मी एक मूर्ख

खूप आधीपासून बोलायचे होते. पण नेहमी मी टाळत होतो. म्हणजे अगदी त्या इमेलच्या प्रकरणाच्या वेळी. मागील मराठी दिनाला मी एक ओळीचा इमेल टाकला होता. त्यावर पुढे काही जणांनी त्या मेलचा वापर त्यांच्या ब्लॉगच्या प्रसिद्धीसाठी करून घेतला. तेव्हाच एकीने ‘मूर्ख आयटीवाला’ अशी पदवी दिली होती. तेव्हाच माफी मागितली होती पण अनेक ब्लॉग बंधूंनी माझी हवी तशी आणि हवे त्या भाषेत त्यांची मते दिली होती. आणि ती मते मला मान्य देखील होती. कारण ती चूक माझ्यामुळेच सुरु झाली होती. प्रत्येकाला हवी ती आणि तशी मते मांडण्याचा अधिकार आहे. आणि मला देखील ते मान्य आहे. मी देखील माझी मतेच मांडत असतो रोज. फरक फक्त इतकाच की मी, फक्त माझ्याच बद्दल बोलतो. मला काय वाटले, माझ्यासोबत काय घडले. बस्स! यापलीकडे मी जातच नाही. आणि गेलो तरी जेवढ्यापुरते तेवढेच.

जास्त स्वताचे ज्ञान! म्हणजे मी ज्ञानी आहे अस मला बिलकुल म्हणायचे नाही आहे. मी एक मूर्खच आहे. नव्हे तर महामूर्ख आहे. बघा ना! मला कधीच चारोळी, कविता किंवा देशात काय घडले पाहिजे. लोकांनी काय केले पाहिजे. कर किंवा देशाचे संरक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे. यावर कधी बोलतच नाही. काय खाल्लं, काय केल. यावर बोलतो. आता समाज किंवा देश, धर्म यावर बोलत नाही. म्हणून कदाचित माझ्या नोंदी ‘अर्थहीन’ असतील. कदाचित काय आहेतच. बरोबर आहे. मला गर्लफ्रेंड नाही म्हणून मी काहीही बोलायला नको. मी स्वतःला ‘आवरा’यला हवे.

असो, माझ्या ब्लॉग मित्र आणि मैत्रिणीची… आता ते मानतात की नाही देव जाणे. पण त्या सर्वांची मी महामूर्ख हात जोडून माफी मागतो. तुम्हाला त्रास झाला. त्याकरिता मी तर खरा क्षमेचा देखील पात्र नाही आहे. पण तरीही तुम्ही क्षमा मागतो. माझ्यामुळे मराठी ब्लॉगचा स्तर घसरला. मराठी भाषेत ‘अर्थहीन’ नोंदींचा कचरा वाढवला. यापलीकडे मी काहीच नाही केले. आणि हे सर्व मला मान्य आहे. आणि माझ्या नोंदींना काहीच ‘दर्जा’ नसतो हे देखील मान्य. पण मुर्खाकडून दर्जाची अपेक्षा करणे हे देखील मूर्खाचेच लक्षण आहे म्हणा! तरी माझी सर्वांना हीच विनंती आहे, की आपण यापुढे घडणाऱ्या माझ्या ‘अर्थहीन’ नोंदीना क्षमा करावे. कारण उगाचंच तुम्ही, मी कसा आणि किती मूर्ख आहे यावर नोंदी लिहिण्याचा त्रास घेणार. आणि मी त्या वाचून नाराज होणार. आता खर तर मला कोण आवडते, काय आवडते किंवा माझे मत महत्वाचे नाही. आजी काय करतात किंवा इंडिया पुढच्या सामन्यात काय करणार यावर चर्चा महत्वाचे आहे. पण मी त्या गोष्टींवर कधीच काही बोलणार नाही. मग तुम्हाला ते आवडणार नाही.

कारण माझ्यासारखा महामूर्ख स्वतःची अक्कल पाजळणे योग्य नाही अस मला वाटते. तरी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की, कृपा करून माझ्याकडून त्या ‘एक्स्पर्ट’ नोंदींची अपेक्षा ठेवू नका. अर्थहीन नोंदींची अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची क्षमा मागतो.

Advertisements

19 thoughts on “मी एक मूर्ख

 1. अरे हेमंत..काय हे..

  अशा कॉमेंट्स सगळ्यांनाच येतात.

  मलाही ”
  लेखन थांबवावे..” “मला लेखनाची फार खाज आहे..” “कोणीही उठून ब्लोग सुरु करतो..” आणि काय काय म्हणून प्रतिक्रिया येतात..

  आपण असा विचार केला तर ब्लोग लिहायलाच नको.

  अपसेट व्हायला तर होणारच.. मग आपण एक जनरल आवाहन करावे..”ज्यांना दर्जेदार काही हवे आहे त्यांने स्वत: ब्लोग सुरु करून उत्तम उदाहरण बनवावे..धन्यवाद..”

  लगे रहो यार..

 2. हेमंता,
  अरे शांत हो! तुझे किती आणि कुठून कुठून वाचक आहेत ते तुला वर्डप्रेस स्टॅटिस्टिक्स मधून कळतच असेल!
  किती लोक तुझे लेख नियमित वाचतात हे ही तुला ठाऊक असेल!
  मनाला योग्य वाटेल ते लिहित राहा!

