ती कशी असेल?

यार, या आयुष्यात किती काळ अशी उत्कंठा राहणार? नुसतेच रोज विचार करायचा ‘ती’चा. देव सुद्धा ना! अस आपल्याला कळायला हव होते. रोज एखादी छान मुलगी दिसली की वाटते ‘ही आपली झाली तर!’. स्थळाच्या वेळी देखील असेच. पण शेवटी सगळे फूस. कंपनीत ज्या आवडतात त्यांना एकतर कोणी ना कोणी असते. किंवा हजार मित्र असतात. मग लढाईच्या आधीच पराभव. बर त्या हजारांच्या डोक्यात काय चालले आहे हे त्यांच्या तोंडवरूनच दिसत असते. बर मग ती नाही तर नेमकी कोण आहे हे जर कळले असते तर, जाता येत हजारदा होणारे हृदयाचे तुकडे तरी झाले नसते.

‘ती’ कशी असेल यावर रोज विचार करून करून आता काही दिवसांनी माझे काळे केस पांढरे तर नाही होणार ना याची भीती वाटते. इथे पुण्यात आल्यापासून ना, मी एकटा असल्याचा अनेकदा अनुभव येतो. कारण इथे रस्त्यावर, बागेत, जिकडे जाल तिकडे ‘कपल्सच’ असतात. आणि त्यांना बघून इच्छा आणखीन वाढणार नाही तर काय कमी होणार काय? त्यांना बघून मलाही कोणी असावे अस खूप वाटायला लागते. बर, यावर कोणाशी बोलायला गेलो तर तो काही तरी नवीनच सुरु करतो. माझ्या मैत्रिणीला परवा सांगत होतो कंपनीतील एका मुलीबद्दल. तर तिचा चेहराच पडला. उगाचंच सांगितले असे नंतर वाटायला लागले. मित्रांचा विषय तर सोडून द्या! त्याचं भलतंच चालू असते. आई वडिलांना तर सांगू शकत नाही. उरले भाऊ बहिण. ते इतके लहान आहेत ना! त्यांना काही सांगून काही कळणार नाही.

आणि बहिणाबाईला सांगायला गेलो की, तिचे आपले ‘अस होतच’ सांगून विषय टाळून देते. काय करू काय सुचत नाही. बर, विचार घालवण्यासाठी टीव्ही किंवा चित्रपट लावला तर इच्छा कमी होण्याऐवजी अजूनच वाढते. आणि बातम्या बघून डोक सरकते. पण विषय काही कमी होत नाही. झोपलं तर, रात्री चित्र-विचित्र स्वप्न पडतात. वडिलांनी सांगितलेला ‘जप’ किंवा ‘देवपूजा’ सोडली तर बाकीच्या वेळी डोकं हाच कायम विषय. ती कशी असेल? दिसेल त्या मुलीत मी तिला पाहतो. आणि मुर्खासारखा तिच्या प्रेमात पडतो. आणि तिच्या सोबत कोणाला बघितले की दुखी देखील. अस रोज शंभर वेळा घडते. एकतर कोणी भेटत नाही. आणि विषय देखील संपत नाही. आणि कोण भेटणार हे देखील कळत नाही. आजकाल मित्रांसोबत रस नसलेल्या विषयात गप्पा मारतांना जाम कंटाळा येतो. कधी येणार यार?, असो!

Advertisements

13 thoughts on “ती कशी असेल?

  1. काय नसेल तिथे हा विचार केला की ह्या “विषयाला” गवसणी घालता येईल…

    चिंतन अवश्य करावे 🙂

    गरज वाटल्यास “रिस्क” नांवाची कविता (सापडेल कुठल्यातरी ब्लॉगवर.. नाही सापडली तर जाहीर कबुली द्या म्हणजे आम्ही ती खास लोकाग्रहास्तव छापू) वाचावी… कारण आपण कधीच रिस्क घेत नाही… !

  2. पदरी पडलेले पवित्र करून घेण्याची आपली हिंमत आहे हे आपण विसरलात काय?

  3. अरे जशी तुझी स्थिती आहे तशीच तुझ्या ‘ती’ची पण असेल. एक दिवस तुमची भेट नक्की होईल, काळजी नको करू…:)

  4. आमची पण अशीच परिस्थिति आहे…….आम्ही मित्रानी तर कन्क्लूजन काढून टाकले आहे जगातल्या सगळ्या भारी मुली संपल्या आहेत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s