बोललो

हुश्श!!! बोललो एकदाचा. किती छान हसते ती. माझा श्वास नॉर्मल होताच नाही आहे. इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू! नाचावस वाटत आहे. झाली हिम्मत एकदाची! किती सुंदर आहे. काय करू यार आता. काल संध्याकाळी बिग बझारमध्ये दोन तासाचा काही तरी फायदा झाला. बूट पासून शर्ट नवीन घेतले. निवडतांना दर दहा मिनिटांनी माझी निवड बदलायची. तिला कोणता ड्रेस आवडेल? याचा विचार करून डोक हैराण झाल होत. आता डोक दुखायचे बंद झाले आहे.

खूप विचार करून एक प्लेन काळपट म्हणजे पूर्ण काळाकुट्ट नाही. आणि त्यावर मग एक काळ्याच रंगाची पण फिकंट्ट लाईन असलेली एक पॅंट खरेदी केली. आता ती पॅंट खरेदी करतांना खूप वेळ गेला. कोणती घ्यावी तेच कळत नव्हत. कोणतीही पसंत केली, आणि दुसरी बघितली की ती छान वाटायची. मग मी पहिली टाकून दुसरी घ्यायचो. मग पुन्हा तेच! तिसरी आवडायची. इतका गोंधळ झाला ना! आत्तापर्यंत कपडे निवडीला दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ कधी लागला नाही. काल मी माझे सगळेच रेकॉर्ड मोडले. मग बूट निवड देखील खूप गोंधळ. मला एक साधा काळ्या रंगाचा फॉर्मल बूट घ्यायचा होता. त्यातही पॅंट सारखंच झाल. सोडा ते सगळे! ते महत्वाचे नाही. आज सकाळी कंपनीत आलो तर, पॅंट मागील बाजूने चिखलाने भरलेली. मग पुन्हा अर्धा तास गेला पाण्याने पुसत बसलो.

श्वास कालपासूनच सोबत देत नव्हता. अजूनही श्वास, धापा टाकल्याप्रमाणे! काल रात्री खूप वेळ झोपच आली नाही. खूप उशिरा लागली. त्यामुळे उठायला उशीर झाला. आणि उठल्यावर डोक दुखायचे बंद होईना. आणि उशीर झाला म्हणून मी आज पळायला गेलो नाही. काल चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिरात गेलो होतो. मनात देवाला पेढे देईल अस म्हटलो आहे. आज पुन्हा जाणार आहे दर्शनाला. सोबत पेढे घेऊन. सोडा, मी काय बडबड करतो आहे. आज अर्धा पाऊन तास हिम्मत करायला गेलो. दोनदा बाथारुमधील आरशात तोंड धुतलं. तिच्या डेस्ककडे जातांना हार्टटॅक येतो की काय याची भीती वाटत होती. पण गेलोच. तिच्या डेस्क जातांना घसा कोरडा पडलेला. तीने माझ्याकडे पहिले त्यावेळी, खाली मन घालून पळून जाव असा विचार येत होता. पण केली हिम्मत. मी हसून सुरवात करण्याआधीच तीने हसायला सुरवात केली. मग काय, मी सुद्धा हसून तिला ‘हाय’ केले. आता तिचे आडनाव आणि माझ्या जुन्या कंपनीच्या बॉसचे आडनाव सारखेच.

मग काय तिला म्हणालो, तू माझ्या बॉसला ओळखतीस का? म्हणून. ती नाही म्हणणार हे मला आधीच माहिती होती. कारण तिची सगळी माहिती आहे. मग ती ‘नाही’ म्हणाली. मग पुन्हा मी तिला ‘ते आधी टाईम्स ऑफ इंडियात, नंतर सकाळमध्ये होते’. ती पुनः हसून ‘नाही’. मी तिला ‘तुझे आणि त्यांचे आडनाव सारखे असल्याने म्हणून विचारले’. ती ‘अच्छा’. मग मी पुन्हा, ‘ते माझे जुन्या कंपनीचे बॉस होते’. ‘अच्छा’ म्हटल्यावर तीने मला माझे नाव विचारले. इथंच सगळा घोटाळा झाला. आता, मी तिला माझे नाव सांगणार नव्हतो. म्हणजे मग ती पुन्हा माझे नाव विचारायच्या निमित्ताने माझेकडे आली असती ना!. आता विचारल्यावर सांगावेच लागले. असो, आता पुन्हा का येईल? त्याचेच टेन्शन वाटतंय. तिला थंक्स आणि बाय करून निघालो. तिनेही ‘बाय’ केले. किती छान वाटते आहे. हवेत उडत असल्यासारखे वाटत आहे. यार, याची चिंता वाटती आहे की, ती पुन्हा बोलेल का? कारण माझे बोलणे खूपच लहान आणि फार काही छान झाले नाही.

देवा! तिलाही मी आवडून दे. किती छान आहे ती! असो, उद्या आई वडील येत आहेत. पुन्हा तेच ‘स्थळ’. त्यांच्या समाधानासाठी मुलगी पाहून येईल. मला आईने सांगितले आहे की ज्या मुलीला पाहायला जाणार ती ‘जाड’ आहे. त्यामुळे आई वडिलांनाच आवडणार नाही. त्यामुळे चिंता नसावी. आणि उद्या आई वडिलांना त्या सोलापूरच्या स्थळासाठी नकार देईल. पण… तीने एकदा तरी आता माझ्याकडे निदान बघावे तरी…

Advertisements

16 thoughts on “बोललो

 1. अरे मित्रा. पहिली अवघड पायरी चढलास. आता फार काळजी करू नको.

  आता यापुढे तुला हसण्या-बोलण्यासाठी निमित्त शोधायला नको.

  होईल यार. होले होले..

 2. मूलीना ६ सेन्स असतोच ………. त्यामुळे तू काळजी करू नकोस …..खरच तुला तू आवडत असला स ना …………. टर ती नक्की तुला स्माइल देईल …………. पणा नांटेर तुला तुज़ाचा पुढाकार घ्यावा लागेल ……………..:)

 3. सर्वात पहिल्यांदा..महत्त्वाचे म्हणजे ट्रान्सपोर्टच्या वेळी एकत्र या.. म्हणजे काहीही कारण न देता सलग बराच वेळ एकत्र मिळतो.

  ऑफिसची बस. (आवश्यक वाटल्यास रूट बदला. किंवा आज “जरा याच साईडला काम होते” वगैरे करून तिच्या रूट वर जा.

  बाईकवर किंवा रिक्षाने घरी सोडण्याची ऑफर..

  बसच्या वेळा जमवून आणणे.

  शिवाय

  लंचवेळी एक्सक्यूज मी. कोणी बसलंय का इथे? मी बसू का?

  “ती” हवी आणि “ती”च हवी तर पर्सीस्टन्स हवाच. (मराठीत लोचटपणा असे कोणी म्हटले तरी पूर्ण दुर्लक्ष करावे…)

 4. एवढ्या छान गोष्टीमधे -ve thing बघिताल्याबद्दल sorry!
  पण, जर नाहीच म्हानायाचय बाकि मुलीना, तिच्याशिच लग्न व्हावा अशी इच्छा आहे, मग मुली बघायला jatay कशाला? Give it a break na!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s