अप्सरा नसतांना

यार कधी येणार ती? आता उद्या सुट्टी. म्हणजे झालं. बर आहे. पण कधी येणार ती अस झालं आहे. कितीही बोललं तरी कमीच वाटत तिच्याबद्दल. काल थोडा राग आला होता त्या घासदारांवर. सोडा, पुन्हा तिचा चेहरा आठवला की, राग निघून जातो. काल तिची खूप आठवण येत होती. मग तिची सोशल नेटवर्किंग वरील प्रोफाईल पाहत बसलो. तसे हे देखील रोजचेच चालू आहे. आज ती येणार नाही हे माहिती होत मला. पण तरीही ती असल्याचा भास होतो आहे. येतांना मस्त पावसाच्या सरी येत होत्या. म्हणून मग बस स्टॉपवर लवकर आलो. मस्त वाटत भिजायला. पण खूप लवकर गेला पाऊस. मी साधा भिजलो देखील नाही. पण पावसाच्या सरी आणि ते वातावरण मस्त होते. ती सोबत असती तरी अजूनही छान झाले असते.

शनिवारी संध्याकाळी हॉटेलात माझ्या मित्रासोबत गेलो होतो. रस्त्याने जातांना कपल्स पहिले की, तीची खूप आठवण यायची. म्हणून मी कधीच शनिवार/रविवार कुठेच बाहेर जात नाही. कारण जिकडे तिकडे हे कपल्स. आणि मग मला आधी खूप बेकार वाटायचे. पण आजकाल अस पाहिल्यावर तिची आठवण येते. मग मी अशा सुट्टीच्या दिवशी संगणकासोबत दिवस काढतो. अरे हो, सांगायचे राहिलेच. मी दुचाकी चालवली परवा मित्राची. म्हणजे आधी एक दोनदा चालवलेली. पण माझ्याकडे स्वतःची नाही. आणि दुसर्याच्या वस्तूला मी कधीच हात लावत नाही. म्हणून गाडी चालवायला शिकायची खूप इच्छा होती. अजून एक दोनदा फिरवली की लर्निंग लायसन्स काढून घेईल. म्हणजे भविष्यात हे राहिले अस नको व्हायला.

तसे अजून पोहता देखील येत नाही. कोकणात गेलो होतो त्यावेळी एक दोनदा कमरेला डब्बा बांधून पोहलो होतो. पण त्यालाही आता वर्ष झाले आहे. मला ना आता, कशातच कमी राहायचे नाही आहे. मला तिला, हे नाही येत, ते नाही येत अस म्हणून नाराज नाही करायचे. अरे ते एका सॉफ्टवेअरबद्दल सांगायचे राहूनच गेले. आता मी या एका कंपनीतमध्ये वेब डेव्हलपर म्हणून काम करतो आहे. पण ना, यात पुढे जावून काही फार मिळेल नाही अस वाटत आहे. तर एक एडोबचे फ्लेक्स नावाचे सॉफ्टवेअर आहे. तर ते शिकलो आहे. बघुयात एखादा प्रोजेक्ट मिळाला त्यावर तर, माझ्या रिझ्युम मध्ये टाकील. आणि बेसिकली ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि वेब अप्लिकेशनसाठी आहे. थोड्या ‘जावा’, ‘पीएचपी’ ची माहिती लागेल पूर्णच शिरायचे म्हटले तर. पण चिंता नसावी. फायद्याचे ठरेल. सध्याला तिचे आणि माझे दूर दूर पर्यंत कुठेच प्रोफाईल जुळत नाही आहे. पण या सॉफ्टवेअरच्या कृपेने मिळेल.

असो, आजकाल मी जरा जास्तच ‘जर.. तर’ च्या गोष्टी करतो आहे. पण नक्की होतील या गोष्टी. वडील म्हणतात, की आधी कोणतीही गोष्ट करायची, बोलायचे नाही. कामातून कळायला हवं. आणि मी तसे वागायचो देखील. पण आजकाल डोक्यात काय करू म्हणजे तिला मी आवडेल हेच चालू असते. आणि तिच्याविषयी बोलायची खूप इच्छा होते. मुळात रहावतच नाही. काल मी आई ला जप वाढवला सांगितल्यावर खुश झाली. वडीलही खुश होतील, ज्यावेळी त्यांना मी वन बीएचकेसाठी पैसे जमा केले आहे अस कळेल त्यावेळी. अजून काही महिने फक्त.. तसा वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. बस! ती कधी परत येते आहे अस झाले आहे.

Advertisements

2 thoughts on “अप्सरा नसतांना

  1. अप्सरा तुम्हाला दुचाकी शिकण्यासाठी, पोहणे शिकण्यासाठी, BCA कम्प्लीट करण्यासाठी प्रेरणा देतेय.. वाचून आनंद झाला गुड-Luk …..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s