काकूंची कृपा

आज दुपारपर्यंत तिला एक मिनिट सुद्धा मला ढुंकून बघायला वेळ नव्हता. आणि मी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे. तडफडत होतो. काही नाही. एकदाचं माझ्या बाजूने गेली. पण मला न बघता. आज माझ्या मित्रांसोबत मी कंपनीच्या नवीन कॅन्टीनमध्ये गेलेलो. ती नेहमी तिथे जेवण करते. वाटलं ती तिथे असेल. पण गेल्यावर खूप शोधलं पण ती नव्हती. मग जागा शोधून एका ठिकाणी बसलो. माझ्या एका मित्राने ती आजकाल जुन्याच कॅन्टीनमध्ये जेवते अस सांगितले. मग माझाच मला राग आला. कशाला इकडे तडफडलो अस झालेलं. पण काही उपयोग नव्हता. कारण माझ्या सोबत असलेले दोन मित्र कुपन घेऊन रांगेत उभे होते. Continue reading

Advertisements

पुन्हा तेच..

पुन्हा तेच. कस बोलू? यार आज ती खूप छान दिसत आहे. काल आजारी होतो. काही नाही. थोडा ताप आणि सर्दी. त्यात तो खोकला खूप कमी झाला आहे. पण गेलेला नाही. त्यामुळे कंपनीला बुट्टी झाली. तिची खूप आठवण आली. दिवसभर, झोपून होतो. मित्राचा सकाळी फोन आला होता. तेवढ्यापुरता उठलो. मग काय, त्याला विचारले ‘ती आली का?’ तर ‘नाही’ बोलला. तीन वाजता पुन्हा जाग आली. त्यावेळी मग मी मित्राला फोन केला. तर माझ्याशी ते टाईमपास करत बसलेले. मला म्हणाले ती आज टेन्शन मध्ये आहे. एक सेकंदसाठी खूप विचारांचे काहूर माजले, पण नंतर स्वतःला सावरले. Continue reading

चीड

मी शाळेत असतांना मला शाळेतील मित्र खूप चिडवायचे. अगदी दहावी पर्यंत. आणि मी चिडून देखील जायचो. मला ‘आठल्या पिठल्या’ म्हणायचे. आता हसू येत. पण त्यावेळी खूप राग यायचा. चौथी पर्यंत मी मग कोणी चिडवले की त्यांच्याशी भांडायचो. म्हणजे हाणामारी. तोंडाने काहीच नाही बोलायचो. आणि मग मी रडत आणि ते हसत घरी यायचो. अस चौथी पर्यंत चालले. मग वडिलांनी ‘कोणी चिडवले की त्याला मारायचे. पण त्याने एक ठोसा मारला की त्याला दोन ठोसे द्यायचे’ अस सांगितले. Continue reading

शिवरायांचा इतिहास २०२०

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता कधी झाला याची तारीख राज्यशासन ठरवेल त्या तारखेला झाला अस मानायला काही हरकत नाही. त्यांची आई जिजाबाई. त्यांचे वडील शहाजी राजे. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले. त्यांना दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज या सर्व टीचर्स ने शिकवले. पण यातील कोणीच त्यांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी स्वराज्याची’ स्थापना केली. आणि स्वराज्याची पताका म्हणून तिरंग्याची निवड केली. शिवरायांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकून स्वराज्य चौफेर पसरले. परंतु शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते. अगदी महात्मा गांधी प्रमाणे. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशहाला डोळ्यात खुपणारा होता. म्हणून आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले. Continue reading

इटलीची किटली

इटलीची किटली, युवराजला विमानात भेटली|
दिसताच युवराजच्या काळजात प्रेमाची आगच पेटली|
लगेचंच युवराजच्या प्रेमाची लावली तिने टिकली|
इटलीची किटली|| Continue reading

प्रेम आणि आकर्षण

म्हटलं तर फार फरक नाही. आणि म्हटलं तर खूप फरक आहे. म्हणजे खरं सांगतो. अप्सरा भेटण्याच्या आधी मला दर दहा मिनिटाला एक आवडायची. मुळात मुली एवढ्या सुंदर का असतात हाच न सुटलेला मला प्रश्न आहे. कालच्या त्या एका प्रतिक्रियेने मलाही थोडा वेळ असंच वाटलं होत, की मी अप्सराच्या सौंदर्यावर फिदा आहे? की मला ती खरंच आवडते? काल ती दिवसभर कुठे गायब झाली कुणास ठाऊक आणि त्यात ती प्रतिक्रिया. असंच अप्सरा बद्दल विचार करीत चाललो होतो. तर संध्याकाळची पाचची बस चुकली. मग आणखीन वैताग आला. कारण त्यापुढची बस ७:४५ ला. मग जणू काही जेल मध्येच आहे अस वाटायला लागले होते. ती नव्हती तर कंपनीत एक एक मिनिट काढणे खूप त्रासदायक वाटत होते. पुन्हा माझ्या फ्लोरवर जाण्यासाठी निघालो. मनात तिची इतकी आठवण दाटून आली होती ना! गंगा यमुना यायच्या बाकी होत्या. Continue reading

शोधू मी..

कुठे गेली यार ती! मी ना इतक्या ‘गाढवचुका’ करतो ना. माझा मलाच राग येत आहे. सकाळी ती कॅन्टीनमध्ये दिसली होती. आणि एकटी बसली होती. पण नेहमीप्रमाणे मी हिम्मतच नाही करू शकलो तिच्याशी बोलायची. आणि नंतर ती पुन्हा कुठे गायब झाली कुणास ठाऊक! अजूनही परतली नाही. मला खूप टेन्शन आल आहे. यार काय करू? डोके खूप दुखते आहे. सकाळपासून तिच्या डेस्ककडे पाहतो आहे. आज सुद्धा ती खूप छान दिसत होती. बोललो असतो तर काही फरक पडला नसता. आता दोन दिवस कसे जाणार? खरंच काही सुचेनासे झाले आहे. Continue reading