मराठी बातम्या

डिंग डोंग डिंग… नमस्कार आजच्या दुपारच्या ‘न्यूजमॉल’मध्ये तुमचे स्वागत.. सुरवातीला पाहुयात ‘हेडलाईन्स’. ‘मल्टिप्लेक्स’मध्ये मराठी चित्रपटांचे दर कमी होणार. गरज पडल्यास साहित्य संमेलनाचे ‘ऑडिट’करू, राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांचे आश्वासन. लवासाच्या चौकशीची शक्यता, आमच्या ‘न्यूजचॅनेल’चा ‘इम्पॅक्ट’. आर.आर.पाटील बनले ‘आर.जे’. ‘मिस मेक्सिको’ जिमेना नवारते ठरली ‘मिस युनिव्हर्स’. श्रीलंका तिरंगी मालिकेच्या ‘फायनल’मध्ये.

आता ‘न्यूज’ सविस्तरपणे. मराठी चित्रपटांसाठी तिकीटांचे दर कमी करण्याचा निर्णय ‘मल्टिप्लेक्स’ मालकांच्या संघटनेनं घेतलाय. मराठी चित्रपटांना ‘प्राईम टाईम’ मिळाला पाहिजे नाहीतर खळ्ळ आणि फटॅकचं आंदोलन केलं जाईल असा इशारा राज यांनी दिल्यानंतर रविवारी उद्धव यांनीही ‘मल्टिप्लेक्स’च्या मराठीच्या राजकारणात उडी घेतली होती. जर मराठी चित्रपटांसाठीचे तिकीट दर कमी केले नाहीत तर रस्त्यावर येण्याचा इशारा शिवसेनेनं दिला होता. त्यामुळे एक भाऊ ‘प्राईम-टाईम’साठी तर दुसरा तिकीटांच्या दरांसाठी ‘मल्टिप्लेक्स’वाल्यांच्या मागे लागल्याचं चित्र होतं. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अखेर आज ‘मल्टिप्लेक्स’च्या मालकांनी मराठी चित्रपटांसाठी तिकीटांचे दर कमी करण्याचं आश्वासन दिलंय. आठवडाभरात ‘मल्टिप्लेक्स’मधील मराठी चित्रपटांसाठीचे तिकीटदर कमी होतील अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या श्वेता परुळकर यांनी दिलीय. आता वळूया पुढील बातमीकडे..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या हिशेबाबाबत चाललेला वाद चुकीचा आहे. या संदर्भात वेळ पडल्यास साहित्य संमेलनाच्या आर्थिक व्यवहाराचे ‘ऑडिट’ करू असे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी सांगितले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ब्रेकिंग न्यूज–कोट्यवधीचे हिरे चोरणाऱ्यांना दुबईत पकडले…

आताच माहिती आलेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील ‘नॅशनल एक्‍झिबिशन सेंटर’मध्ये भरलेल्या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या दागिन्यांच्या प्रदर्शनातून हिऱ्यांचे दागिने चोरणाऱ्या चार चोरट्यांना मंगळवारी दुबईत अटक करण्यात आली. कापोस मोलान एलियाज, गुरेरो ल्यूगो, गोंझालेझ मालडोनाडो मॉरिसो आणि गुटिरेझ ओर्लांडो अशी त्यांची नावे आहेत. चोरी करण्यात चौघांना अन्य कोणी मदत केली आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत. आता घेऊयात एक छोटासा ‘ब्रेक’.. कुठेही जाऊ नका पहात रहा बिझी..तासनतास.. दोन चार पाऊल पुढे मागे पुढे..

‘ब्रेक’नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत. आता वळूयात आमच्या ‘न्यूजचॅनेल’चा ‘इम्पॅक्ट’कडे लवासा ‘हिलसिटी’प्रकरणी आता चौकशी होण्याचे संकेत मिळताहेत. २००२ मध्ये भाडेतत्वावर देण्यात आलेल्या ३४८ एकरच्या जमिनीप्रकरणाच्या कागदपत्रांची आता सरकार तपासणी करणार आहे. नव्वद कोटी रुपये वार्षिक भाड्याची जागा फक्त २.७५ लाख रुपये वार्षिक भाड्याने दिल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं.

