लाच

मागील शुक्रवारी मी माझ्या कॉलेजच्या कामानिमित्ताने संगमनेरला गेलो होतो. अकराला शिवाजीनगर मधून बस पकडली. खडकी चौकाच्या सिग्नला बस थांबली. मी आपला सहजच बाहेर बघत होतो. तर एक आर.टी.ओ पोलीस एका कारवाल्याशी काही तरी बोलत होता. बहुतेक त्याने सिग्नल तोडला असावा. अंतर जास्त आवाज तर काही ऐकू येत नव्हता. पण थोड्यावेळाने त्या कारवाल्याने त्याच्या पाकिटातील शंभर रुपयांची एक नोट काढली आणि त्या पोलिसाला दिली. पोलिसाने पैसे खिशात टाकले. मला वाटलं की, आता पोलीस त्याला पावती देईल. पण नाही.

असो, शुक्रवारी कॉलेजला जाऊन काही फायदा झाला नाही. शनिवारी पुन्हा जावे लागले. संगमनेरहून नगराची बस पकडली. राहुरीला उतरलो तर समोरून गावची बस गेली. संध्याकाळची साडेसहा होती. मग काय पुढची बस तासाभराने. साडे सातच्या बसमध्ये मित्र भेटला. तो एका शाळेत शिक्षक होता. पण शाळा अनुदानित नव्हती. दोन वर्ष फुकट काम केले. बीडमधील एका अनुदानित शाळेत जागा निघाल्या. तिथे नोकरीसाठी त्याने प्रयत्न केले. पण तिथे त्याला सात लाख रुपये देत असशील तर ताबडतोप नोकरी देतो असे सांगण्यात आले. मग हा आता एका बँकमध्ये शिपायाची नोकरी करतो आहे. काल मित्राशी गप्पा मारतांना असंच बाईकचा विषय निघाला. त्याला म्हटलं मला बाईक शिकून लायसन्स मिळायला निदान पंधरा दिवस जातील. तर तो बोलला. पंधरा दिवस कशाला लायसन्स लागतात? तुला बाईक न शिकताही तीनशे रुपयांत एका दिवसात घरपोच लायसन्स मिळून देऊ का? त्याला विचारले कसे काय?. तर तो म्हणाला, माझ्या ओळखीचे अनेक एजंट आहेत.

माझ्या एका मित्राने त्याच्या सरकारी नोकरीतील बायकोची बदली त्याच्याच घराजवळ करून घेण्यासाठी वर्षापुर्वी एक लाखाची लाच दिली होती. आमच्या पुण्यात ‘लाच’ संस्कृतीने ‘न भूतो ना भविष्यती..’ अशी रेकॉर्ड बनवली आहेत. निगडीतून विलासराव देशमुखांचे तर पुण्यातून लादेनचे रेशनकार्ड तयार झाली. मध्यंतरी लाखो रुपयांचे कस्टम ड्युटी बुडवून आणलेले सोने राका ज्वेलर्स आणि इतर ज्वेलर्स बंधूं आयुक्तांना भेटून ‘शुद्ध’ करून टाकले. खरंच नाही सहन होत आता. नेहमीच हे ‘प्रेक्षकगिरी’ आता मला ना जाम कंटाळा आला आहे. या सगळ्याचा इतका अतिरेक झाला आहे ना! आता ‘अतिरेक’ करावाच लागेल. त्या ‘क्रिकेटमंत्र्याची’ तीनशे एकर जमीन मुळशी ते निगडी रस्त्यालगत आहे. आता कुठून आली? सोडा, नुसते बोलून काही होणार नाही. बाकी बोलूच.

Advertisements

6 thoughts on “लाच

 1. महेंद्रचा सल्ला अतिशय योग्य वाटतो.
  एक तर आपल्याला घरावर तुळशीपत्र ठेवूनच या भडव्यां सोबत लढाव लागणार किंवा त्यांच्या सारखच व्हाव लागणार.
  सामान्या माणसाची सहनशक्ति आता संपत आली आहे. कधितरी याचा स्फोट होणार याची चिन्ह दिसायला लागली आहेत. अन्यथा भाजपचा ५ जुलैचा भारत बंद यशस्वी झालाच नसता. या दिवशी मी भाजप- सेनेच्या कार्यकर्त्यांशिवाय बर्‍याच सामान्य लोकांना पण घोषणा बाजी करताना बघितल.
  तसा बघितला तर सेनेचाही फार दबाव नव्हता पण लोकांनीच हा बंद यशस्वी केला.

 2. पोलिसाला शंभराची नोट देणार्‍या गाडीवाल्याला दंड भरण्यास उद्युक्त करण्याची तयारी असल्याखेरीज ही कामे हाती घेण्यात अर्थ नाही.

 3. वरूण
  मानसिक त्रास होतो विनाकारण . आपण काही करू शकत नाही, मग वैफल्याची भावना येते मनामधे. म्हणून म्हंटलं तसं. दुसरं करू तरी काय शकतो आपण?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s