कस बोलू?

यार आज राहावतच नाही आहे. आज सकाळी किती वेळ त्या कॅन्टीनमध्ये टाईमपास केला. पण अप्सराचा पत्ताच नाही. तसे माझीच चुकी म्हटली पाहिजे. मी अजून थोडा वेळ थांबायला हवं होत. कंपनीत आली, तर तिच्या सोबत तो तिचा मित्र आणि मैत्रीण. कस बोलू? ते गेले की, तिच्याशी बोलायला जाव म्हटलं तर ती जागेवर नसणार. असाच चालू आहे कालपासून. कालही असेच. ती माझ्या डेस्कच्या बाजूने जाते पण बघत नाही. काल किती वेळा गेली माझ्या डेस्कच्या बाजूने. पण एकदाही माझ्याकडे पहिले नाही. कधी कधी वाटत तिला माझ्यात रसच नाही आहे.

पण मग माझ्या डेस्कच्या बाजूने का जाते?आणि मी बोलायचे ठरवले की, तिच्या डेस्कवर कोणी ना कोणी टपकलेलेच असते. पण मी आज काहीही करून तिच्याशी बोलणारच आहे. आता गुदमरल्याप्रमाणे होत आहे. त्या परवाच्या कॅन्टीन मध्ये ‘हाय’ न केल्याचा तिला राग आहे का माझ्यामुळे तिला त्रास होतो आहे? काहीच सुचत नाही आहे. काल पुन्हा ‘अप्सरा’ कृपेमुळे मार खाता खाता वाचलो. कंपनीतून घरी निघतांना असाच विचार करीत जात होतो. गेटवर स्वाप करावे म्हणून स्वाप केले आणि मागे वळणार तेवढ्यात एक मुलगी मागून आलेली, माझ्या पाठीच्या बाजूने असल्याने लक्षातच आले नाही. बसला धक्का तिला माझा. उपकार म्हणायचे तिचे, श्रीमुखात दिली नाही.

तसे सकाळी अप्सराही कुठल्या विचारात मग्न होती कुणास ठाऊक! माझ्या मित्राला धडकली. योगायोग म्हणायचा, दोन दिवसापूर्वी आमच्या दोघांच्या ड्रेसचा रंग एकाच होता तसा. मुळात ती मला दोन दिवसापासून का टाळती आहे. कुणास ठाऊक! पण काहीही असो, आज मी तिच्याशी बोलणारच. दुसरे खरंच काही सुचत नाही आहे. बोललो की सांगतो!

Advertisements

16 thoughts on “कस बोलू?

 1. नक्की बोल..आणि नुसतंच बोलू नको…जरा तरी काही गाडी पुढे सरकेल अशा पद्धतीने बोल…
  म्हणजे रिलेव्हंट…कारण एकेक संवाद महत्त्वाचा आहे

 2. हेमंत
  किती दिवस असंच चालणार? एक घाव दोन तुकडे करून टाक. तिच्या टेबलवर एक गुलाबाच्ई कळी रोज ठेवत जा. आणि एक कागद- कोरा..
  असं एक आठवडा कर.. आणि सोमवारी कागदावर एक स्माईली काढ..
  एक आठवडा दुसरा दिवस… ती येते आहे असे बघुन तिच्या टेबलवर फुल ठेव. तिच्या लक्षात यायला हवं की तूच ते फुल ठेवतोय म्हणून.,

  म्हणजे पहिले आठ दिवस ती यायच्या आधी फुल ठेव, आणि शेवटल्या दिवशी तीला लक्षात येईल अशा पध्दतीने.. बस्स.. पहा कामगिरी फत्ते..
  अरे वा.. एक मस्त लव्हस्टोरीचा प्लॉट तयार होतोय… कर मित्रा, प्रयत्न कर.. विस खांडेकर म्हणतात नां, तसा थोडा अविचारी हो……

  1. आहे महेंद्र काका,,काय सल्ले देत आहात..असले फुल ठेवण्याचे उद्योग ऑफिस मध्ये केले तर कम्पनी त्याला पाहिले बाहेर काढेल…मग नौकरी पण जाणार आणि छोकरी पण….

  2. महेंद्र,
   काय भन्नाट कल्पना आहे तुमची 🙂 मला वाटते तुम्ही लव गुरु म्हणून जोडव्यवसाय सुरु करायला हरकत नाही 🙂
   हेमंत राव, तुमची धडपड पाहवत नाही हो! एकदा भरपूर धीर गोळा करा आणि काय तो निकाल लावा आता. चांगले कमावते आहात, लेखनावरून संवेदनाशील आहात असे पण दिसते. नाही म्हटले तर तिचाच तोटा आहे. तेव्हा लगाव हिम्मत और कर दो काम फत्ते !

 3. हेमंता,
  बोल !
  बोलल्यानं बरंच काही कळतं, होतं, पुढं सरकतं.
  बोललं नाही तर मात्र फक्त काळजी, हरवलेली झोप, रुखरुख, हुरहूर फक्त आपल्यालाच. थोडक्यात जिवाची शाळा आणि डोक्याची मंडई होते.
  स्वतःचा नॅकोबा होऊ देऊ नकोस… बोल !!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s