भारतातील पहिली ‘प्लॅन्ड सिटी’ उभारण्यासाठी लवासानं सरकारी जमिनी लाटल्याचं उघडकीस आलंय. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ९० कोटींची महसूल खात्याची जमीन लवासाला अवघ्या पावणेतीन लाखात ‘लीज’वर देण्याची कर्बगारी गाजवलीय. त्यामुळे ३४८ एकरच्या कागदपत्रांची महसूल विभाग चौकशी करणार आहे.

आता पाहुयात एक खास न्यूज. शेती आणि शेतकऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या ‘ग्रीन एफ एम’ या रेडीओ चॅनल’चे आज सांगलीत उदघाटन झाले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वेगळ्या पद्धतीने हे उदघाटन केले. आबा यावेळी चक्क ‘रेडीओ जॉकी’ झाले. त्यांनी या वाहिनीवरून थेट श्रोत्यांशी संवाद झाला. कृषी विषयाला वाहिलेल्या ग्रीन एफ एम या ‘रेडीओ चॅनल’च्या प्रक्षेपणाला आजपासून प्रारंभ झाला.

मेक्सिकोची जिमेना नवारेत ठरली आहे, ‘मिस युनिव्हर्स २०१० ‘… लास वेगास इथं काल झालेल्या एका झगमगत्या सोहळ्यात जगभरातील ८२ सौंदर्यवतींना मागे टाकत जिमेनानं हा बहुमानाचा किताब पटकावला.

दम्बुला ‘वनडे’त लंकेनं भारतावर ४ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवलाय आणि ‘ट्रायसीरीज’च्या ‘फायनल’मध्ये प्रवेश केलाय. सदोष पंचगिरी आणि लंकेच्या ‘स्विंग बोलिंग’पुढं भारताची ‘बॅटिंग’ धडाधड कोसळली. ‘मॅच’मध्ये महेन्द्रसिंग धोनीनं ‘टॉस’ जिंकून पहिली ‘बॅटिंग’ स्वीकारली पण लंकेच्या भेदक माऱ्यामुळं भारताच्या ‘टॉप ऑर्डर’ची घसरण झाली. सहवाग आणि कार्तिक स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ‘विकेट्स’ची रीघ लागली. अवघ्या ७१ ‘रन्स’मध्येच भारताची निम्मी ‘टीम’ माघारी परतली. ‘कमबॅक’ करणाऱ्या युवराज सिंगनं एका बाजूनं संघर्ष सुरू ठेवला. युवीनं ३८ रन्स केल्या. पण भारताची पडझड थांबली नाही. ३३.४ ‘ओव्हर्स’मध्ये अवघ्या १०३ ‘रन्स’वर धोनी ब्रिगेडचा डाव आटोपला. लंकेनं ते लक्ष्य दोन विकेट्सच्या बदल्यात अगदी सहज पार केलं आणि ‘बोनस पॉइंट’ही कमावला. या विजयामुळं लंकन ‘टीम’ ‘सीरीज’च्या ‘फायनल’मध्ये पोहोचलीय.

आता वेळ झालीय पुढच्या कार्यक्रमांची. पुन्हा एकदा हेडलाईन्स…
तुम्ही पहात रहा बिझी..तासनतास.. दोन चार पाऊल पुढे मागे पुढे..

Advertisements

2 thoughts on “मराठी बातम्या

  1. Very good writeup..Just one thing, what is the point you are trying to make? Of course not necessary that each post must make a point..just got curious if I am missing any point that you are trying to make.

  2. फक्त आणि फक्त निगेटिव्ह आणि फालतू बातम्या, लोकशाहीचा फोर्थ पिलर डळमळीत झालाय अजून काय!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s