चिंटू

आज चिंटू सकाळी लवकर उठला. आजचा दिवस त्यासाठी विशेष आहे. पटापट आवरून चिंटूने लुंगी ‘नेसली’. आणि डोक्याचे उरले सुरलेले केसांची वेणी घातली. काही नसलेल्या कपाळावर हळद कुंकू केल. निघण्यापूर्वी हारवाल्याला फोन लावला. पायात चपला टाकून ‘विनोदमुर्ती’ गाडीत बसल्या. गाडी निघाली ती थेट पुण्याकडे. ड्रायव्हरने गाडी चालवता चालवता चिंटूला विचारले ‘साब, आज तो बहुत खुश होंगे आप.’. पण चिंटू तर विचारात मग्न. पुन्हा ड्रायव्हर ‘साब’. चिंटू लक्षात येताच चिंटू खेकसला ‘एंड रास्कला, नो हिंदी’. ड्रायव्हर गडबडून ‘येस येस, साब’. चिंटू पुन्हा विचारात मग्न. जस जस पुणे जवळ येत होते, तसं तसं चिंटू अजूनच हर्शोल्हासित होत होता. अखेर एकदाचे पुणे आले. गाडी पोलीस मुख्यालयात वळली. चिंटू गाडीतून उतरून कोठडीच्या दिशेने धावत निघाला. अगदी एसआरके स्टाईल.

बाकी सगळे, म्हणजे राधेपासून मीरापर्यंत सर्व पोलीस गडबडून गेले. पुढे चिंटू आणि मागे पोलीस दल. आणि अचानक चिंटू थांबला. मागून धापा टाकत मीराबाई आल्या. मीरा बाईंनी चिंटूला प्रश्नार्थक चेहऱ्याने ‘काय झाले चिंटूजी?’. चिंटू लुंगीने घाम पुसत बोलला, ‘जावयबापूंना, कुठल्या कोठडीत ठेवलं आहे? आणि त्यांच्यासाठी मी हार मागवलेला तो कुठे आहे?’. मीराबाई पडक्या चेहऱ्याने ‘तीन क्रमांकाच्या कोठडीत आहेत. आणि हार नाही मिळाला. तो हारवाला बोलला, सकाळीच सगळे हार संपले’. चिंटू ‘मग आता मी जावईबापूंना मोकळ्या हातांनी भेटणार?’. मीराबाई ‘नाही, मी येतांना हा गोल तारेत फुले असलेला बुके आणला आहे’. चिंटू चिडला ‘एंड रास्कला, हा बुके पुण्यतिथीला थडग्यावर अर्पण करतात. काय डोक्याचा भाग आहे की नाही? ते आपले जावईबापू आहेत. किती मोठी कामगिरी त्यांनी हातोहात बजावली आहे. आणि त्यांचा मी अपमान करू? छे! कदापीही नाही. अरे रास्कलांनो, त्यांच्यामुळेच तर मी आणि माझे सरकार जिवंत आहे. जा काहीही करा आणि एक हार आणून द्या. वाटल तर सीबीआय ला सांगा, किंवा मेक्डोनाल्डवाल्यांना. मला आताच्या आता हार हवाच’. तेवढ्यात एक शिपाई बोलला, ‘आपल्या पोलीस ठाण्यातच एक हार आहे’. मीराबाई आणि चिंटू एकाच वेळी आश्चर्याने ओरडले ‘कुठे?’.

शिपाई ‘मीराबाई मॅडमच्या केबिनमध्ये’. आता मात्र चिंटूचा रजनीकांत झाला. रागात चिंटूने डोळ्यावरचा चष्मा काढून फेकला. आणि मोठ्याने ‘आय विल फायर यु’. मीराबाई ‘नाही, मला खरच माहित नाही यातलं काही. मला वाटत यात माझ्या विरोधी पोलिसांचा हात आहे’. चिंटू शिपायाकडे बघत ओरडला ‘जा लवकर घेऊन ये तो!’. शिपाई धावत जाऊन हार आणतो. चिंटू हाराकडे पाहून खुश होतो. पण पुन्हा त्रासलेल्या चेहऱ्याने ‘हा तर एकच आहे. अजून एक हवा आहे’. शिपाई खिन्नतेने ‘एकच होता’. तेवढ्यात ‘ओss मारिया मारिया..’ असा बॅकग्राउंड साउंड ऐकू यायला लागतो. सगळे मुख्यालयच्या मुख्य दरवाज्याकडे पाहायला लागतात. भरदाव वेगात एक गाडी चिंटू समोर येऊन थांबते. आणि त्यातून एक दोन हॅण्ड असलेला इसम एक हार घेऊन उतरतो.

चिंटूच्या हातात हार देत बोलतो. ‘नाचीझ को मारिया..’. पुन्हा चिंटू खेकसतो ‘एंड रास्कला, नो हिंदी’. आणि तसाच धावत कोठडी क्रमांक तीन समोर येतो. त्यात ते दोन ‘वीर’ बसलेले असतात. चिंटू जाऊन दोघांचे पाय धरतो. आणि ढसाढसा रडायला लागतो. दोन्ही जावई बापू गोंधळून ‘क्या हुआ??’. आणि हे ऐकताच चिंटू उठून ‘एंड रास्कला…’. आणि पुन्हा धाय मोकलून रडायला लागतो.  दोघे जावई चिंटूचे कान पकडून त्याला उठवतात. आणि पुन्हा का रडतो आहेस अस विचारतात. चिंटू डोळे पुसत ‘जावई बापू जी, किती वाट पाहायला लावलीत. माझी खुर्ची जाता जाता वाचली. तुम्हाला पाहण्यासाठी माझे डोळे आसुसलेले होते. तिकडे ती बडी बेगम आणि इकडे जनता मला खायला उठले होते. तुम्ही आलात आणि मी वाचलो’. दोघेही गोंधळून गेले. बिल्लू जावई बोलला ‘ते कसं?’. चिंटू हसत बोलला ‘इकडे नक्षली हल्ले, मुंबई अतिरेकी हल्ला. मग सगळे मलाच दोषी मानायला लागले. त्यामुळे तुम्ही केलेला बॉम्बस्फोटने लोकांचा रोष बदलला. आणि मी वाचलो’. आता मात्र बिल्लू आणि फुटकळने डोक्याला हात लावला.

चिंटूने दोघांना पाहून बोलला ‘पण जावईबापू, तुमची खास व्यवस्था ठेवली जाईल. खाण्या पिण्याचे चिंता करू नका. केस सुरु होऊन शिक्षा होईस्तोवर आणि पुढे सुनावणी. बराच काळ बाकी आहे. आणि तुम्हाला फाशी होणार नाही याची मी खात्री देतो’. ‘ते कसं शक्य?’ दोघा जावयांनी एकदम विचारले. ‘मला मानवतावादी जमातीवर पूर्ण विश्वास आहे. आणि ते नाही तर आजी आहेतच की.. ‘. ‘वो कोण आहे?’ फुटकळ बोलला. चिंटू हसत उत्तरला ‘रद्दताई पाटील’.. ‘हार आण रे!’. शिपायाने हार आणले. चिंटू त्या दोघांना घालणार, पण दोघांनी हार घालून घ्यायला नकार दिला. चिंटू चिंतेत पडला. आणि बोलला ‘का घालत नाही आहे?’. दोघेही बोलले ‘कारण, आम्ही सकाळी हे हार बापूजीच्या फोटोवर पहिले होते’..

Advertisements

6 thoughts on “चिंटू

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s