द्वंद्व

म्हणजे अगदी सुरवातीपासून, हे डोक्यात द्वंद्व चालू आहे. कधी वाटत ती माझी होईल. तिलाही मी आवडत असेल. पण नंतर तो शेपट्या किंवा तो शेंड्या तिच्यासोबत असला की, म्हणजे तेव्हाही काही नाही वाटत इतकं. पण ती हसून वगैरे बोलतांना पहिले तर. मग मात्र अस वाटायला लागते की, कधीच शक्य नाही. काल संध्याकाळी देखील असेच. मी जातांना ‘बाय’ करावं म्हटलं. आणि पीसी बंद करून निघणार तेवढ्यात ती समोर. तिचा चेहरा लाल झालेला. म्हणजे मी देखील खूप हसलो तर माझाही चेहरा असाच लाल होतो. ती हसत चाललेली. तिच्या डेस्ककडे पहिले ते ते दोन हिरो होतेच. शेंड्या आणि शेपट्या. मग मुडच गेला. ती मान खाली घालून माझ्या समोरून गेली. तरीही ‘बाय’ करायची इच्छा होती. पण नाही झाली हिम्मत.

असो, पण काल कंपनीतून निघाल्यावर खूप डोके दुखले. काहीच सुचत नव्हते. वाटत होते, तिला तिच्या योग्यतेचे शेपट्या आणि शेंड्या असल्यावर ती मला का निवडेल. आणि आजही सकाळी आलो त्यावेळी तो शेंड्या होताच तिच्या डेस्कवर. आणि आताही तोच तिच्याशी बोलतो आहे. सोडा, काल इतका हैराण झालो होतो ना! सगळंच संपल अस वाटत होते. आताही वाटते आहे. असे विचार कालपासून खूप येत आहेत. मला माहिती आहे की मला ती खूप खूप आवडते. तीची आणि माझी जुनी ओळख असल्याप्रमाणे वाटते. ती हसली की सगळ छान वाटते. सगळीकडे तीच दिसते. मला हे देखील मान्य आहे की तिला पहिल्यापासून माझ्यात खूप बदल घडले आहेत. म्हणजे विक्रमी बदल.

म्हणजे परवा ती माझ्याशी स्वतःहून बोलली देखील. आणि हे सगळ स्वप्नवतच वाटते आहे. इतकी छान मुलगी माझ्याशी स्वतःहून बोलली. यापेक्षा स्वर्ग अजून काय? ती माझी झाली तर.. मला अजून काय हवे? खरच मी खूप भाग्यवान असेल जर तिला देखील मी आवडलो. म्हणजे अगदी खर सांगतो, माझ्या स्वप्नातली सुंदरी बद्दल माझी मते हीच होती की, तिने मला पहिले तर ती माझ्या आणि मी तिच्या प्रेमात पडेल. आणि तिला पहिल्यापासून मला कोणताच विचार येणार नाही. आणि तिलाही माझाच विचार येईल. तीही तेवढीच माझ्या इतकीच माझ्यावर प्रेम करेल. पण गेल्या दोन दिवसाआधी पर्यंत अस वाटायचं हीच ती. म्हणजे अजूनही वाटत. उलट वाढले आहे. पण तीच्यासोबत शेंड्या, शेपट्या किंवा तो नारळ पहिला की, मला अनेक विचार येत आहे. अस वाटत आहे. ती जस्ट माझ्याशी बोलते. पण तिच्या मनात त्यापैकी कोणी आहे. आणि स्पष्टच सांगायचे झाले तर नारळ सोडला तर ते दोघे, म्हणजे शेपट्या आणि शेंड्या तिच्या योग्य आहे. म्हणजे त्या दोघातही तो शेपट्याच भारी आहे. म्हणजे ‘परफेक्ट’ वगैरे म्हणतात ते.

सोडा, पण तरीही माझ्या मनात तीच आहे. मला ती खरच हवी आहे. माझ्यात काय चांगल तर, मी कुठल्याही प्रश्नाचे काही का असेना सकारात्मक उत्तर देऊ शकतो. अरे हो, त्या काळाच्या प्रश्नाचे उत्तर सापडल्यात जमा आहे. एक कोड मिळाला आहे. तिला सकाळी ‘हाय’ करतांना सांगणार होतो. पण नेहमीप्रमाणे. सोडा, ते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर आहे. आणि सोबत एक कोड. आज घरी जावून चेक करील. जर जमल तर दाजींचा प्रश्न सुटला. अरे, विसरलोच! काल मित्राचे एक काम करून द्यायचे राहिले आहे. यार काल खूप रडू आले होते. तिची इतकी आठवण आणि त्यात हे ‘द्वंद्व’. मग गच्चीतून आमच्या गल्लीतील दहीहंडी पाहत बसलो. नंतर निगडीपर्यंत पवळे पुलापर्यंत फिरायला गेलो. खूप डोके आणि नाक जाम झाले होते. जिकडे तिकडे तीच वाटायची. तिला म्हणून टाकावं असा देखील विचार मनात आला होता. पण अजून ‘हाय’ च्या पुढे ढकलगाडी. कस म्हणणार आणि उगाचंच जरी हिम्मत केली. तर ती नाराज होईल.

