माझी प्रतिक्रिया

मी माफी मागतो, मला येणाऱ्या प्रतिक्रियांना काहीच उत्तर देत नाही म्हणून. मी प्रतिक्रिया न देण्यामागे, मी फार मोठा किंवा वेळच नसतो अस काहीच नाही. उलट तुम्ही माझ्याशी बोलता. खूप चांगल वाटत. आनंद वाटतो. मलाही समजून घेणारे मित्र असल्याचा आनंद, निराळा आहे. मला येणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी आदर्श आणि मार्गदर्शक असतात. मी माझ्या मित्रांशी या विषयावर गप्पा मारल्या तर ते ‘बोर’ करू नको असे म्हणतात.

काही तर त्यांची दुख: ऐकण्याचे मशीनच समजतात की काय याची शंका येते. माझी जी मोठी बहिणाबाई आहे ना! तिला माझ्या मनातलं अस काही सांगतो. पण तिला सगळ्याच गोष्टी कस सांगणार? आणि चुकून ‘ही आवडली’ असा विषय काढला तर ती ‘करिअर’कडे लक्ष देण्याचे सल्ले देते. मग बोलणार कोणाशी? आई वडील खूप चांगले आहेत. पण अगदी सुरवातीपासून, वडिलांशी बोलायची मला भीती वाटते. आणि आई म्हणजे आईच आहे. खर तर तुम्ही माझी हिम्मत वाढवली नसती तर, माझी तिच्याशी बोलायची उभ्या जन्मात हिम्मत झाली नसती. तुम्ही सर्वजण होतात म्हणून तर माझी गाडी चालू शकली.

आता अधून-मधून ती गाडी बंद पडते. आज देखील असंच! ती समोर आली की, बोलायची हिम्मत होत नाही. आणि नसली की तिला बघण्याची, बोलण्याची खूप इच्छा होते. ती आज पांढर्या रंगाचा ड्रेस मध्ये इतकी छान दिसते आहे ना! नुसते बघत रहावेसे वाटते आहे. आज कॅन्टीनमध्ये ती समोर होती. पण पुन्हा फूस! पण आजही मी बोलेलच! असो, तो विषय आता नको. मला सगळ्यांच्या प्रतिक्रिया नेहमी मान्यच असतात. मग ‘धन्यवाद’च्या फोर्मेलीटी कशाला? तरीही मला माहिती आहे कदाचित, माझे मत चुकीचे वाटत असेल. पण माझ्या मनात अस काहीच नाही. कृपा करून मला तुम्हाला कोणत्याच प्रकारचा दुखावण्याचा हेतू नाही. मी आजही तिच्याशी बोलण्याची हिम्मत करतो आहे. ती माझ्याशी कधी स्वतःहून बोलणार देव जाणे. मी सगळ्या प्रतिक्रिया वाचत असतो. पुन्हा एकदा हात जोडून क्षमा मागतो.

Advertisements

10 thoughts on “माझी प्रतिक्रिया

 1. तुमचा blog वाचते मी नेहेमी.. 🙂 आज प्रतिक्रिया देतेय.. मन फारच भावुक झालय हो तुमचं.. ह्या मुलीशी मैत्री करा आधी. मग आपोआप सुचेल पुढचं बोलायला तुम्हाला… 🙂 all the best. 🙂

 2. अरे मित्रा नेहमी तुझा ब्लॉग वाचतो. तू किती व्याकुळ झाला आहेस हे कळते. बोलून टाक लवकर. महेन्द्र काकांची आयडिया जमत नसेल तर तुझ्या ब्लॉगची लिंक तिला पाठवून दे. त्यातलं रोजचं लिखाण वाचून तिला तुझ्या भावना नक्की कळतील.
  रक्षा बंधन यायच्या आत कामगिरी फत्ते करून टाक 😉

 3. १. शिक्षणाचा विषय सोड… आजपर्यंत मी कमितकमी ३, फक्त दहावी पास किंवा डिप्लोमा पास, मुलांना त्यांहून अधिक शिकलेल्यांपेक्षा जास्त यशस्वी होताना पाहिलेय. आपली भेट बहुदा फक्त इथेच होत राहिल म्हणून तपशीलवार यादी देत नाही.
  ३. खरोखर “मनाची शते” वाच… कल्याण होईल. कल्याण ह्या शब्दाचा अर्थ तमिळ भाषेत लग्न असा आहे.
  ८. हमरी खयाल में, आग दोनो तरफ लगी है। फर्क सिर्फ इतना है की आप सेंटी जादा होते हो। 🙂

 4. मित्रा तू माझा सर्वात आवडता लेखक आहेस.जी परिस्थिती तुझी आहे तशीच आणि नेहमीच माझी असतेस .तू नेमक्या शब्दात ते मांडू शकतोस म्हणून तुझे फार कौतुक वाटते .
  all d beshhht!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s