अप्सरा

कालपासून सगळंच बदललं आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही आठच्या आत पहाट झाली नव्हती. पण काल मी सव्वा पाचला उठलो. आणि पळायला सुद्धा गेलो. जी घटना पाच वर्षापूर्वी फक्त एकदाच घडली होती. आणि आज तर बळजबरी पाचपर्यंत अंथरुणात पडून होतो. एक माझ्या कंपनीत मुलगी आहे. असो, देवाची कृपा म्हणायची आधी ज्या मला आवडल्या त्यांना मी नाही आवडलो म्हणून. ती एक अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना! ‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’. अगदी बरोबर आहे. मी उगाचंच देवाला नाव ठेवत बसलो होतो.

गावी असतांना एक मुलगी आवडली. पण ती अचानक एका दिवशी गायब झाली. वर्षानंतर कळल ती बी. एड साठी पुण्यात आली. मी मुर्खासारखा तिची वाट पहात बसलो. पुण्यात आलो तर तिचे कॉलेज कुठे आहे ते कळल पण बी.एड सुद्धा एकाच वर्षाचे असते हे देखील कळले. नंतर मी इकडे पुण्यात आणि ती गावी. मग असाच दीड वर्ष रडत बसलेलो. नंतर तिच्यासारखीच एक आवडली. पण तिने तिच्या आवडत्या मुलाशी लग्न केले. झाल! मग पुन्हा दुख: मग माझ्या जुन्या कंपनीतील एक मैत्रीण छान वाटायची. पण तिला माझ्यात रसच नव्हता. या कंपनीत आलो तर ‘परी’. पण तिलाही खूप ‘भाऊ’. सोडा! एकूणच वाळवंटात असल्याप्रमाणे! प्रेमाच्या पाण्याचा शोध. पण सगळे मृगजळ! नुसतीच धावाधाव!

पण माझ्या कंपनीतील ती ‘अप्सरा’. काय सांगू तिच्या बद्दल. अजूनही माझा माझ्यावरच विश्वास बसत नाही आहे. किती छान आहे. ते डोळे, तो चेहरा, ते रूप ती काया! मला खर ना! तिला पहिल्यापासून दुसर काहीच सुचत नाही आहे. काय करू आणि काय नको अस होते आहे. ती माझ्याच फ्लोरवर बसते. आणि माझ्या डेस्कच्या जवळच तिचाही डेस्क आहे. ती ज्यावेळी समोर येते त्यावेळी माझी हिम्मतच होत नाही तिच्याशी बोलायची. पण हृदयाचे इतके ठोके जोरजोरात होतात ना की, जर कधी मी हृदय विकाराने गेलो आणि बारावा तेरावाला जर कावळा शिवला नाही तर ‘अप्सरा अप्सरा’ म्हणायला सांगा गुरुजींना. ती खूप छान आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी कोणाची मी इतकी माहिती काढली. तिचे घर, मोबाईल नंबर, याआधी कुठे होती ते. सगळी सगळी माहिती काढली. याआधी अशी कोणत्याच मुलीची माहिती काढली नव्हती. यावेळी रहावलच नाही.

गेल्या दोन दिवसात स्वप्नात देखील तीच येते आहे. मुळात झोपच कुठे गेली आहे तेच कळत नाही आहे. आणि कशीबशी लागली तर स्वप्नात देखील तीच. आणि इतक छान वाटते आहे ती आहे तर! सगळीकडे आनंदी आनंद वाटतो आहे. आज मी सकाळी तर कंपनीत येतांना देखील मस्तपैकी पावसात भिजून आलो आहे. सगळे छत्री का नाही आणली अस विचारत होते. आता त्यांना कस सांगू मन किती भिजले आहे अप्सरेच्या प्रेमात. खरंच आता अप्सरा सोडून देवाने काही नाही दिले तरी चालेल. हीच हवी होती. आत्ताही मी पाणी भरायला ‘पॅंट्री’त गेलो होतो. त्यावेळी ती देखील आली होती. किती गोड आहे. गोड नाही ‘गोडू’ आहे. ती ज्यावेळी माझ्याकडे पाहते त्यावेळी काय सांगू मनात काय काय होते. मला ती सोडून मुळात कुठेच रस नाही राहिलेला आहे. कुठेच काहीच अडचण नाही. वडिलांची अपेक्षा पत्रिका जुळायला हवी. मी पहिले तर तिचे आणि माझे साडेसत्तावीस गुण जुळतात. आईला हवं की, आपल्या जातोतोल हवी तर ती आहे माझ्या जातीतील. फ़क़्त बहिणाबाईला मानवावे लागेल. ते होऊन जाईल! तिच्याशी कस बोलू हाच काय तो मोठा प्रश्न आहे. बस्स!

