पुन्हा एकदा सगळ फूस

आता ना, माझा माझ्यावरच माझा विश्वास राहिलेला नाही. आजही ती कॅन्टीनमध्ये माझ्या जवळच्या बाजूच्या सीटवर, म्हणजे दोन सीट सोडून बसली होती. ती नाश्ता आणायला गेली. आणि माझी हिम्मतच होत नव्हती तिथे बसायची. काय करू, मी तिच्याशी बोलायची आरशासमोर खूप सराव केलेला होता. या शनिवार रविवार हेच तर केल. तिची खूप आठवण यायची. कोणी मुलगी दिसली तीच वाटायची. आणि आज मी लवकर उठून देखील आलो. पण सगळ फूस.

ती समोर आली की, मला काहीच करता येत नाहीत. अगदी अंगात ताकद नसल्याप्रमाणे वाटते. आणि डोक काम करायचेच बंद होते. श्वास सोबतच देत नाही. धडधड खूप वाढते. आणि हे सगळ अस घडायला सुरवात झाली की, हिम्मतच होत नाही. आणि समोर असली की शब्दच फुटत नाहीत. आणि त्यात आज मी एक खूप खूप जुना शर्ट घालून आलो आहे. शनिवारी कपडे धुवायला टाकतांना लक्षातच आल नाही की मी सगळेच कपडे धुवायला टाकतो आहे. आणि धुवायच्या वेळेस खूप हाल झाले. हात दुखले. म्हणजे ते काही फार मोठे नाही. पण ते कपडे वाळलेच नाहीत. त्यामुळे इस्त्री सुद्धा नाही. आज करील. पण तात्पुरता म्हणून एक अडीच वर्षापूर्वीचा एक शर्ट घालून आलो आहे. म्हणजे मी मुंबईमध्ये असतांना वापरायचो तो. त्यामुळे आज मुंबईमधील खूप आठवणी ताज्या झाल्या आहेत.

असो, आज मी खूपच डब्बा दिसतो आहे. अगदी काका टाईप. आणि ती आज त्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काय दिसती आहे म्हणून सांगू. तिला बघून मग बोलायचे कस, अस झाल आहे. तसं ती माझ्या डेस्क जवळून जातांना ‘हाय’ केल. पण ते देखील डब्बा. आज तिला तिच्या कामात मदतीची गरज लागली तरच थोड फार बोलायचं चान्स आहे. नाहीतर, तिने मी कॅन्टीनमधून पळून गेल्यावर काय विचार केला असेल देव जाणे. काय करू? ती समोर आली की हे अस होत. ती नसेल त्यावेळी तिची खूप आठवण येते. आणि समोर आली की हिम्मतच जाते. त्यात हा सगळा चेहरा तेलकट झालाय. असो, आज सकाळी सकाळी अस घडेल याची कल्पनाच नव्हती. सगळंच फूस झालाय.

Advertisements

10 thoughts on “पुन्हा एकदा सगळ फूस

 1. “ती समोर आली की, मला काहीच करता येत नाहीत. अगदी अंगात ताकद नसल्याप्रमाणे वाटते. आणि डोक काम करायचेच बंद होते. श्वास सोबतच देत नाही. धडधड खूप वाढते. आणि हे सगळ अस घडायला सुरवात झाली की, हिम्मतच होत नाही. आणि समोर असली की शब्दच फुटत नाहीत”

  अरे मित्रा..याच ओळी किती वेळ आणि किती वेळा..? त्यामुळे तुझी जुनीच पोस्ट परत परत वाचतोय असं वाटतं..

  प्रत्येक पोस्टची हीच टॅगलाईन..?

  ठीक आहे यार..आता इतक्या काळात यातून ओव्हरकम व्हायला पाहिजे बुवा..

  आता थोडी प्रगती दिसू दे ना राजा..

  दो आरजू में, दो इंतजार में..असे दिवस जातील संपून..

 2. अर्थातच, तू पुन्हा पुन्हा तेच तेच लिहिल्याने मी (किंवा आम्ही वाचक) बोअर झालो आहे, किंवा लिखाणाचा दर्जा कमी होतोय असला काही मुद्दा माझा कॉमेंटमध्ये म्हणायचाच नाहीये. आम्ही कोणीच (मला वाटते) हा अप्सराचा थ्रेड साहित्यिक मूल्य म्हणून वाचत नाही आहोत. आम्ही तुझ्या लाईफस्टोरीच्या या पार्टमध्ये इन्वोल्व्ह झालो आहोत म्हणून वाचत आहोत. त्यामुळे उगीच नको ते अर्थ काढू नयेत.

  तुझं हे सगळं वेळेत आणि छान व्हावं अशी इच्छा आहे म्हणूनच केवळ.

  नाहीतर म्हणशील, आवडत नाही तर वाचता कशाला..:)

 3. are yaar ata gojirvanya gharat (company),soniyachya umbaryachya aat saar kalat nakalat ghadun gelay!!!ani man he asach varyapraman udhan asat.So, ata sambhav – asambhavcha vichar n karata mast tila prapose karun tak.ani te jamat nasel tar saral kunakadun tari sang ki mi blog tujhyasathi lihila ahe te.k.ani tehi jar jamat nasel tar direct ticha nad sodun de.saral aai,aaji mhanel tichyashi lagn karun tak.ani settle ho akdacha.

 4. हेमंत

  दोन दिवस गेल्यामुळे वाचायला आज वेळ मिळाला. तू परवा म्हटलंयस ना —-‘तुम्ही कुठे राहता?’. यार ती हा प्रश्न नेहमीच विचारते.

  अरे हा प्रश्न सारखा विचारते म्हणजे तू काय ते समजायला हवेस.

  कधीतरी ‘तुला घरी सोडू का?’ विचार ना. तू बाइक नेतोस ना? मग नेहमीच पाचची बस घ्यावी असे काही नाहीये.

  तीचे घर तू जातोस त्या दिशेला असेल तर उत्तमच.. (नेहमी घरी सोडता येइल) नाहीतर कधी तिच्या घराच्या दिशेने जातोय असे सांगून विचार ना ‘येतेस का’. नेहमी मित्रासाठीच थांबावं असे काही नाहीये

  आणि नचिकेतनी म्ह्टल्याप्रमाणे तुझं सगळं वेळेत आणि छान व्हावं अशी इच्छा आहे रे… तुच पुढाकार घ्यायला हवा ना? हे समजून घे ना…

  कोणीतरी प्रेमात यशस्वी झालेलं पहायचेय रे…

  —प्रिया

 5. मित्रा, धोंडोपंत उवाच हा ब्लॉग लिहिणाऱ्या धोंडोपंतांचा सल्ला कां घेत नाहीस? त्यानी सुचविलेला उपायच तुझ्या संकल्पाला आवश्यक असलेले बळ पुरवू शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s