असो, ती मला मिळणे न मिळणे माझे भाग्य. तिला मी नाराज नाही करणार. सोडा, एक महिना राहिला आहे बीसीए च्या परीक्षेला. अजून नवीन अभासाक्रमाची पुस्तकेच नाहीत माझ्याकडे. आणि माझे आयकार्ड देखील पावसामुळे खराब झालेले आहे. पण चिंता नसावी. तोही प्रश्न मिटेल. आजही तिच्या बोलायची खूप इच्छा आहे. आणि हो, आज तिचा आणि माझा ड्रेसचा रंग सारखा झाला आहे. पण या डोक्यातील द्वंद्वामुळे आज पुन्हा डोकेदुखी..

Advertisements

10 thoughts on “द्वंद्व

 1. सॉरी.. तुझ्या अवस्थेबद्दल..आणि उपदेश करण्याच्या माझ्या अनावर इच्छेबद्दल.

  एक.. वैयक्तिक माहिती सांगायची नसूनही सांगतो की माझी अवस्था अशीच तुझ्यासारखी होती. माझ्या ऑफिसमधली ती मुलगी माझ्या जातीची, पातीची, शिक्षणाची, इव्हन भाषेची आणि प्रान्ताचीही नव्हती. माझ्याहून (माझ्यामते) लुक्स वाईज, चार्म वाईज, शिक्षणवाईज एलिजिबल खूप पोरं मला आजूबाजूला दिसायची. पण तीव्र इच्छेने आणि योग्य दिशेने प्रयत्न केला आणि आता ती माझी पत्नी आहे. तेव्हा अशा बाबतीत जोडी कुठल्याही नियमानुसार “मॅच” करून होत नसते.

  दोन..अत्यंत महत्वाचे. ती आपली झाली, (म्हणजे प्रेम आणि नंतर लग्न झाले) की सारे गोड सुंदर होते हा भयानक भ्रम आहे. आत्ताची ही हुरहूर आणि कोवळेपणा पूर्णपणे नष्ट करायचा असेल तर करण्याची गोष्ट म्हणजे लग्न..नंतर तुम्ही आनंदात आणि सुखात राहाल..पण आत्ता तुला जे मिळतंय ते ती तुझी झाल्यावर परत कधीच मिळणार नाही. एन्जॉय दीज डेज डियर..पुढे नुसतंच “कर्तव्य करत जिवंत राहायचं” आहे..जगणं हे आहे जे तू आत्ता करतोयस.

 2. ‘द्वंद्व’ शिर्षक वाचून वाटले याचे भांडणं तर नाही ना झाले तिच्याशी, किंवा तिच्या मागे फिरानाय्रा शेनाशे शी, द्वंद्व डोक्यातच असुद्या, …. गुड लक

 3. हेमंत,

  मीही नचिकेत यांच्या पहिल्या मुद्द्याशी अगदी सहमत आहे,

  अरे हे सगळे पाहून प्रेम नाही होतं रे.

  प्रेम होतं ते आपण एकमेकांना किती हवेहवेसे असतो(कसेही असलो तरीही) त्यावरुन आणि टिकते ते आपण एकमेकांना किती समजून घेऊ शकतो त्यावर..

  तर मित्रा सांगायचा मुद्दा हा की ‘रात्र वै-याची आहे’. आणि ते शेनाशे(शेपट्या-नारळ्-शेंड्या, एकत्र नाव छान जमलंय प्रसिकला) अप्सराच्या इर्दगिर्द असताना आपल्याला गाफिल राहून चालणार नाही गड्या.

  तेव्हा फक्त अप्सराकडे concentrate कर अश्या फुटकळ विचारांकडे नाही…

  सल्ला दिल्यावाचून मात्र रहावत नाहिये, मी मागे ऐकले होते की आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल किंवा कसली भीती वाटत असेल तर त्याची स्वप्नात भरपूर practice करावी म्हणजे ती सत्यात घडताना गोंधळ होत नाही. मग तुही अप्सराशी बोलण्याची practice स्वप्नात का करत नाही.

  हो आणि एक. नचिकेतच्या दुस-या मुद्द्याबद्द्ल मात्र माहित नाही (अनुभव नसल्याने कदाचित).

  —प्रिया.

 4. Tula kaay mahit tya dogha madhe ti interested aahe. Tini kaay itar mulanshi bolayche nahi ka? Are ekhadya dukandar, doodhwala paperwala, rickshaw-wala vagaire shi ti bolat aselach ki. Mag kaay tu asach udaas honar ka?

  Tya ulat tya sheptya ani shendya la asach konitari samajaycha ani apli gadi pudha hakaychi. Tula kaay mahit. Te bolat asle ki “Apsara ani bandhu” boltayat asa samjaycha. Tula tujha confidence thevla pahije. Tu tujha prayatna chalu thev.

 5. Are raja mi Hemant la kaay lihaycha te lihila aahe. Tujha abhiprayachi mala tar garaj nahi ani ithe aslya kurghodi kadhaychi hi kaay jaga nahi.

  Ka tu tya shendya ani sheptya paiki aahes. Tula nasel avadat tar gappa rahaycha ani tijha comment takaycha. Ha Hemant kaay karaycha te karel. Ata to suddha sadnyan aahe.

  Tyamule Makaranda, jara gappa raha ani aplya kamashi kaam thev.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s