काकूंची कृपा

आज दुपारपर्यंत तिला एक मिनिट सुद्धा मला ढुंकून बघायला वेळ नव्हता. आणि मी पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे. तडफडत होतो. काही नाही. एकदाचं माझ्या बाजूने गेली. पण मला न बघता. आज माझ्या मित्रांसोबत मी कंपनीच्या नवीन कॅन्टीनमध्ये गेलेलो. ती नेहमी तिथे जेवण करते. वाटलं ती तिथे असेल. पण गेल्यावर खूप शोधलं पण ती नव्हती. मग जागा शोधून एका ठिकाणी बसलो. माझ्या एका मित्राने ती आजकाल जुन्याच कॅन्टीनमध्ये जेवते अस सांगितले. मग माझाच मला राग आला. कशाला इकडे तडफडलो अस झालेलं. पण काही उपयोग नव्हता. कारण माझ्या सोबत असलेले दोन मित्र कुपन घेऊन रांगेत उभे होते.

त्यातील एका मित्राने मेसेज केला की ‘मी रांगेत उभा आहे. तू सुद्धा ये. ती आहे’. मग काय, सुरवातीला वाटले हे मस्करी करीत आहेत. म्हणून मी काही गेलो नाही. मग दोघातील एक मित्र आला. आणि मला ‘जा’ म्हणाला. जातो तर खरंच ती त्याच्या रांगेत. काय सांगू किती आनंद झालेला. आणि ती माझ्याकडे पहात होती. मग काय करू आणि नको अस झालेले. म्हणजे मग मी सुद्धा तिची स्टाईल मारलेली. लक्ष नाही अस दाखवले. एक तर ती आज इतकी छान दिसत होती. त्यात ती माझ्याकडे पहात होती. खूप आनंद झाला होता. जेवण उरकून मी डेस्कवर आलो. तीनच्या सुमारास काकूंनी पिंग केले. आता काकूंना महिन्यातून एकदा कामात काही अडचण आली की येते माझी आठवण. मग काय त्यांना, काम समजावून दिले कम्युनिकेटरवर. पण त्यांना काहीच नाही कळले.

मला डेस्कवर येऊ का? अस विचारलं काकूंनी. सुरवातीला पुन्हा भूतकाळाची पुनरावृत्ती नको असा मनात विचार आला होता. पण मी हो म्हणून टाकल. त्या आल्या. आणि बराच वेळ माझ्याशी बोलत होत्या. त्या येऊन पाच एक मिनिट झाले नसतील. तर अप्सरा. अगदी तीच आधीची स्टाईल. म्हणजे मला बघत बघत जाणे. आणि खर सांगतो. ती ज्यावेळी माझ्या डेस्कच्या बाजूने जाते त्यावेळी माझी नजर आपोआप तिच्याकडे वळते. आजही तेच झाले. तीचा तो निर्विकार चेहरा. इकडे ह्या काकू बोलत होत्या. आणि तिकडे मी आणि ती एकमेकांकडे पहात होतो. अस अगदी क्वचितच घडलेलं आहे. आणि हो, मागील वेळी देखील असच, काकू माझ्याशी बोलत होत्या, आणि लगेचंच कसं अप्सरेची पाण्याची बाटली मोकळी होते? हा प्रश्न सतावतो आहे.

कदाचित मला ती आवडती ना, म्हणून मी हा ‘योगायोग’ला. सोडा. पण छान वाटत होते. जातांना ‘बाय’ करावं म्हणून मी माझा मोबाइल तीच्या डेस्कवर थोडासा आपटला. म्हणजे तीच लक्ष जाव म्हणून. आणि तिला ‘बाय’ म्हटलं. आणि ती नेहमीप्रमाणे ‘हाय’. आणि हात समोर केलेला. मग स्वतःच हसली. मलाही हसू फुटलं होत. पण तिच्यासमोर मी शांत. खाली बाईकवर बसल्यापासून ते घरी येईपर्यंत, आता सुद्धा दुध आणायला जातांना तेच आठवत होते. अजूनही तेच आठवते आहे. आणि मग हसू येते. असो, तीचा देखील घसा बसला आहे. आणि या हसण्याच्या नादात आज मी एकाच्या अंगावर गाडी घातली. म्हणजे उडवलं वगैरे नाही. पण गेली थोडीशी. तो देखील तोच विचार करीत असेल. बाजूल उभा होता बिचारा. मी गाडी सुरु केली. आणि क्लच सोडला. झटका बसल्याने गाडी गेली त्याच्या अंगावर. ‘सॉरी’ बोललो. पण त्यावेळी देखील हसूच येत होते. तो देखील मनातल्या मनात मला शिव्या देत असेल. असो, अस पुन्हा करणार नाही. पण काकूंच्या कृपेने आज तिला डोळेभरून पाहता आले. खूप मस्त वाटते आहे.

Advertisements

3 thoughts on “काकूंची कृपा

 1. Good going.
  hee najra najar,kataksh,dolyaanchee bhasha vagaire romantic mhanoon enjoy karayalaa khoop chaangle. Maja asate. Pan long run madhe jeebh mahatvaachi. Tondaane bolalele te khare. Netrpallavi,kataksh vagaire sarv maayajaal at ev aabhaas…..

 2. संदीप खरेच्या “येईन स्वप्नात” या गाण्याची एमपीथ्री तिच्याकडे नसेल तर दे. ब्लू टूथने. तुला नेटवर मिळेल.

  “तुझ्या नावात माझ्या नावाला घेशील का जरा??” ही ओळ मस्त..

  म्हटलं तर सजेशन, म्हटलं तर जास्त एमपीथ्री शेअरिंग.. शेवटी हे एक गाणंच आहे…ऐकायला दिलंय.. नो टेन्शन..

  येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
  तुझ्या मनाचं गुलाबी फूल देशील का मला??
  सांग तुझ्या मनाचं गुलाबी फूल देशील का मला??

  वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची गं
  वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची गं
  वेड्या प्रश्नाच वेडं उत्तर देशील का मला??
  तुझ्या मनाचं गुलाबी फूल देशील का मला??

  माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
  तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
  तुझ्या भरतीचा चंद्र नवतीचा करशील का मला??
  सांग तुझ्या मनाचं गुलाबी फूल देशील का मला??

  बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
  मौन माझे आता सांगू बघते तुला
  तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
  तुच सत्यातली मोहिनी लाजरी
  अभ्र विरताना रात्र ढळताना येशील का जरा??
  कोणी नसताना काही कळताना येशील का जरा??
  तुझ्या नावात माझ्या नावाला घेशील का जरा??
  सांग तुझ्या मनाचं गुलाबी फुल देशील का मला??

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s