 3. तुमचे लेखन हे आवडीने वाचले जाते, तेव्हा अशा कमेंट्सकडे लक्ष देउ नये आणि मनाला लावुन घेऊ नये.

 4. तुमचे मनापासुन लिहीने मला खुप आवडते कदाचित त्याचमुळे सगळ्यांना तुमचा ब्लोग आवडत असेल.
  तुम्ही तुमचे लिहीने एन्जोय करता ना मग बाकीचे जग काय म्हनते हा विचारच कशाला.
  उगाचच मनाला लावुन घेउ नका..

 5. हे बघ हेमंता,

  ज्याला कुणाला काय बोलायचं असेल ते बोलू देत. त्यांच्याकडे लक्ष नकोस देऊ तु.
  तु लिहीत रहा रे आम्हीं वाचतोय ना.

 6. Hey Hemant, I am regular reader of your blog and m enjoying each and every topic of your blog…
  Lok donhi bajune boltat and upset hone pan sahajik ahe… tari pan je kahi tumhi lihitat, tumchyabaddal,apsarabaddal, ani dusre topics pan te amhi enjoy karto…
  Shevti kay.. Aplyala je lihavese vatate te apan lihinar bhalehi mag te bharatatlya chalu ghadamodi asot kinva politics baddal aso nahi tar Apsarabaddal… aplyala je lihyala avadte tech lihiyace..
  Pls continue ur writing

 7. कोण म्हणतं रे तू चांगलं लिहीत नाहीस? त्यांना म्हणावं मग तुम्ही “लिहावं कसं?” याचे क्लासेस घ्या! मी घेतो म्हणा ऍडमिशन! कॅरी ऑन! जसं लिहितोस तसंच लिहीत रहा! बेस्ट लक!

 8. हे बघ मित्रा, ब्लॉग तुझा आहे. तुझ्या ब्लॉगवर काय लिहायचे ते तु ठरवायचेस, इतरांनी नाही. त्यामुळे मला नाही वाटत की तु इतरांची माफी मागावीस, किंवा स्वतःला मुर्ख म्हणावेस.

  पण हाच प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला. जेंव्हा हजारो ब्लॉग मराठीविश्ववर येत असतात तेंव्हा काही निवडक वाचालया येणार्‍या लोकांच्या दृष्टीने इतर ब्लॉग हे कंटाळवाणे, निरर्थक वाटु लागतात आणि जेंव्हा ह्या गोष्टींची व्याप्ती वाढते तेंव्हा अश्या कमेंट्स येऊ शकतात.

  मी माझ्या पोस्ट मध्ये म्हणालो होतो तसे मी माझ्या ब्लॉगच्या बाबतीत पॅशनेट आहे आणि कोणी माझ्या ब्लॉगला काही म्हणावे ह्या आधीच माझा ब्लॉग मी तेथुन काढुन टाकला. ज्यांना माझा ब्लॉग आवडतो ते सबस्क्राईब करती ना. आता मी माझ्या ब्लॉगचा पुर्णपणे मालक आहे. आता जर कुणी आला आणि मला काही म्हणाला तर त्याला काय आणि कसे ऐकवायचे ते मला माहीती आहे.

 9. काय यार…
  तू ब्लॉग त्यांच्यासाठी नाही लिहत..
  स्वत:साठी लिहतोस आणि लिहावाच. लक्ष फक्त ब्लॉगकडे असु दे…
  लिहते रहा

 10. हेमंत
  अर्थातच त्या माणसाने आपले खरे नांव दिलेले नसेलच.अशा लोकांना बिननावाच्या कॉमेंट्स देण्याची फार खाज असते. दुर्लक्ष कर. आणि लिहित रहा.. ज्याला हवं तो वाचेल, नाहीतर राहिलं… अनिकेतने वर लिह्ल्याप्रमाणे स्वतःला मूर्ख वगैरे म्हणवून घेण्याचे टाळत जा..
  पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा..

 11. कुत्रे भुंकतात म्हणून हत्तीने चालायचे सोडायचे नसते. ज्यांना त्रास होतो त्यांना वाचू नका म्हणायला शिका.

 12. हेमंत…

  तु ब्लॉग कोणासाठी लिहतोय?? स्वतःसाठी की लोकांसाठी?

  बोलणारे …बोलतच राहणार…दुर्लक्ष कर…. बिन चेहर्‍याच्या माणसांचा विचार करु नकोस.

 13. इतराना हिणवून आपण मोठे होतो असा बऱ्याच जणांचा समज आहे. किमान त्याना मोठेपणा मिळविण्याची संधी देण्यासाठी ब्लॉग चालू ठेवला जावा.

 14. मि तुमच्या ब्लोगचि नियमित वाचक आहे….तुम्हि मनापासुन लिहिता म्हणुन मला तुमचा ब्लोग आवड्तो….चांगल्या गोष्टिला प्रेरणा देनारे खुप कमी लोक असतात म्हणुन लोकांचा विचार न करता बिनधास्त्त लिहित रहा…पुढिल लिखानासाठि शुभेच्छा…….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s