एक्सपर्ट

काय महत्वाचे? थिअरी की प्रॅटिकल असा आता मला प्रश्न पडायला लागला आहे. माझा एक मित्र आहे. केल काहीच नाही पण माहिती सगळे. कुठलाही विषय काढा हा त्यावर त्याचे ‘एक्सपर्ट’ मत व्यक्त करणारच. अगदी मुलीं पटवण्यापासून सेक्सपर्यंत. पण यातील एकाही गोष्ट केलेली नाही. एकदा असंच आमच्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता मी त्याला विचारले की, ‘तुला कोणीच नाही आवडली का?’ तर मला बोलला ‘मी असली डेड इन्वेस्टमेंट करत नाही’. का? विचारल्यावर बोलला ‘आपण मुलीसाठी वेळ द्यायचा, तीचा विचार करायचा आणि तिच्यावर खर्च करायचा. आणि शेवटी आउटपुट आपल्या सोबत लग्न करेल. अरेंज मॅरेजमध्ये हवी तशी मिळू शकते. मग कशाला वेळ घालवायचा?’. काय बोलणार आता?

अप्सराला काय आवडेल हे, हा सांगतो. मी ज्यावेळी तिच्याशी बोलण्यासाठी काय करू असं विचार करत होतो, त्यावेळी काय करायला हवं हा हे सांगत होता. ते तर सोडाच, एखादे स्थळ पाहायला जातांना मुली कशी निवडावी हेसुद्धा! याने अजून एकाही स्थळ पहिले नाही आहे अजून. त्याला विचारले ‘तुला कसं काय माहित?’ तर बोलतो ‘आपल थिअरी पक्की आहे’. हे तर सोडाच, राज ठाकरे कशासाठी हे सगळे करतो आहे, इथपर्यंत त्याचे ‘एक्सपर्ट’ मत. अजून एक गावी मित्र आहे. तो ही असाच! तो राज ठाकरे, सोनिया गांधी यांना मुर्ख म्हणतो. त्यांनी काय आणि कसे केले पाहिजे ह्यावर मित्रांमध्ये ‘एक्सपर्ट’ मत देत असतो. क्रिकेटच्या सामन्यात धोनीने कसं खेळायला हवं पासून ते महागाई कशी रोखायला हवी इथपर्यंत सगळी ‘एक्सपर्ट’ मत तो देतो.

एकदा तर पाकिस्तानशी कसं वागायला हवे आणि त्यांच्यावर हल्ला का नको हे सांगत होता. काय बोलायचे सांगा. अजूनपर्यंत गल्लीत त्याने साधे भांडणनही केलेलं नाही. हे आता गांधीजींनी सैनिकांना युद्धतंत्राचे कोचिंग क्लासेस घेण्यासारखे नाही काय? किंवा प्रणव दादांनी आर्य चाणक्यला अर्थशास्त्र शिकवण्यासारखे! यांची थिअरी पाहून आजकाल मला मी खूप ‘कच्चा’ असल्यासारखे वाटते. माझे ‘मत’ अनुभवावरून थोडक्यात प्रॅटिकलवरून बनते. पण यांचे अस काही न करताच. कुठेही न जाताच, आणि काहीही न करताच. म्हणजे एकदा चक्क तो गावाचा ‘एक्सपर्ट’ मित्र दारू पिण्यात काहीही वाईट नाही अस बोलत होता. आता त्यानेही आणि मी देखील कधी दारू पिलेली नाही. पण मी निदान दारू पिऊन बायकोला मारझोड करतांना आणि गटारीत अंघोळ करतांना माणसे प्रत्यक्षात पाहिलेली आहे. त्याने फक्त ‘टीव्हीत’. सोडा तो विषय. आता काय चुकीचे आणि काय बरोबर मला काहीच कळत नाही आहे. रात्री देखील लवकर झोप लागली नाही. अप्सराची खूप आठवण येत आहे. असो, बाकी बोलूच!

Advertisements

3 thoughts on “एक्सपर्ट

  1. सल्ला घेताना तो आपल्याविषयीच्या काळजीने दिला जात असेल अशी खात्री पटल्यासच स्वीकारावा. सल्लागाराने आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी दिलेला सल्ला अडचणीत टाकू शकतो.

  2. अनुभव(practical) श्रेष्ठ की ज्ञान (theory) ह्या पठडीतला हा लेख आहे…हा हे नक्की की हे दोन्ही तसे जड शब्द व विषय आहेत. पण माझ्या मते ज्याला अनुभव नाही त्याच्या मताला तेवढे वजन नसते..अनुभवी मनुष्य कधीकधी कमी ज्ञान असतानाही बरोबर निर्णय घेवू शकतो.
    विषय मोठा आहे व खूप थोरामोठ्यांनी यावर बराच काथ्याकूट पण घातलेला आहे…
    तुमच्या लेखामुळे आज मनात त्याची रिविजन झाली..
    धन्यवाद.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s