माझिया प्रियाला..

काल दिवसभर एकदाही मला अप्सराने बघितले नाही. खूप राग आला होता. आणि डोके खूप दुखले. कधी कळणार यार तिला! ‘हाय’ सुद्धा नीट केले नाही. आणि आज आली सुद्धा नाही. आज मला खूप टेन्शन आले आहे. कदाचित तिलाही स्थळे बघत आहेत की काय याची शंका येते. की आज ती आजारी आहे? असले कसले सुद्धा विचार डोक्यात येत आहेत. आजच सकाळी मित्रांनी पुन्हा मला ‘तिचा नाद सोड’ या विषयावर तासाभराचे भाषण दिले आहे. मी खूप गोंधळून गेलो आहे. आज सकाळी लवकर उठून देखील वेड्यासारखा अंथरुणात पडून होतो. लेट मोर्निंगच्या बसने आलो. पण ती नाही. कशातच मूड लागत नाही आहे. तसं कालपासून अस होत आहे.

तिच्यावरील राग त्या बिल्डरवर काढला. गेलोच नाही साईट बघायला. रात्री देखील असेच. खूप भलते सलते विचार यायचे मनात. वाटायचे जगण्यात काहीच अर्थ नाही. मी जगातील सर्वात भंगार, वाईट मुलगा आहे. कधी कधी तर माझ्यामुळे तिला त्रास तर होत नाही ना! याची शंका येते. पण मला ती खरंच खूप मनापासून आवडते. दुसरी कोणीच नको वाटते. तीच हवी फक्त. काल, माझ्या मैत्रिणीचा फोन आल होता. परवा तिने मला पहिले होते. असो, मला भेटू असे म्हणत होती. पण मला आता अप्सरा सोडून कोणीच नको वाटते. त्याला मी काय करू? माझे मित्र पुन्हा तेच ‘ती मिळणे शक्य नाही. कशाला वेळ वाया घालतो आहेस?’. पण दुसर्या कोणत्याच गोष्टीत मला रसच वाटत नाही. ते म्हणत होते, मी तिच्या कुठल्याच प्रकारे योग्य नाही.

ती मोठ्या घरातील आहे. तिचे शिक्षण मोठ्या कॉलेजात झाले आहे. पण मी तरी काय करू? आधी जशा मुली आवडायच्या तशी आवडली असती. म्हणजे बसस्टॉपवर एक, बसमध्ये दुसरी, उतरलं की तिसरी आणि डेस्कवर, जाता येता, कॅन्टीनमध्ये दर दहा मिनिटांनी एक. अस आत्ता पर्यंत चाललेले. आणि ज्या आधी आवडल्या त्या देखील छान होत्या. पण त्यांनी मला व्याकूळ करून टाकल नव्हते. आणि त्यांना पाहून देखील दुसर्या छान वाटायच्या. अप्सराला पहिल्यापासून सगळ्याच ‘पाणी कम’. आणि तिच्याशी ‘हाय’ सोडून काहीच बोलता येत नाही. फार फार तर ‘बाय’. आणि नसेल तर कशातच मन लागत नाही.

मित्रांच्या मते ती मला भेटनेच शक्य नाही. कोणाच ऐकू? मित्रांचे? आई वडिलांचे? बहिणाबाईचे? की माझ्या मनाचे? मला सगळे मान्य आहे. की तिच्या लायकीचा मी नाही. पण मला दुसरे तिसरे काहीच सुचत नाही. आणि तिलाही कस सांगू? हिम्मतच होत नाही. आणि तिला मी आवडेल की नाही हे देखील माहित नाही. यार तो जप देखील दोन वरून पाच वर नेला आहे. अजून काय करू? सोडा, पुन्हा माझे डोके दुखायला लागले आहे. कोणीच माझे नाही असंच वाटायला लागले आहे. मला नाही सुचत काही आता. देवाने इतकी छान मुलगी दाखवली? आणि दाखवली तर माझ्या मनात असे विचार का आणले? काहीच सुचेनासे झाले आहे…

Advertisements

8 thoughts on “माझिया प्रियाला..

