बेकार दुपार

काय यार, सगळ्या आठवड्याच्या मेहनतीचा सत्यानाश झाला. काल दुपारने सगळी चिंधीगिरी केली. काल सकाळी मला तिने इतके गोड ‘हाय’ केले होते. आणि किती वेळा ती माझ्या डेस्क जवळून गेली. किती छान वाटत होते. पण दुपारनंतर सगळंच बदललं. माझ्या प्रोजेक्ट मधील नाही. पण दुसर्या, मित्राच्या प्रोजेक्ट मधील एक काकू. म्हणजे मुलगीच आहे. पण लग्न झालेली. मित्राची मध्ये थोडीफार कामात मदत केली होती. त्यावेळी तिचीही केली. आता तिला पण आत्ताच टपकायाचेच होते. तिचीही काय चूक म्हणा. माझीच झाली मदत करून. काकू माझ्याकडे आल्या. आणि त्यांच्या कामातील अडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली. आता मलाही काम होते. म्हणून त्या काकूंना, माझ्या डेस्कवर काम समजावून सांगितले. काकू गेल्या.

मग काय काकूंच्या अडचणी वाढतच चालल्या. एका मागे एक सुरूच! यार, इथंच सगळा घोळ झाला. ‘अप्सरा’ने हे काल दुपारी बघितले. मग काय, तीचा चेहरा, तिचे ते नाक. खूप छान! ते शोले मधील गाण आहे ना ‘कोई हसीना जब रूठ जाती है तो..’. अगदी खर आहे. चला या नादाने का होईना, अप्सराला मी आहे हे तरी निदान माहिती आहे याची मला खात्री झाली. खर तर तिला मी ‘हॅपी वीकेंड’ म्हणणार होतो. पण तीचा तो रंग पाहून माझी पुन्हा हिम्मतच झाली नाही. तो गोल चेहरा. ते फुगलेल नाक. यार, तिने इतका कसं टोकाचा विचार केला. आता त्या काकूने सर्वांसमोर मला ‘ट्रिट’ देते असे म्हणाली. मी तिथून सटकलो. पण त्या काकूला काम केल्याचा आनंद एवढा झाला होता. पण माझा बॅंड वाजला त्याच काय? यार कंपनीतून जातांना देखील ती माझ्याकडे पहात होती. पण माझी हिम्मतच झाली नाही. पण आता खूप टेन्शन आल आहे. काहीच नसतांना, इतकं सगळ चांगल चालू असतांना अचानक डाव विस्कटला.

सगळंच शून्य वाटत आहे. यार, ती माझा विचार आता कसा करत असेल? तिला मी फालतू वाटलो असेल. बर, संध्याकाळी असंच टेन्शन मध्ये घरी निघालो तर, मित्रांच्या आग्रहामुळे थांबलो. ती पाचची बस सोडली. आणि पावणे सातच्या बसला बसलो तर ‘पुणे दर्शन’ झालं. किती लांब फिरून येते ती बस. घरी यायला साडे आठ वाजले. अर्ध्या तासाच्या रस्त्याला पावणे दोन तास. खूप डोके दुखत होते. रात्री झोपही येत नव्हती. झोप यायला दीड वाजला. तीन वाजता पुन्हा जाग आली तर संगणक चालूच. सकाळी पळायला जायची इच्छाच होईना. सकाळी दोन तास डोक शांत करण्यासाठी गाणी ऐकत बसलो. यार, अजूनही ‘अप्सरा माझ्यावर नाराज असेल तर’ असे विचार येत आहे. खर तर मी अप्सराशी त्याच वेळी बोलोलो असतो तर निदान थोडा फार तरी तीचा राग कमी झाला असता. आता काहीच कळत नाही आहे काय करू ते. आता हे दोन दिवस कधी एकदाचे संपतात अस झालं आहे. तिच्याशी सोमवारी मी पुन्हा पाच दहा मिनिटे बोलतो. असो, बोलावंच लागेल. नाहीतर मग.. नाही नको. विचारही सहन होत नाही.

कोणी तरी इतकी छान वाटली. पण आता काहीच अर्थ नाही अस वाटत आहे. आज काहीच करायची इच्छा होत नाही आहे. काल पासून खूप आठवण येते अप्सराची. सगळ आहे पण काहीच नाही. तिने भलता सलता विचार केला तर सोमवारी ती माझ्याशी बोलेल का? असो, आता पुन्हा डोक जाम होते आहे. नंतर बोलू. काल सकाळी कंपनीत जाण्यासाठी माझे धुतलेले मोजे शोधत होतो. माझ्याकडे मोज्यांचे चार जोड आहेत. एक मळलेला होता. दुसरा थोडा फाटलेला. उरलेलं दोन जोड चे एक एक मोजे गायब. कुठे आहे म्हणून शोधले तर सापडलेच नाहीत. मग पुन्हा मळके मोजे घालतांना ते मी रोज सकाळी पळायला जातो ना! त्या बुटात ते दोन जोडचे हरवलेले एक एक मोजे दिसले. मग बघून हसू आले. किती गाढवपणा चालू आहे. अख्खा आठवडाभर मी ते दोन मोजे आणि तेही वेगवेगळया जोडचे घालून पळायला जात होतो. अप्सरा आल्यापासून सगळंच किती छान वाटत होते. ती नाही तर सगळंच भकास! कधी सरणार हे दोन दिवस?

Advertisements

8 thoughts on “बेकार दुपार

  1. हाय ……….कसा आहेस हेमत????????? ……………आज जे घडले त्याची पोस्ट नाही टाकलिस ?

    अरे तुला यैक मोलाचा सल्ला ………… तू तिच्यात येवडा गुरफटून जाओ नकोस …… जेणेकरून तुला ह्याची सवय होईल ……….. आणि नन्तेर तुला स्वतल बाहेर पडायला खूप वेळ लागेल……… 😦

    best of luck …………. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s