ते तीन क्षण..

कालचा दिवस कसा गेला काय सांगू! अप्सरा किती छान आहे. इतकी छान काल दिसत होती. आणि त्याहुने तिचे ते गोड हसणे. काल कंपनीत गेल्यावर तिला ‘हाय’ करण्यासाठी किती यार! पहिल्यांदाच जाणार त्यावेळी मित्र आला माझ्याकडे. नंतर कॅन्टीनमध्ये नाश्ता केल्यावर पुन्हा तीच्या डेस्कच्या बाजूने जाणार त्यावेळी तीच्या प्रोजेक्टमधील ती काकू तीच्या डेस्कवर. मग खूप वैताग आला. आणि तिने देखील लक्ष दिले नाही. मग काय त्या चातक पक्षाप्रमाणे तीच्या एका नजरेच्या चंद्रासाठी हा चातक आसुसलेला. काय सांगू दुसरे तिसरे काहीच सुचेना. खूप वेळ वाट पहिली. पण ती कामात. आणि माझे आजकाल तिला पहाणे हेच काम. मी तरी काय करू? माझे आजकाल हेच चालू आहे. डोक्यात दुसरा तिसरा विचार येतंच नाही. माझ ना! सोडा.

बारा- सव्वा बाराच्या सुमारास ती फोन वरून माझ्या डेस्कपासून जात होती. तिच्याकडे पाहून नेहमीप्रमाणे हात हलवून हाय केले. आणि ती देखील ‘स्माईल’. किती छान हसते ती यार! आता ती गोष्ट वेगळी की, ती फोनवर हसत होती की माझ्याकडे या विचारांनी माझे पुढे डोके खाल्ले. पण ठीक आहे ना! तिने माझ्याकडे पहिले हे माझ्या करिता नोबेल परितोषिकपेक्षा नक्कीच जास्तच आहे. मी इतका खुश ना मग, काय सांगू सगळे इतके छान वाटत होते. सगळीकडे ‘आनंदी आनंद घडे’. दुपारी भूकच नाही लागली. डेस्कवर बसून तिलाच न्याहाळण्याचे सुंदर काम करीत बसलो. नंतर एक महाराज माझ्याशी बोलायला आला. आणि आमच्या अशाच गप्पा चालू होत्या. त्यावेळी देखील तसेच. ती पुन्हा माझ्या डेस्कच्या बाजूने चाललेली. यार ती माझ्या डेस्कच्या बाजूने जातांना माझी नजर दुसरी तिसरीकडे कशी असेल? तिच्याशी नजरानजर झाली. आत्तापर्यंत कधीच नजरेशी नजर भिडवण्याची हिम्मत केलेली नव्हती पण काल ‘चुकून’ झाली. पण काय सांगू. तिची ती मान खाली घालून हसत जाण्याची पध्दत. अंगावर शहारे आणणारे. अजूनही तेच आठवते आहे.

आता हे मी आधीही कुठेतरी पहिले आहे. अस अजूनही वाटते आहे. पण कुठे आणि कसे हे अजून आठवत नाही. ह्या ‘आठल्ये’ला ‘आठवले’ की सांगतो. यार आजकाल या अशा अनेक गोष्टी घडतात की त्या आधी कुठे तरी पाहिल्याप्रमाणे. आजही एक घडली. असो, त्यावर नंतर बोलू. मग काय अजूनही छान वाटायला लागले. आयुष्यातील सर्वात छान ‘शुक्रवार’ झाला तो. संध्याकाळी, जातांना ‘बाय’ करतांना बोलावं म्हटलं. पण काय चारच्या पुढे एक एक मिनिट एक एका तासासारखा. जाईच ना! शेवटी कसे बसे पावणे पाच झाले. चला आवरून तीच्या डेस्कवर जाऊ म्हटले. तर तो शेपट्या तीच्या डेस्कवर. यार त्या शेपट्याला ना एकदा चोपावे असेच मनात येत होते. थोड्या वेळाने पहिले तर हा बहाद्दर तिला तीच्या डेस्कवर कामासाठी घेऊन गेलेला. आणि तिला कामाला लावून हा शेपट्या साहेबासारखा मागे उभा. असो, खूप राग आला होता आणि दुख देखील झाले. शेवटी ती डेस्कवर आलीच नाही. खूप वाईट वाटत होते. काल काय काय ठरवलेले. सगळे शेवटी फूस. ती तीच्या डेस्कवर नव्हती.

खुपंच रडका चेहरा झाला होता. खाली जातांना गेटवर स्वाप करावे म्हणून माझे कार्ड त्या दिव्यासमोर धरले. आणि दोन्ही बाजूंनी एकावेळी स्वाप केले तर मोठा बीप वाजतो. आणि कधी कधी तो टाईम रेकोर्ड होत नाही. असही घडते. मग काय आधीच वैताग त्यातून म्हटलं कोण हीरो आडवा आला. तसाच पुढे निघालो तर समोर ‘अप्सरा’. सुरवातीला काही वेळ लक्षात आलाचे नाही की मी स्वप्नात आहे की सत्यात. आणि ते स्वाप तिनेच केलेले. काय ‘टाईम’ झाला ना! मी तर मनातल्या मनात देवालाच या ‘योगायोगाबद्दल’ धन्यवाद देत होतो. मी नेहमीप्रमाणे हात करून स्माईल आणि तिनेही तेच. यार किती गोड आहे यार! काय छान हसते. मी जातांना मागे बघितले तर तीच्या जवळ दोन मोठ्या बॅगा. कदाचित रक्षाबंधनासाठी. असो, पण काय सांगू किती आनंद झालेला त्यानंतर नाचावेसे वाटत होते. जिन्याच्या पायऱ्या उतरतांना मी किती उदास झालेलो. मनात नाही नाही ते विचार येत होते. आणि देवावर सुद्धा खूप राग आलेला. आणि त्यात तो शेपट्या. खूप राग आणि दुख. पण तिचे ते हास्य. किती वातावरण बदलून गेले. बस आता पुनः कधी येते आहे असे झाले आहे. पण जे तिचे कालचे तीनदा हास्य. कधीही न विसरता येण्याजोगे. अविस्मरणीय शुक्रवार.

Advertisements

4 thoughts on “ते तीन क्षण..

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s