ऊऊउऊऊ…

ओळखलं असेलच! आज त्या ऊउउssss चा वाढदिवस आहे. काहीही म्हणा पण त्याच्या गाण्याचे किती उपयोग आहे. म्हणजे परवाचीच गोष्ट. कंपनीतून निघतांना कंपनीची बसमध्ये खूप गर्दी झाली. बसमध्ये उभा राहून प्रवास केलेला चालत नाही. आणि बस खचाखच भरलेली. थोडक्यात पीएमपीएल झालेली. आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. त्या ६:४५ च्या बसनंतर पुढची बस आठ वाजता असते. त्यामुळे कोणीही उतरायला तयार नव्हते. आणि एवढी गर्दी पाहून चालक देखील बस न्यायला तयार होईना.

माझे एक अँडमीन मधील मित्र जावून दुसरी बस, किंवा कॅबची व्यवस्था होती, का ते पाहत होते. पण काही उपयोग झाला नाही. मग शेवटी चालक न्यायला तयार झाल्यावर ७:२० ला सुरु केली. त्या बसमध्ये तो चालक नेहमी रेडिओ लावत असतो. जुने गाणी चालू असतात त्या ‘विविध भारती’वर. आणि ती गाणी ऐकून ज्यांनी कानात घातले नसेल ते झोपून जायचे. म्हणजे ‘हेडफोन’ अस म्हणायचे होते. पण परवा त्याने हिंजवडी ते डांगे चौक पर्यत ‘ऊऊउ’ची ‘ऊउउssss’ गाणी लावली. झाले! मी फारच मागे बसलो होतो. आणि पावसाच्या कृपेने आवाज तो ऊउउssssऊउउssss फार येत नव्हता. पण जे काही ऐकू येते. आणि वातावरणामुळे जाम झोप आली होती. देवाची कृपा म्हणायची मी खिडकीच्या जवळ बसलेलो होतो.

थोड्या वेळाने जाग आली तर पाहतो तर बाजूची मुलगी डोक्याला हात लावून बसलेली. बाकीचे ज्यांच्याकडे कानातले नव्हते ते जणू काही थर्ड डिग्री वापरल्याप्रमाणे त्रासलेल्या चेहऱ्याने बाहेर आपले मन रमायचा बळजबरी प्रयत्न करत होते. त्या दिवशी घरी पोहचायला साडे आठ वाजले. मग त्यानंतर त्या बसने जायचे नाही म्हणून ठरवले. काल मग त्याच्या आधीच्या बसने म्हणजे सव्वा पाचच्या बसला गेलो तर परवा बघितलेले अनेक चेहरे काल सव्वा पाचच्या बसला होते. असो, इति श्री ‘ऊउउ’ कृपा. बघा, जर कधी तुम्हाला कोणाला टाळायचे असेल, पण तरी तो आला तर त्याला तुमच्या चारचाकीत बसावा आणि ‘लाँग ड्राइव्ह’ घेऊन जा. आणि गाडीत ते ‘ऊउउ’ ची ‘ऊउउssssऊउउssss’ गाणी ऐकवा. पुन्हा कधी तो तुमच्या सोबत येणारच नाही.

मी तर म्हणतो, कसाबला ऊउउssssऊउउssss गाणी ऐकवा. तो स्वतःच फाशी घेऊन स्वत:ला संपवून टाकेल. फार अतिशयोक्ती करत नाही. ऊउउ एक चांगला संगीतकार आहे. पण नोझ सिंगर आहे. आणि एक थर्ड क्लास अभिनेता आहे. मुळात त्याला पहिले की जवळपास सगळ्यांनाच इरिटेड होते. असो, आज त्याचा वाढदिवस आहे. आणि सुरांची पुण्यतिथी!!!

Advertisements

One thought on “ऊऊउऊऊ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s