Advertisements

15 thoughts on “अप्सरा

 1. पु. लं. चा म्हाळसाकांत पोम्बुर्पेकर आठवला..

  मार खाऊन इस्पितळात भरती झाला तरीही तिथेही : “चंद्राबाई नर्सच्या हसण्यातून चांदणे सांडते..”
  चालू दे..

 2. काय चालले आहे तुझे ? ठीक आहेस ना? अरे नेहमीचा तुला कोणी तरी आवडत असते ……… तुझा ब्लोग जर तिने वाचला ना …………. तर नक्कीच तिचे धाबे दनानांतील ……… तुझा ऑफिस मधील तिला माहित नाही का तू हा ब्लोग लिहितोस ते???????? ……. तिला हा ब्लोग वाचिला सांग…..म्हणजे तुला काहीच बोलीची गरज नाही …… ती तुला स्वताहून येवोन उत्तर देयील ………..तुला खूप खूप शुभेछा

  best of luck my dear friend…………… 🙂

 3. अरे हेमंत भाऊ, तीच मत पण जाणून घ्या कि…….. आणि ते करण्या करिता तुला तिच्याशी बोलावेच लागेल … एकदा मिया बीवी राजी तो क्या करेगा काजी

 4. हेमंता,
  मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय…पण तू बोल की रे जाऊन…माझ्या सगळ्या प्रार्थना वाया जातील नाहीतर…!

 5. अरेरे…
  काय खरं नाय आता तुमचं…
  परफॉर्मन्स अप्रेझल खड्ड्यात जाणार…

 6. यंदा बार उडवूनच टाकला पाहिजे,
  नाहीतर तुझं काही खरं नाही…
  सांगू का तुझ्या बाबांना ?

 7. नमस्कार, भावना छान आहेत. खरंच तिला मिळवायची इच्छा असेल तर ओव्हर एक्साईट्मेंट बाजुला ठेवा. तिला स्पेशल ट्रिट करणं सोडा. मित्राशी बोलता तसं सहज बोला. तुमच्यतली खास गोष्ट तिला नकळत दिसू द्या. तिला तुमच्यातला आत्मविश्वास दिसावा. ओळख वाढेल तशी तुम्ही तिची काळजी करता आक्रस्ताळी स्वभाव नाही याची खात्री तिला पटेल असं वर्तन ठेवा. सुहृदासारखे वागा. समान आवडीनिवडींचा कधी कधी फायदा होतो. त्या आहेत का ते शोधा. बाकी सल्ले नंतर.
  सध्याला शुभेच्छा !

 8. अरे हेमंता,
  तुला या विषयावर बरेच सल्ले मिळणार असे दिसतय ! सध्यातरी सोनल व साधकचा सल्ला मोलाचा वाटतोय.
  साधकच्या म्हणण्याप्रमाणे फक्त मैत्री कर. त्यानंतर सोनलच्या सल्ल्यप्रमाणे एक दिवस तुझा ब्लॉग सांग व त्यानंतर तिच्या वरचे आजचे पोस्ट !
  या सर्व सल्ल्यांचा काही चांगला परिणाम झाल्यास आम्हाला विसरू नकोस !

  अजय.

 9. arre mazya raja nusta blog lihinyatach vel nighun jaeel …blog big lihina band kar ani jar tila posayachi himmat tuzyat asel tar saral magani ghaal…nahitar tihi geli ki punha navin blog lihit basasil…amhala kay fukatacha vachayala milata baas zaala…pan tuz re kaay….valun jasil fukatacha….barachya bhavat khapayacha nasel tar lovkar nirnay ghe…
  tuzya pudil blogchi vaat pahtoy….(arthath good news chi…)
  –Anmol

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s