 1. मित्रा, तुझा हा ब्लॉग वाचला आणि मागचे सर्व वाचत गेलो. तुझ्या मनाची व्यथा आणि व्याकुळता समजु शकतो. माझ्या मते सर्व जण ह्या स्टेज मधुन जात असतात. फक्त सगळे जण तुझ्यासारखे भाषे मध्ये व्यक्त करु शकत नाहि. छान लिहितोस. मनात खरच असेल तर लपवुन ठेवु नकोस. व्यक्त कर आणि मोकळा हो. नशिबात असेल ते होणर च असते. फक्त जिवाला घोर लागुन राहत नाहि. मन मोकळे होते.

 2. Hi mitra, tuza blog mi khup divsanpasun wachat ahe. Karan agadi yach paristhititun mi pan jat ahe. Farak itkach ki mi 1 mulgi ahe. To mazyach office madhala 1 mulga ahe. ani jevapasun mi tyala pahilay na…………………..same tuzich condition re…….
  aata mi vichar asa karate ki tyane yeun swataha mazyabarobar bolave. Initiative tyanech ghyava……..
  Mi roz ya goshtichi wat pahate re………………
  So u take initiative to talk to her, she wont. n may be she is waiting to talk to you….so hurry up friend…….go ahead.

 3. बहुतेक अश्याच प्रसंगातुन मी सुध्दा गेलो आहे. मला वाटतं तु बोलुन मोकळं व्हावस. जोपर्यंत तु मन मोकळं करत नाहीस तो पर्यंत तिला तरी कसं कळणार तुझ्या मनात काय आहे ते?

  माझा अनुभव मी इथे शब्दबध्द केला आहे, वाचला नसशील तर जरुर वाच –

  http://manatale.wordpress.com/2009/05/21/%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97/

  http://manatale.wordpress.com/2009/05/22/%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-2/

  http://manatale.wordpress.com/2009/05/23/%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%af%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-3/

 4. Hi Hemant,
  It is quite natural for a young heart to crave for its beloved .You seem to be going through an emotional crisis.Do not let it develop into an inferiority complex which will , in future , prevent you from communicating with her .Try and meet her with a smile on your face and
  confidence in your mind.Make her talk about herself, her interests, her student days , her family, anything that might interest her .I know it is not possible in your first meeting, but , that is why you have to keep approaching her and meeting her .Who knows , she may have a soft corner for you in her heart which she may not be able to express .Therefore , young man, take initiative and use this opportunity to realise your dream
  All the Best
  JKBhagwat

 5. मी एक सल्ला देवून पहातो तुला. पटलं तर बघ. तुला ती आवडली ना खरोखर? तीला तु आवडतोस का नाही ते सोड. तुझी तीच्याशी लग्न करायची तयारी आहे ना? अगदी स्पष्ट पने तीला तु, तेही लवकर, जीथे योग्य वाटेल तीथे गाठून , तीचे नाव घेवून ” क्ष क्ष क्ष -तू मला खुप आवडली आहेस. जर मी तुला आवडलो असेल तर मी तुझ्याशी लग्न करु ईछ्चितो. तूला मी जम्न्भर सुखी ठेवेन. तू माझ्याशी लग्न करशील काय?” ती हो तरी म्हनेल नाही तरी म्हनेल. हो म्हनाली तर ठीक. नाही म्हनाली तर दुसरी. वेळ वाया न घालता तु हे विचारच विचार. तू काही चोरी करत नाहीस. त्यात काय एव्हढे? फार सोपे व सरळ आहे. हिम्मते मर्दा तर मददे देवा !

 6. असं कुठं असतं काय? हेमा मालिनी ला स्व. संजीव कुमार, जीतेन्द्र अजुन कुनी कुनी लोकांनी डायरेक्ट लग्नासाठी प्रपोज केले होते मह्णे. तीने तीला मनाला वाटले ते केले. ह्याला प्रपोजल , डिसपोजल म्हनतात. You will have to directly propose her face to face making an eye to eye contact. Till marraige nothing can be said. Even after marraige nothing can be said. This is life. Go ahead and speak her directly with confidence. What she says let us know. Then we will tell you what to do next. What is there in it man? It is question of confidence. Confidence comes from wisdom. Wisdom is that you are a man she is women, as per social rules you want to marry her. What is happeneing in society will happen with you and her.So you first propose her. Just hi and bye is not enough. She is trying to see how much confidence you have.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s