शिवरायांचा इतिहास २०२०

शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता कधी झाला याची तारीख राज्यशासन ठरवेल त्या तारखेला झाला अस मानायला काही हरकत नाही. त्यांची आई जिजाबाई. त्यांचे वडील शहाजी राजे. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले. त्यांना दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज या सर्व टीचर्स ने शिकवले. पण यातील कोणीच त्यांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी स्वराज्याची’ स्थापना केली. आणि स्वराज्याची पताका म्हणून तिरंग्याची निवड केली. शिवरायांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकून स्वराज्य चौफेर पसरले. परंतु शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते. अगदी महात्मा गांधी प्रमाणे. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशहाला डोळ्यात खुपणारा होता. म्हणून आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले.

अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते. अगदी लंगोटी यार. यावरून महाराज किती धर्म निरपेक्ष होते याचा अंदाज करायला हरकत नाही. आणि शिवाजी महाराज मशिदीत सुद्धा जायचे अफझल सोबत. मोठ्या लवाजम्यासह अफझल खान शिवाजी महाराजांना समजवायला. अफझल खान येतो आहे असे समजताच, राजे आनंदून गेले. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफझल खानसाठी एक मोठा शामियाना उभारला. खान आला आणि महाराजांकडील ऐश्वर्य पाहून आनंदित झाला. महाराज आपल्या सोबत जीवा महाला घेऊन भेटीसाठी आले. जीवा महाला शामियाना बाहेर उभे राहिले. महाराज शामियान्यात गेले. दोघा मित्रांनी एकमेकांना पाहून कडकडून आलिंगन दिले. पण तेवढ्यात, अफझल खानला छातीत जोरात कळ आली.

आताच्या भाषेत ‘हार्टअटॅक’. महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने अफझलखान वाचू शकला नाही. कळीच्या वेदनेने अफझलखान ‘बचाव’ म्हणून किंचाळला. अफझलखानाचा सच्चा सेवक सय्यद बंडाने शिवाजी महाराजांनी घात केल्याचा असा समज होवून, त्यांच्यावर वार केला. महाराजांना वाचवण्यासाठी जीवा महालाला सय्यद बंडाला मारावे लागले. ह्या घटनेने महाराजांना अतिशय दुख: झाले. महाराजांनी मुस्लीम पद्धतीने अफझलखानचे अंत्यसंस्कार केले. आणि त्याची एक कबर बांधली. आणि महाराज नेहमी त्या कबरीला भेट देत असत. परंतु याच घटनेचा काही समाजकंटकांनी महाराजांबद्दल अफवा पसरून आदिलशाही आणि शिवशाही मधील वैर वाढवले. हिंदू आणि मुस्लीम ऐक्याचे दोर त्यामुळे तुटले गेले.

अफझलखानाच्या मृत्यूमुळे आदिलशहा चिडला. महाराजांना संपवण्यासाठी त्याने सिद्धी जोहरला सर्व शक्तीनिशी पाठवले. शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच पन्हाळगडावर गेले. परंतु सिद्धी जोहरने पन्हाळगडला वेढा देवून रसद तोडली. महाराजांनी काही काळ वेढा उठण्याची वाट पाहिली. परंतु सिद्धी जोहरचा वेढा काही उठेना. मग महाराजांनी शिताफीने विशालगडावर पोहचण्याचे ठरवले. एके रात्री महाराज सिद्धीच्या वेढ्यातून निसटले. सिद्धीस ही बातमी कळताच त्याने महाराजांचा पाठलाग करण्यास सुरवात केली. घोडखिंडीत महाराजांना सिद्धीने गाठले. बाजीप्रभूने महाराजांना विशालगडावर पोहोचायला विनंती केली. जोपर्यंत महाराज पोहचणार नाहीत तोपर्यंत बाजीप्रभूने सिद्धीच्या सैन्याला झुंझत ठेवण्याचे वचन दिले. महाराज गडावर पोहचले. परंतु तोफेच्या आवाजानंतर सिद्धीच्या विशाल सेनेपुढे बाजीप्रभूने आपले प्राण सोडले. महाराजांना ह्या गोष्टीमुळे अतोनात दुख: झाले. त्यांनी त्या घोडखिंडीचे नाव ‘पावनखिंड’ असे ठेवले.

