. तर बाईंनी तोच पेढ्यांचा ‘प्रेमळ’ हुकुम सोडला. सोडा आपण ‘प्रेमळ’ हुकुमबद्दल नंतर बोलू. तिने नुसते गुणपत्रक दाखवा अस बाईंना विनंती केली तर बाई हो नाही करायला लागल्या. शेवटी दाखवली.

आता ती माझ्या बाजूला गुणपत्रिका बघत होती त्यामुळे ती गुणपत्रिका मलाही पाहायला मिळाली. मुलगी हुशार होती हो! फर्स्ट क्लास. ती खूप आनंदी होती. माझ्याकडे बघून एक मस्त ‘स्माईल’ दिली. आणि पेढे आणायला गेली. इकडे दोस्ताचे काम झाले. दोन दिवसानंतर मिळेल अशी भविष्यवाणी केली. ते हसणे दोस्ताने कुठून बघितले कोण जाणे. बाहेर आल्यावर ‘कवळी शेंग कशी वाटली?’ अस खोचकपणे नेहमीचेच पुराण सुरु केले. तिने पेढे आणल्यावर देखील वन्समोअर ‘स्माईल’ दिली. आता मला सांगा, आनंदात कोणीही हसेलच ना! असो, तिथून निघतांना जणू काही कोर्टाची केस जिंकल्याचा आनंद दोघांनाही झाला होता.

Advertisements

2 thoughts on “दाखला

  1. इथे कोरियात वेगळा अनुभव आला. इथे एक सेट ओरिजिनलचा मगितला. मी विचारलं परत कधी देणार, तर म्हणाली, परत कशाला हवे ?

    मग तिने सगळे समजुन घेतले आणि हसायला लागली कारण इथे मशिनमधुन जितक्या हव्या तितक्या प्रती (सगळ्या ओरिजिनल) घेता येतात. 🙂

    मलाही असेच झटके घ्यावे लागले होते, माझ्याच डीग्रीसाठी.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s