आजींचे भाषण जसच्या तस्

माझ्या प्रिय देशवासीयांनो,
चौसष्ठाव्या स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्व संध्येला मी भारतात आणि विदेशात राहणाऱ्या तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आणि मी विशेषतः आपल्या सीमांचे रक्षण करीत असलेल्या सशस्त्र सेनेचे आणि आणि अर्ध सैनिक दलाचे वीर जवानांसोबत केंद्रीय तसेच राज्य स्तर पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा बलाचे अभिनंदन करते. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग. मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचे अभिनंदन करते, ज्यांच्या कठोर मेहनतीने, उत्पादन कौशल्याने आणि उद्यमशीलतेमुळे भारताला विश्वातील प्रमुख देशांत सामील केले आहे. सरकारमुळे नव्हे. मी मध्यंतरीच, लेहमध्ये घडलेल्या घटनेत प्रियजनांना गमावलेल्या, घायाळ झालेल्या तसेच ज्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना हार्दिक संवेदना व्यक्त करते. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग.

देशावासियांनो,
प्रत्येक वर्षी, आपण भारतंत्र्याचा दिवस खूप मोठ्या गाजावाज्याने, आनंदाने साजरा करतो. आणि स्वाभाविकच आहे. कारण याच दिवशी गुलामी नंतर, ‘आम्हाला’ स्वातंत्र्य प्राप्त झाले होते. वस्तुतः १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस इतिहासात, एक अशा असाधारण उपलब्धीच्या स्वरुपात आठवणीत ठेवला जातो, जेव्हा भारताने अदभूत सहनशीलता तसेच वेगवेगळ्या साधनांचा वापर करून स्वातंत्र्य प्राप्त केले होते. महात्मा गांधींच्या नेतृत्वात अहिंसा आणि सत्याग्रहाच्या द्वारे स्वातंत्र्य प्राप्तीचे आंदोलन पूर्ण देशात पसरले. करोडो पुरुष आणि महिला स्व:इच्छेने या लढाईत सामील होऊन आणि एक महाशक्ती बनून जगातील उपानिवेशी ताकदीचा पराभव केला. आता हे वाक्य मॅडमने टाकायला सांगितले होते. आता त्याला मी काय करणार? कारण मी फक्त हेच करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग.

स्वतंत्र भारताचे नागरिक होण्याच्या नात्याने आपल्याला (तुम्हाला) त्या मूल्य आणि सिद्धांतवर विचार करायला हवा, जे स्वातंत्र्यासाठी लढून आपले बलिदान दिले त्यांच्या मनात होते. त्यांनी पूर्वापार देशातील चाललेल्या मूल्य अंगिकारली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकदा गांधींबद्दल ‘भारताची एक अशी सनातन आत्मा, जीने स्वातंत्र्याची मशाल पेटत ठेवली’ असा उल्लेख केला होता. गांधीजींचे विचार आणि त्यांचे जीवन, ज्यात शांती आणि सोहर्द , अहिंसा आणि सत्य, मानव गरिमा तसेच करुणा जशा मूल्यांना प्रमुख स्थान आहे. आता हे वाक्य मॅडमने टाकायला सांगितले होते. आता त्याला मी काय करणार? कारण मी फक्त हेच करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग.

देशावासियांनो,
आज आपण त्या ऐतिहासिक वेळेत आहोत, जेव्हा विश्वात बदल घडतं आहे. (आता हे वाक्य जवळपास सर्वच राष्ट्राध्यक्षांनी वापरले आहे, म्हणून मी सुद्धा..) हा बदल आपली अर्थव्यवस्था, शासन तंत्र, व्यापार, वाणिज्य, शिक्षण तसेच जीवनाच्या गतीला प्रभावित करते आहे. (सोप्या शब्दात महागाई) बदलाच्या या युगात भारताला मागे राहायचे नाही आहे. पण हे काय संभव आहे का की आपला राजकीय दृष्टिकोन, आर्थिक उन्नती, वैज्ञानिक प्रगतीने मानवी कल्याण, सहिष्णुता, आपापसातील सन्मान, निस्वर्थाता जशा मुल्यांसोबत जोडून ठेवता येतील? (मलाही हाच प्रश्न पडलेला आहे)

आपला इतिहास काय आहे? भारत, एक परिपक्व तसेच सद्भावना प्रिय समाज आहे. आणि विद्या ग्रहण करण्याची त्याची दीर्घ परंपरा आहे. याचा दर्शन हजारो वर्षाच्या अनुभवाच्या ज्ञानावर आधारित आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारताचा उल्लेख ‘एक अशी प्राचीन भूमी, जिला ज्ञानाने दुसऱ्या देशात जाण्याआधी आपले घर बनवले’ असं केला आहे. आपला देश असा देश आहे की जिथे, सर्व धर्मांचा उदय झाला. आणि इथे प्रत्येक धर्माला स्थान आहे. (हे वाक्य मॅडमचे..)

आपण एक अशा महान सभ्यतेचे उत्तराधिकारी आहोत, ज्याची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिली जाते. आपणावर ५४ कोटी युवकांच्या नव्या पिढीला या समृद्ध परंपरा देण्याचे दायित्व आहे. ते देश विदेशात भिन्न भिन्न क्षेत्रात आपल्या क्षमतेने आणि योग्यतेचे प्रदर्शन करीत आहेत. आपले युवक, देशाचे भविष्य आहेत.

माझ्या प्रेमळ देशावासियांनो,
आज आपला देश कुठल्या परिस्थितीत आहे? (प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहिती आहे, पण मॅडमने टाकायला लावला हा प्रश्न) जगातील सर्वात मोठ्या भारशाहीच्या स्वरुपात भारतंत्र पुढे चाललेली आहे. आपले सर्वांचे पहिले काम सर्वांचे कल्याण करणे सुनिश्चित करणे हे आहे. तसे चालूच आहे म्हणा..

माझ्या प्रेमळ देशावासियांनो,
पुढचे भाषण पुढच्या भारतन्त्र्य दिनी. तसे भाषणाची पाने संपले नाही आहेत. पण वाचून काय उपयोग? तसं काय फ़क़्त बोलाण्यापुरतेच असते.. कारण मी हेच फक्त करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग. चला जय हिंद! जय सोनियाजी!

Advertisements

3 thoughts on “आजींचे भाषण जसच्या तस्

  1. आयला ह्या अप्सराने सगळ्यांना झपाटलेले दिसते…मग हा झम्प्या कसा काय वाचला? आता त्याला मी काय करणार? कारण मी फक्त हेच करू शकते. सही नाही. जस्ट चील बेबी! आय एम जोकिंग.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s