त्याकाळी मोगल सम्राट भारतात सर्वात प्रबळ होते. त्यातील सर्वात प्रबळ मोगल म्हणून औरंगजेब दिल्लीचा बादशहा होता. परंतु राज्य शासनाच्या समितीच्या सूचनेनुसार हा भाग वगळण्यात आला आहे. शिवरायांच्या बंदोबस्तासाठी औरंगाजेबने त्याचा मामा शाहिस्तेखानला स्वराज्यावर पाठवले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. महाराजांनी शाहिस्तेखान भेटीसाठी निघाले. परंतु पोचायला रात्र झाली. अंधारात महाराजांना पाहून शाहिस्तेखान गडबडला. आणि अंधारात त्याला पुढे काही न दिसल्याने खिडकीतून पडला. परंतु महाराजांनी त्याला हात देवून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काच कापल्याने शाहिस्तेखानची बोटे कापली गेली. महाराजांनी मारण्याचा कट केला अस समज करून शाहिस्तेखान पळून गेला. आणि त्यामुळे औरंगजेब अजूनच चिडला. यापुढील इतिहास भाग राज्य शासनाने वादग्रस्त ठरवून अभ्यासक्रमांतून गाळण्याचा निर्णय घेतला असल्याने महाराजांचा इतिहास सध्याला तरी इतकाच आहे.

Advertisements

51 thoughts on “शिवरायांचा इतिहास २०२०

 1. Kahi sangata yet nahi … kahi divasani asach Itihas disel school madhe…. changalach shal joditali marali ahe… kahi lok vinakaran Maharajan war politics kartat … khartar konachich tewadhi layaki pan nahi Maharaj kuthe ani he sagale ardhe shahane kuthe….

 2. आपलं प्रस्तुत लिखाण वाचलं, पण नक्की आपणाला काय प्रेरित करावयाचे आहे ते काही गळी उतरलं नाही. आशा करतो कि ते आपणाला नक्कीच उमजल असावे.

 3. असे काही भविष्यात लिहिले जाने शक्य नाही. कारण तुमचा गैरसमज आहे कि शासन कुणाच्या दबावाखाली किंवा लांगुलचालनासाठी काही करते.

 4. keep it up hemant,
  apalya political leaders na shivajimaharaj, Ambedkar yanchya var politics karne, corruption karne, yashivay dusre kahi yet nahi.
  Ani for others…
  ha article vidamban mhanun ghyava ani nasel tar ya blogvar visit deu naye…

 5. Asa kadhi aikala, vachala nasalela itihas sangoon aapnas kai suchit karayache ahe? lekhak mahashay, mazyasarakhe khup jan itihas vachun dyan milavayacha prayatna karatat va pudhehi tya dnyanacha upyog exam la basatana hoto, pan asa jar itihas tumhi viewers-readers na vachayala dilat tar vachun chakkar yeil. apala vel aapan changale sanshodhan karnyasathi ghalavava ase mi suchvit ahe.

 6. e bandal akshay
  tula tari mahiti ahe ka itihas fakir….
  tula vidamban navacha prakar tari mahiti ahe ka ..?
  adaani kutcha…..
  var mhantoy kasa jay bhavani jay shivaji…

 7. Tumach likan faltu nahi agdi keshav sut yachi jase vidanban tase. karah siksana cha kkelkandoba chalal. konala hi kuthe hi admission layki nastana. sheela ki jawani, munni badman huei hya madhe pudachy pidi shivaji maharaj eivaji thakre garane chy itihas path hohil. mantryachi mule salet jatat ki nahi thauk nahi. ankin 2 4 varshyne konti lession book madhy yetil yacha barosa nahi.

 8. Kahi sangata yet nahi … kahi divasani asach Itihas disel school madhe…. changalach shal joditali marali ahe… kahi lok vinakaran Maharajan war politics kartat … khartar konachich tewadhi layaki pan nahi Maharaj kuthe ani he sagale ardhe shahane kuthe….

