स्वप्न

आज मी स्वप्नात आहे बहुतेक. खरंच स्वप्न की सत्य आहे हेच कळत नाही आहे. काय सकाळ आहे. जाम जबरदस्त. आज सकाळी सकाळी तिने ‘हाय’ केले. काय बोलू यार मी. काहीच सुचत नाही आहे. तीने स्वतःहून ‘हाय’. यार स्वप्नंच तर नाही ना. आणि हे तर काहीच नाही माझ्याशी येऊन गप्पा देखील मारल्या. किती छान आहे ती. सगळ स्वप्नंच वाटत आहे. अस कधी होईल, अशी इच्छा होत होती. सकाळी येतांना तो पडणारा पाऊस, ते थेंब. ते कंपनीच्या बाजूचे हिरवेगार डोंगर आणि त्यावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग.

आहाहा! काय मस्त वातावरण आहे. तिने देखील पांढर्या रंगाचा ड्रेस घातलेला आहे. आज देखील खूप छान दिसते आहे. आणि आज इतक्या लवकर आली. म्हणजे मी देखील तसा आज लवकर आलो म्हणा. रोज उठतो लवकर. पण मध्यंतरी थोडा आजारी होतो म्हणू झाले खाडे. आज ती आली. आणि माझ्या डेस्क जवळून जातांना ‘हाय’ म्हणून गेली. ऐकल्यावर विश्वासच बसत नव्हता, की ती मला ‘हाय’ म्हटली म्हणून. मग ती थोडे पुढे गेल्यावर मी ‘हाय’ म्हटले.

थोड्या वेळाने पुन्हा आली. आणि माझ्या डेस्कजवळ थांबली. माझ्या पीसीच्या मॉनिटरकडे पाहून बोलली ‘हे काय आहे?’ मग पुन्हा तीच ‘सीएसएस का?’. मी ‘हो’. मग मी तिला विचारले, म्हणजे मला माहिती आहे की तिची प्रोफाईल काय आहे ते, पण तरीसुद्धा ‘तू कशात काम करतेस?’. ती म्हटली ‘जावा’. ‘तुम्ही सुद्धा जावात काम करता का?’ मी ‘नाही, मी डिझायनर आहे ना. एचटीएमएल, सीएसएस, जावास्क्रिप्ट वर काम करतो’. मी तिला विचारलं ‘प्रोजेक्ट काय म्हणतो आहे. खूप काम असते का?’. ती ‘हो’. मग अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तिला विचारलं ‘तुझा घसा बसला का?’ आता घसा बसलेला नाही, पण तरी विचारल. ती ‘नाही’. ‘मला काल अस वाटल’ मी म्हटलो. मग ती ‘फोन छान आहे. मला आवडतो’. आणि फोनचा मॉडेल नंबर देखील सांगितला. एकूण धक्काच बसला. काय जबरदस्त निरीक्षण आहे. ती फोन आवडतो बोलल्यावर मनात मला देखील तू खूप खूप खूप आवडतेस अस म्हणावं वाटल. पण.. असो. बोलतांना कोणी तरी गुदगुल्या करत आहे अस वाटत होत. काय मस्त दिवसाची सुरवात झाली. अगदी अविस्मरणीय! स्वप्नातच असल्याप्रमाणे वाटत आहे.

Advertisements

14 thoughts on “स्वप्न

 1. लगे रहो.. एवढ्या सगळ्यात दोनच गोष्टींवर मला ठेच लागली..

  एक… तू तिला “तू” म्हणतोस आणि ती तुला “तुम्ही”?

  हे लक्षण बरं नव्हे.. लवकर “आप से तुम,.. तुम से तू” होने दो..

  दोन… मोका इतका मस्त होता आणि मोबाईल नंबर एक्स्चेंज केला नाहीस..अरे सुरुवातीला दोन दिवसांनी एक असा एसएमएस पाठवून पाठवून नंतर दिवसाला शंभर झाले असते..

  असली छोटी “चूकछिद्रे” नंतर मोठी होत जातात. छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..

  वेळेत पंक्चर काढा..

 2. I agree with Nachiket(2nd point).

  काय रे ती इतकी तुझ्याशी बोलायला आली आणि फोनचा विषय पण काढला.
  मग तुला नंबर नाही का घेता आला?
  सांगायचे, एक छान मेसेज आहे देतो पाठवून आणि घ्यायचा नंबर (आणि छान मेसेज पाठवायचा एक… म्हणजे आत्ता पुरता एक.)

  आता काय तिच्या नंबर मागुन घेण्याची वाट पाहतोय का? तू पण ना खरंच…

  —प्रिया

 3. आता काय तिच्या नंबर मागुन घेण्याची वाट पाहतोय का? …तू पण ना खरंच.. ढ …!!

  वाक्य पूर्ण केलं फक्त.

  ..मलाही मान्य..पण गोड आहे मुलगा..म्हणून वाटतं की जमून जावं याचं पटकन..

 4. नचिकेत,

  मलाही त्याचे जमून यावे असेच वाटतेय, म्हणून ह्या प्रेमळ सूचनांचा प्रपंच…

  हेमंत,

  पुढच्यावेळी आठवणीने (स्वतः) नंबर घे,

  आणि शुभेच्छा आहेतच, चालु द्या.

  —प्रिया

 5. Hi Hemant,
  Great .Luck has favoured you but it is not only luck which works.You have been given the initiative by the FAIRY , now take it o
  n from here .As nachiket said ask her for her cell NO and then the world is yours.
  All the best
  JKBhagwat

 6. हेमंतजी,
  प्रगति आहे हे वाचुन आनंद झाला….नचिकेतनजी ने सांगितलेल्या गोष्टिशी मी सहमत आहे, त्यांनी सांगितलेल्या युक्त्या वापरायला हरकत नाही….BEST LUCK….

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s