प्रश्न सुटला

कालची ती दुपार. किती मस्त गेली म्हणून सांगू. काल सकाळी काकू टपकल्या. डायरेक्ट डेस्कवर. काकू आलेल्या पाहून खर तर खूप आनंद झाला. म्हणजे मला वाटलं आता ती नक्की येईल. असो, पण ती आली नाही. काकू खूप वेळ होत्या डेस्कवर पण शेवटपर्यंत ती आली नाही. असो, एक प्रश्न अडला होता ना मला. तो इमेज मधील टेक्स्ट रीड करायचा. तो सुटला. माझ्या दाजींनी मला एक टिफ फोर्मेटची इमेज मेल केली होती. आणि ती इमेज मधील टेक्स्ट मला रीड करून राईट करायचे होते. कुठेही वर्ड किंवा नोटपॅडमध्ये. एक मायक्रोसॉफ्टचे एक बंडल सॉफ्टवेअर आहे. नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस डॉक्युमेंट इमेजिंग.

प्रत्येक मायक्रोसॉफ्ट ऑफिस २००७ मध्ये असतेच. नसेल तर कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन थोडीशी सेटिंग करायची असते. म्हणजे फुकटच झाले ना. पण त्यात फक्त टिफ फोर्मेटच्याच इमेज वर्डमध्ये टेक्स्ट कन्वर्ट होतात. असो, म्हणून बंडल म्हटले. पण ठीक आहे ना. माझ्या दाजींचे काम झाले. काल दुपारी बहिणाबाईला फोन केला. तिला सुद्धा खूप आनंद झालेला. आणि दाजींना सुद्धा. तसे मला कोड देखील मिळाला आहे. आणि काही वेबसाईट सुद्धा. त्यांना हवे ते दाजी वापरू शकतात. म्हटलं ना. प्रश्न सुटेल. फक्त आता ती माझ्याप्रमाणेच माझ्यासाठी कधी होईल हा प्रश्न आहे. काल संध्याकाळी तीच्या डेस्कवर गेलो आणि तिला सांगितले की प्रश्न सुटला. तर तिलाही आश्चर्य वाटले. म्हणजे फक्त सुरवातीला. ती माझ्याशी बोलण्यापेक्षा तीच्या चाललेल्या चाटींग मध्येच लक्ष देत होती.

असो, कधी कधी मी तिला पूर्णपणे ओळखतो अस वाटत. आणि कधी ओळखतच नाही अस वाटत. काल मला ती माझ्याशी गप्पा मारतांना खूप वेगळी वाटली. मी तिच्या डेस्कवर गेलो. आणि तिला काही म्हणणार तेवढ्यात तीच म्हणाली ‘घरी निघालास?’. मी ‘हो’. पण खर सांगू तीच्या चेहऱ्यावरून नजरच हटत नव्हती. ती खूप गोड आहे. ती माझ्याशी काय गप्पा मारते आहे त्याकडे माझे लक्षच नव्हते. मी आपला काय ‘हो नाय’ चालू होते. तीचा तो चेहरा पहाण्यातच बुडून जाव वाटत होत. असो, तिला बोललो ‘ते सोड, मी तुला परवा विचारले होते ना. इमेज मधील टेक्स्ट रीड करून राईट करायचे ते झाले. प्रश्न सुटला.’ ती ‘कसा काय?’ मी ‘एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर आहे’. पण त्यावेळी ती रिमोट मशीनशी कनेक्ट होती. त्यामुळे तिला तीच्या पीसीवर दाखवणे शक्य नव्हते. तिला बोललो ‘आता तुझा पीसी पाहू शकतो का?’ ती ‘नाही’. ‘तुला माझ्या डेस्कवर यायला जमेल?’ मी म्हटले. ती ‘हो’. मी ‘कधी?’. तिने हाताचा पंजा दाखवून ‘पाच’ची खुण केली. तिला म्हटले ‘मी पाचच्या बसने जाणार आहे’. ती म्हटली ‘का?’. आता मनात आल होते तिला म्हणावे, तुझ्या सोबत मी जीवनभर कुठेही कितीही वेळ थांबायला मी तयार आहे.

पण मग सावरलं स्वतःला आणि म्हटलं ‘माझा तो नियम आहे.’ तस् सकाळी मी अकराला आलेलो. पण मला ना! सोडा, मग ती बोलली ‘सर्दी झाली?’ मी ‘हो’. खरंच खूप छान वाटलं तिने अस विचारल्यावर. आता तिला काय सांगू काल परवाचा माझा प्रताप. वडील बोलायचे मुली सारखे रडायचे नाही. पण ना! कधी कधी माझ्या समोर माझ्या मनाविरूद्ध गोष्ट घडली. आणि मी काही करू नाही शकलो. त्यावेळी होत अस. तिला माझ्या मोबाईल मधील बुकमार्क केलेली ती वर टाकली आहे ना ती लिंक दाखवली. असो, बोलता बोलता मी तिला तुला काही ‘यु आय’चे इशु असतील तर सांग अस म्हणालो. एचटीएमएल, सीएसएस काही हेल्प लागली तर सांग. तर ती बोलली ‘हो, खूप त्रास आहे त्या टीआर टीडीचा. माझा खूप गोंधळ उडतो’. आता हे मात्र ऐकल्यावर खूप खूप छान वाटायला लागलेलं.

पण तेवढ्यात तीच्या प्रोजेक्टमधील एक काकू आल्या. तिच्याशी कामाविषयी बोलायला. मी आपला थोडा वेळ वाट पाहिली. नंतर माझ्या डेस्कवर जाऊन पीसी बंद केला. पाणी पीले. मित्राकडे जाऊन त्याला ‘बाय’ वगैरे केले. तो म्हणत होता. आपण सहा वाजता बाईकवर निघू. एकदा वाटलं थांबव. पण ते तीच चाटींग पाहून इच्छा नव्हती राहिली. तोपर्यंत त्या काकू तीच्या डेस्कवरून गेलेल्या. मग तीच्या डेस्कवर गेलो. आणि म्हटले ‘चलतो’. तिला काय ऐकू आले कुणास ठाऊक, मला म्हणाली ‘काय?’ मोबाइल उचलतांना आपटला गेला. मग पुन्हा तेच मी चालतो अस म्हटलं अस म्हटले. ‘सोमवारी पाहू ते’ अस तिला म्हटलं. पुन्हा तिला काहीच नाही कळले वाटत. ती पुन्हा ‘काय?’ पुन्हा तेच रिपीट केले. बहुतेक माझ्या बोलण्यात काही तरी गडबड आहे अस वाटते आहे. का तिचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हते म्हणून अस म्हणाली. आणि जातांना ठरलेला ‘तुम्ही कुठे राहता?’. यार ती हा प्रश्न नेहमीच विचारते. आता पुन्हा विचारला की, तिला म्हणणार आहे. की घरीच चल. घर दाखवतो. इतक्या वेळ ती मला ‘तू’. आणि शेवटी ते ‘तुम्ही’ आलेच. असो, पण खूप छान वाटत होते. ती माझ्या घरी, माझ्या सोबत कधी असेल? आणि किती छान होईल, ज्यावेळी ती माझ्या बरोबर असेल.

Advertisements

One thought on “प्रश्न सुटला

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s