 9. i totally agree with feedback of Aniket Kulkarni (dt.24.12.10) and Shobha (dt.18.07.12).
  Hemant cha lekh Maharajan vishyi faltu bolat nahi, tar aplya ajchya faltu politics vishyi bolto. he samajanyachi jyachyat akkal nasel, tyane faltu made ithe reply deu naye. ha 1 vidamban lekh ahe, “Itihas 2020” ya tach sare kahi yete. these two are exact opposite words. ata paryat 45 feedback milale ya blog var, paiki fakt 2 janana kalale he. shame on u al……….

 10. Are marathi mansa tumch sare khare ahe pan jagat sarvat jast itihas tumchyapeksha mala mahit ahe. Are jya rajyane purn ayush kewal swarajyasathi jagla.An ek lakshat theva ki kahijan Babasaheb purandare(bhramhan)maharajanchya khunachi supari hi mhane tyanchya baykone ghetli hoti mhane are tyanchya sarya bayka ya kewal swarajyat shivajiraje an shivajirajenmadhe swarajya.tar tyanchi bayko tyancha khoon karuch shakat nahi.Shivajirajyanchya khoon ha bhramhananni kela ahe an bhramhananni kadhi khara itihas ha mandla nahi janoon bujoon shivajirajyanchi badnami karnyach kaam he bhramhananni kelay.Are marathyanche khare shatru he muslim nasun bhramhan ahet he lakshat theva.Majhya rajyancha khara itihas samajvaych bhagya ya MARATHYALA MILALA jay bhavani jay shivaji. Ekach awaj ekach paryay jay jijau jay shivray.

 11. तुम्ही असे काही लिहित जावू नका. याद राखा असे लिखाण खपवून घेतले जाणार नाही. कारण असे लिखाण करून तुम्ही ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत ( जरी त्यांना उपरोधिक लिखाण कळले नसले तरी) व त्यामुळे ज्या अश्या लोकांनी तुम्हाला शिव्या घातल्या आहेत, त्या लोकांना तुम्ही देशाच्या उत्तर व उत्तर- ईशान्य
  भागात प्रत्यक्ष जावून शौर्य दाखविण्यापासून वंचित ठेवले आहे.कारण त्यांना ’आपण देशभक्त’ आहोत असे दाखविण्याची संधी तुम्ही त्यांना , त्यांच्या शिव्यांच्या माध्यमातून ,दिली आहे. आता ते कदाचित (जिवंत किंवा तीनशे वर्षापूर्वीचा) ’जाणता राजा’ चा प्रयोग बघून आपला राग शमवतील. कदाचित अश्या प्रकारचे लेख लिहीण्याचे तसेच त्यानंतर अश्या लेखानंतर निषेध करून घेण्यासंबधी तुमची हातमिळवणी झाली आहे का अशी शंका येते. असे लेख वाचल्यानंतर, निषेधात्मक वेगवेगळे मार्ग अवलंबविण्याकरीता तुम्ही त्यांना अंतस्थ मदत करीत आहात. कारण असे मार्ग वापरल्यानंतर, शमलेला कंड त्यांना फक्त इतिहासात लोळण्याकरिता मदत करतो.व प्रत्यक्ष नवा इतिहास घडविण्याचे श्रम घेण्यापासून रोखतो. त्यातील आनंद औरच असतो.

 12. शिवरायांचा जाज्वल्य ईतिहास हा काही थट्टेचा विषय नाही.
  आठल्ये तुम्ही तुमच्या बुद्धीची दिवाळखोरी सिद्ध केली आहे.
  तुम्ही माझ्सा समोर असते तर तुमच्या कानाखाली प्रतिक्रीया नोंदवीली असती

 13. Are ky he aaplya manani tayar karun pathavta
  tumhala ky watale ki itihas badlun tumhi khup mothe lekhak honar
  maharajancha itihas kahi thatta nahi je tumi 3 Te4 oli lihun taklyat
  tumche likhan tumhich wacha
  maratyachya rktatach rajancha itihas jodun yeto

 14. Aplya Raja baddal thoda pan abhiman watat asel tar please asa kahihi chukicha lihu naka …… tumchya chukichya lihnyane apla dharm khup dukhvla jaat ahe…. ekjoot vha…Marathanchya samrajya yeu de ………….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s