मा. डॉ. मुन्नी सिंह यांचे आवाहन जसच्या तस्

राम जन्मभूमी – बाबरी मशीद शीर्षकाच्या दावाच्या उच्च न्यायालयाचा निकाल दि. ३०-९-२०१० रोजी अपेक्षित आहे. हा निकाल म्हणजे एका दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेचे निष्पन्न असेल. हे वेगळे सांगावे लागू नये की, सदर निकालाचा सर्वाधिक आदर केला गेला पाहिजे. हा निकाल झिडकारून द्यायला तुम्ही कृषिमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत. विसरलात का? तुमची शॉर्ट टर्म मेमरी झालीये. आमीर सारखी. चला मी आठवण करून देतो. मध्यंतरी, सर्वोच्च न्यायालयाने धान्य सडण्यापेक्षा गरिबांना फुकट वाटा असा आदेश काढला होता. आणि आम्ही तो आदेश ‘धुवे में उडा दिया’. Continue reading

Advertisements

विठ्ठला कोणता मोबाईल घेऊ हाती…

माझा प्रिय मोबाईल आजकाल नीट वागत नाही आहे. तब्येत सारखी खराब होते त्याची. कधी कधी ऑपरेशन फेल म्हणतो. आणि कधी कधी अचानक बंद देखील होतो. काय कळेना. एक महिन्यापासून असाच वागतो आहे. त्यामुळे पुढील महिन्यात नवीन मोबाईल घ्यावा असा विचार करतो आहे. आता माझा नोकियाचा ३६०० स्लायडिंगचा आहे. तसा छान आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेला. आणि त्या नोकिया कंपनीचे हेडफोन देखील नीट राहत नाहीत. सारखे खराब होतात. आता गेल्या वर्षभरात चार सहज विकत घेतले गेले असतील. नेहमी पाच-सहाशे खर्च करायला नाही परवडत. त्यामुळे आता कोणत्या कंपनीचा घ्यावा इथपासून सुरवात झाली आहे.  Continue reading

धन्यवाद

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल लाख लाख धन्यवाद. आज प्रतिक्रियेचा आकडा हजाराच्या पुढे गेला. खूप आनंद वाटतो आहे. सर्वांच्याच प्रतिसादांमुळे हे सव्वा वर्षाचे ब्लॉगबाळ चांगले दुडूदुडू धावते आहे. काय बोलावं अस झालं आहे आता. खर तर या प्रतिक्रियांचे आभार कसे मानावे तेच कळत नाही आहे. माझ्याकरिता नेहमीच स्फूर्तीचे आणि मार्गदर्शक ठरल्या आहेत. मी ‘माझ्यातच’ गुंतलेला असतो. आणि त्यातून बाहेर पडलो तर इतर गोष्टींवर लक्ष जाते. ह्याच प्रतिक्रियांच्या बळावर मी ‘अप्सरा’शी ओळख नसतांना बोलू शकलो. ह्या प्रतिक्रियांमुळे, माझ्या अनेक चुका सुधारल्या गेल्या. जर ह्या प्रतिक्रिया नसत्या तर कदाचित मी कधीच अप्सराच्या जवळ जायची हिम्मत केली नसती. आणि मलाही मित्र आहेत अस कधीच मानू शकलो नसतो. आणि तेही खूप चांगले. माझी बडबड ऐकणारे. मला समजून घेणारे. कसं कळलं असते? Continue reading

बेकार

आज खरच खूप बेकार वाटत आहे. ऑफिसला आज मी उशिरा आलो आहे. खर तर येणार नव्हतो. पण आलो. तिची खूप आठवण येत होती. एक दिवस घरी राहून पहिले. माझा अभ्यास व्यवस्थित होत आहे. परंतु तिची खूप आठवण येत होती. आज दुपारी मनावर खूप कंट्रोल ठेवायचा प्रयत्न केला. पण नाही झाल कंट्रोल. आज बिन दाढीचा. तिने अजून मला पहिले नाही आहे. खूप बेकार वाटतो आहे. असो, तिला ‘हाय’ केल. पण पुढे बोलण्याची हिम्मत झाली नाही. Continue reading

‘मिशी’ची हत्या

सांगतांना खूप वाईट वाटते आहे. दोन दिवसांपूर्वी माझ्या ‘मिशी’ची हत्या झाली. आणि आता तीच्या पुनर्जन्माची मी आतुरतेने वाट पहात आहे. त्याचे झाले असे. दाढी करतांना एक दोनदा माझ्या मिशीवर मी एक बाजूला ‘चुकून’ कापली गेली. सेट करण्यासाठी दुसऱ्या बाजूची देखील कापावी लागली. मग ती कमी होत होत ‘शत्रुघ्न सिन्हा’ची झाली. अजून थोडी कमी झाली असती तर ‘दबंग’ झालो असतो. माझ्या इमारतीत असलेल्या केशकर्तनालयात शुक्रवारी केस कापायला गेलो असता. त्या न्हाव्याने तिची हत्या करून टाकली. केस कापून झाल्यावर त्याला दाढी सुद्धा करून टाक म्हणालो. आणि त्याने माझी मिशी अशी का विचारल्यावर मी त्याला ‘चुकून’ झालेली चूक सांगितली. Continue reading

माझा आवडता खेळाडू

माझा आवडता खेळ ‘भ्रष्टाचार’. कारण, हा खेळ एकट्याने आणि सांघिक अशा दोन्ही पद्धतीने खेळता येतो. भ्रष्टाचार हा जगातील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. माझ्या देशात हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. आताच होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आधी आमच्या सुरेशने हा खेळ खेळून जगभर त्यांचा नावलौकिक कमावला. या खेळातील ‘मास्तर ब्लास्टर’ तोच आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पण मला गारद गवार हा खेळाडू खूप आवडतो. तोच या खेळाचा खरा ब्रॅडमन आहेत. Continue reading

मिशी

मिशी ही गोष्ट खूप जुनी आहे. अगदी सर्व धर्माच्या प्रेषितांच्या जन्माआधी ‘मिशी’चा जन्म झाला. यावर सर्व धर्मांचे एकमत होईल. सोडा. मिशीमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. अगदी सुरवातीला येणारे ‘मिसरूड’. विशीत असणारी थोडी दाट लव. त्यानंतर मग मात्र जाड मिशा. म्हणजे लोकमान्य टिळकांसारख्या. पिळदार मिशा, तलवारी प्रमाणे, बारीक अगदी रेघे प्रमाणे, चार्ली चाप्लीन/ हिटलर यांची देखील मिशी. असे अनेक प्रकार आहेत. आजकाल मिशी न ठेवणे हाच प्रकार रूढ झालेला आहे. काय म्हणतात ‘युथ आयकॉन’चा एक प्रकार. पण आधी ज्याला मिशी राखता येत नसे तोच ठेवायचा नाही. Continue reading