डोक

आज डोक जाम दुखत आहे. कशामुळे त्याचे कारण कळत नाही आहे. आता मला डोके आहे की चर्चा नको. उगाचंच, ‘लोकसभा’ नको. तिथे देशातील सर्वात हुशार प्राणी आपली कला सादर करीत असतात. आता त्यांना डोक आहे की नाही यावरही चर्चा नको. उगाचंच, एकमत होईल. तसे म्हटले तरी ते देखील हाच विचार करीत असतील. कारण आपणच त्यांना तिथे बसवतो. मग पुढे ते काय करतात ते दिसतेच आहे.

आता, नेमके कोण मूर्ख? उत्तर सोप आहे. एकही आमदाराने सीमाप्रश्नावर राजीनामा दिला नाही. साधी धमकीही दिली नाही. खोटे खोटे सुद्धा नाही. बाजूच्या आंध्रात ९०% आमदारांनी तेलंगाना प्रश्नात दिले होते. आता या दोन राज्यातील नेमके डोक कोणत्या आमदारांना आहे? बस आता माझे डोके अजूनच दुखायला लागले आहे. सोडा तो विषय. डोक्यात काहीही सुद्धा आज येत आहे.  मुळात हे विचार का येतात तेच कळत नाही. ज्या गोष्टी कधी घडणार नसतात पण त्या गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात. याच डोक्यामुळे आनंद आणि दुख. त्याचाच परिणाम शरीरावर होतो. आपण आनंदी असेल तर शरीरही काही तक्रार करीत नाही. पण दुखी असेल तर ताबडतोप परिणाम जाणवतो. म्हणजे आपले डोळ्यातून तसे दिसूनच येते. आणि शरीरही दुखी असेल तर डोके देखील. बोलण्यातून जाणवतेच.

बहुतेक खूपच बोर करतो आहे मी! मला फक्त अस म्हणायचे होते. डोक्याचा आणि शरीराचा खूप संबंध आहे. मुळात शरीराचा डोक हा एक भाग आहे. आता माणसाच्या बाबतीत हे खरे आहे. देशाच्या बाबतीत मला काहीही नाही बोलायचे. देशाला डोके आहे. पण त्याचा आणि देशाच्या शरीराशी काही संबंध नाही. बघा ना, कालच एक बातमी आली की नक्षलवाद्यांनी देशात वर्षात ५०० हल्ले केले. काय झाल का देशाच्या डोक्याला? काही नाही ना. आपणही देशाच्या डोक्यासारखेच आहोत. काहीच हालचाल करत नाही. आजूबाजूच्या घडणार्या घटनांवर नुसतेच प्रेक्षकगिरी. अजूनही तेच विचार येतात. आपण शांत का बसतो? सोडा, माझही डोक आज भलतीकडेच चालू आहे. नंतर बोलू..

Advertisements

2 thoughts on “डोक

  1. –बहुतेक खूपच बोर करतो आहे मी!

    अखेरीस तुला कळलं म्हणायचं तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s