हिम्मतराव

यार, ती किती सुंदर आहे. असो, आजही ती खूप गोड दिसते आहे. नाही ‘गोडू’. आजकाल तिला सोडून दुसरीकडे लक्षच जात नाही आहे. तिच्यासमोर जाण्यासाठी रोज एकावेळी दोन-पाच टिश्यू पेपरला बलिदान करावे लागते आहे. दिवसातून मी दहादा तिच्यासमोर जातो. आणि जाण्याआधी वॉशरूममध्ये कसा दिसतो, ह्याच्यासाठी जातो. पण तिच्या डेस्क जवळ गेले की, तिला बघण्याची हिम्मत होतच नाही.

काल आई वडील गावी गेले. पण खर सांगू का? तिच्यासमोर मी काहीच नाही असे सारखे वाटते. आणि ती मला ‘हाय’ करते त्यावेळी खूप छान वाटते. पण नंतर ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल, असा सारखा विचार येतो. मी बेकार तर वाटत नसेल ना, अस वाटत रहात. ती खरंच ‘अप्सरा’ वाटते. आणि मी मला स्वतःला आरशात पहिले तर जुन्या चित्रपटातील ‘दादा कोंडके’. त्यात एक बर, माझा पोटाचा ‘गणपती’ आता कमी झालाय, अस आई दोन दिवसांपूर्वी म्हणाली. आणि माझी मैत्रीण मागील आठवड्यात! त्यामुळे हाच काय तो प्लस पॉइण्ट. बाकी सगळच मायनस. ती गोरी गोरी पान! अगदी त्या नटरंग मधील सोनाली सारखी. तसा मी देखील काही काळा नाही पण फार गोरा देखील नाही. तिचे ते केस, किती मऊ आणि किती सुंदर! आणि माझे ‘सागराच्या लाटा’.

तिचा चेहरा, पाहताक्षणी कोणीही फिदा होईल असा. आणि माझा ‘रडका’, एखाद्या ‘व्हिलन’सारखा. तिचे डोळे किती छान. अस वाटत, डोळे पाहताच राहावे. आणि माझे बघा, आणि त्याच्या बाजूला आलेलं काळे गोल. आणि माझ्या भुवया! काय बोलणार? सोडा. ती खूपच नाजूक आणि छान. आणि मी थोडक्यात ‘रांगडा’. फ़क़्त काय तो धोतर जोडीची बाकी आहे. नाहीतर एखादा गावाचा शेतकरी गडीच. मी खूप प्रयत्न करतो. चांगल दिसण्याचा. आणि व्यायाम देखील. पण काहीच फरक वाटत नाही माझ्यात. जसा आहे तसाच! ती एवढी सुंदर का आहे? आणि मी एवढा डब्बा? कधी कधी वाटते, मी खूप मोठी अपेक्षा करतो आहे. ती आणि माझी बरोबरी कशी होणार? पण ना, ती ज्यावेळी समोर येते त्यावेळी माझी हृदयाची धडधड खूपच जास्ती वाढते. आताही ती माझ्या बाजूने गेली त्यावेळी.. अजून कमीच होत नाही आहे. हुश्श! ती खूप छान आहे. सारख सारख तिलाच बघावस वाटत. आणि डोक्यात दुसर काहीच सुचत नाही.

मला आजकाल राग येईनासाच झाला आहे. कुठेही फ़क़्त तीच आठवते. बसमध्येही काहीही कारण नसतांना हसू येते. मागील मंगळवारी बसमध्येच असंच वेड्यासारख हसू आले होते. ती बाजूच्या सीटवरील मला नक्की वेडा म्हटली असेल. काल तिने मला आणि मी तिला कॅन्टीनमध्ये ‘हाय’ केले होते. आज मी माझ्या डेस्कवर असतांना तिने ‘हाय’ केले. यार, किती दिवस अस ‘हाय’वर जगायचे. पण हिम्मतच होत नाही त्याच्यापुढे! प्रपोझ कसा करणार यार मी तिला? वाटल होत आई वडिलांना सांगून टाकावं. आई वडिलांना सांगायला काही भीती वाटत नाही. पण ती थोडीच माझ्या प्रेमात पडली आहे. अजून कशात काही नाही. आणि सांगायला गेलो तर ते हसत बसतील आणि वर म्हणतील ‘आधी तिला विचार की तिला तुझ्याशी लग्नाची इच्छा आहे का ते!’. पण मला तीच हवी. फ़क़्त तीच. काय करू यार?

स्वप्नातही तीच, कंपनीत देखील ती! सगळीकडे ती आणि तीच. आज वाटल होते तिला नाष्ट्याला बोलवावं. पण ते देखील नेहमीप्रमाणे ‘हिम्मतराव’ सोबत आलाच नाही. ‘हेमंतराव’चा ‘हिम्मतराव’ कधी होणार? बाकीच्यांकडे बघून काहीच वाटत नाही. त्यांच्यासमोर मी बिनधास्त असतो. पण ती ‘अप्सरा’ आली की, हिम्मतराव होतच नाही. एकटा हेमंतच राहतो.

Advertisements

11 thoughts on “हिम्मतराव

 1. म्हणजे तिने लग्न हेमंतशी करायचे कि हिम्मतशी असाच प्रश्न आहे ना?
  पाहू या अगोदर कोण भेटते तिला ते… 🙂
  तिच्या नशिबात कोण आहे ह्यालाही महत्व आहेच की…

 2. खरं सांगू का? बातमी वाईट आहे पण तुमचे आईवडील परत येईपर्यंत तुम्ही कितीही शेपटी आपटली तरी गाडी पुढे सरकणार नाही असा आमचा अंदाज आहे… आता यासाठी आम्ही कुठलीही कुंडली पत्रिका वा वेळ पाहून घंटा वाजवत नाही….

  त्या मुलीचा काही “पण” वगैरे आहे का विचारा पाहिजे तर मोकळ्या वेळात जमल्यास… म्हणजे तिला स्वयंवर वगैरे करायचे असेल तर प्रश्न जरा काँम्पलिकेट होभ शकतो म्हणून…

  बाकी सर्व ठीक आहे…

  कळावे

 3. हिम्मतराव लवकर! पोरगी नोकरीला आहे, फार काळ टिकत नाहीत अशा पोरी. नाहीतर एकदिवस ‘लग्नाला यायचं हं’ असं गोड निमंत्रण पत्र मिळेल ………

 4. Hi Hemant,
  It takes a man to feel confident to make the proposal.Now look at yourself—you are young, intelligent , sharp in your assessment of persons, yo have a witty temperament, and you have the correct personality of a sensitive man to fall in love.Now , with so many plus points what is stopping you from asking her to come with you for a cup if coffee?Do in man and do it today
  God bless you
  Regards
  JKBhagwat

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s