प्रतिज्ञा प्रत्येकाची

राष्ट्रपतींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या मुलीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, ‘गुरु’जनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
मला दयेचा अर्ज केलेला आणि मला दयेचा अर्ज न केलेला फाशीचा हकदार
यांच्या फाशी रद्द करण्याची आणि त्यांच्यावर दया दाखवण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

पंतप्रधानाची प्रतिज्ञा
सोनियाजी माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे आम आदमी आहेत।
माझे सोनियाजीवर प्रेम आहे।
माझ्या सोनियाजींच्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या सोनियाजींचा, राहुलजनांचा
आणि गांधी घराण्यातील माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा पक्ष आणि माझे पक्षबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

संरक्षणमंत्रींची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे।
सगळे भारतीय सैन्य माझे नोकर आहेत।
माझ्या सैन्यावर माझे प्रेम नाही।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांच दहशदवादी नष्ट करीत आहे, याचा मला अभिमान आहे।
त्या हल्याच्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पाकिस्तानी दहशद्वाद्यांचा, चीनी आक्रमणाचा
आणि नक्षली माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझ्या देशात घुसखोरी करणारे घुसखोर आणि हल्ला करणाऱ्या राष्ट्र
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

गृहमंत्रीची प्रतिज्ञा
लुंगी माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे सॉफ्ट टार्गेट आहेत।
माझ्या खुर्चीवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या दहशदीचा मला अभिमान आहे।
ह्या खुर्चीचा सदैव पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या नेत्यांचा, पक्ष कार्यकर्त्यांचा
आणि नक्षली माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझ्या देशातील अतिरेकी हल्यातील आरोप सिद्ध झालेले अतिरेकी
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची सुटका ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

अर्थमंत्र्यांची प्रतिज्ञा
पैसा माझा देश आहे।
सगळे भारतीय माझे करदाते आहेत।
माझ्या करांवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या करावर मला अभिमान आहे।
ह्या पैस्याचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या मंत्रिमंडळाचा, इनकम टॅक्स खाते
आणि कर देणाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझ्या देशातील महागाई, बेरोजगारी
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
करदात्यांचे नुकसान आणि
त्यांची पिळवणूक ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

कृषीमंत्र्यांची प्रतिज्ञा
भारत माझा देश क्रिकेटप्रधान आहे।
सगळे बिझनेस माझे बांधव आहेत।
माझ्या सत्तेवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या जमिनींचा मला अभिमान आहे।
त्या जमिनी विकण्याची आणि शेतकरी कंगाल करण्याचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या स्वतःचा, माझ्या संपत्तीचा
आणि घोटाळे करणाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देशातील गुंड आणि चोर
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
माझे कल्याण आणि
माझी समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

खासदारांची प्रतिज्ञा
लोकसभा माझा देश आहे।
सगळे खासदार माझे बांधव आहेत।
माझ्या धंद्यांवर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या पगार वाढीच्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पैशांचा, काळ्या धंद्यांचा
आणि गुंड माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा पगार आणि माझे खासदार बांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
माझेच कल्याण आणि
माझीच समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।

Advertisements

6 thoughts on “प्रतिज्ञा प्रत्येकाची

 1. Herambh, I think you are going worng. In our India, President is excluded in any cotroversies, cartoons,comments etc. by law.This is what is taught to me in Civics in school. This is what I know upto now. Do you remember that you saw any cartoon of any President so far in India in any paper or periodical or anywhere?

  I think you must delete uregently your mimicry on President.

 2. वरच्या प्रतिक्रियेतल्या पहिल्या ओळीत ‘Herambh,’ वाचल्यावर मी आधी घाबरलो.. पण नंतर लक्षात आलं… 🙂
  चालूद्या..

 3. खरंच राष्ट्रपतींबद्दल असा कायदा आहे? इंटरेस्टिंग..पहिल्यांदाच ऐकतोय.

  मला तर ग्यानी झैलसिंग यांची खूप कार्टून्स लक्ष्मणजींनी बनवलेली आठवताहेत माझ्या लहानपणी. हल्लीच झाला असेल कायदा असा.

  मला पर्सनली असं वाटतं की ह्युमर शुड हॅव्ह नो बाऊन्ड्ज..हा विनोद किंवा विडंबन आहे हे सरळ दिसत असताना त्यात काही गैर वाटत नाही.

  माननीय राष्ट्रपती यांच्या “राष्ट्रपती” पणाशी रिलेटेड कामावर आणि कर्तव्यांवरच टिप्पणी आहे केवळ…

  वैयक्तिक, कौटुंबिक, शारीरिक व्यंगाविषयी असे काही नाही दिसत यात. माझ्या मुलीवर प्रेम आहे हे जरा खटकावे. पण विनोदाचे डिसेक्शन आणि परीक्षण म्हणजे आपल्या विनोद बुद्धीचे नुकसान.

 4. असा कायदा नाही. पूर्वी एकदा आयबीएन लोकमत वर टोमॅटो फेकुन मारण्याचा खेळ सुरु केलेला आहे. त्यावर पुर्वी एक पोस्ट पण लिहिले होते.. इथे आहे ते. इव्हन राष्ट्रपतींना पण कळवलं होतं, तरीही काही झालं नाही..

 5. वाचताना भारताच्या प्रतिज्ञेची वाट लागलेय याचे वाईट तर वाटते, पण तुम्ही जे लिहिलंय ती वस्तुस्थिती आहे याचे दु:ख अधिक भयानक आहे… विशेषत: कृषीमंत्र्यांची प्रतिज्ञा

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s