प्रेम

खर सांगतो. अजूनही मला हाच प्रश्न पडलेला आहे. प्रेम म्हणजे नेमक काय? याच उत्तरच सापडत नाही आहे. मी संगणकाचा कोर्स करीत असतांना माझी एक मैत्रीण होती. म्हणजे आमची दोघांचे खूप वाद आणि मस्ती चालायची. एकमेकांना खेचाखेची सोडून काहीच नाही चालायचे. ती इन्स्टिट्यूटमध्ये आली की तीचा पहिला प्रश्न हाच असायचा की ‘हेमंत कुठे आहे?’. आणि मी गेलो तरी हेच. अस थोडे थोडके नाही दीड एक वर्ष चाललेलं. ती गोष्ट वेगळी की माझ्या मित्राला ती खूप आवडायची. त्याला नंतर नंतर आमच्या दोघात काही तरी. म्हणजे त्याच्या चित्रपटाचा मीच ‘व्हिलन’ वाटायला लागलो. म्हणून मग मी तिच्याशी बोलायचे बंद केले.

इथे पुण्यात आल्यावर एक मैत्रीण बनली. म्हणजे जवळपास तीन वर्षापासून आमची चांगली मैत्री आहे. अगदी दर आठवड्याला बाहेर फिरायला जाण्यापासून ते महिन्यातून एक दोनदा हॉटेलात जाण्यापर्यंत. तीच्या आई वडिलांचा स्वभाव आणि माझ्या आई वडिलांचा स्वभाव सगळंच सारखं. तिचे वडील आणि माझे वडील यांची चांगली दोस्ती. हीच्या इच्छा, स्वभाव सगळंच माझ्याप्रमाणे आहे. रास देखील सारखी. थोडक्यात सांगायचं झालं तर ती एखादी गोष्ट घडल्यावर काय प्रतिक्रिया दिल हे सुद्धा मी सांगू शकतो. आणि ती मी काय दिल हे सुद्धा. आता ती गोष्ट वेगळी की, अप्सराला पाहिल्यानंतर महिन्याभरापासून मी माझ्या मैत्रिणीला भेटलो नाही. आणि फोन सोडून कुठल्याच प्रकारचा संपर्क झालेला नाही. म्हणजे माझी संगणकाच्या कोर्सच्या वेळी आणि इथे आल्यावर झालेली मैत्रीण ह्या दिसायला सुंदर नाहीत. किंवा मला आवडल्या नाहीत अस नाही. उलट त्यांना मी कसा आहे आणि माझे वागणे, बोलणे, चालणे सर्व गोष्टींची चांगली माहिती आहे. माझ्या इच्छा त्यादेखील त्यांना माहिती आहेत. पण ते म्हणतात ना ‘विश्वास’ नावाची एक गोष्ट असते. ती कधीच राहिली नाही त्यांच्यावर.

संगणकाचा कोर्सच्या वेळी माझी मैत्रीण बऱ्याच जणांना ‘फिरवायची’. तीच्या दृष्टीने तीचा टाईमपास होता. माझा मित्राला देखील तसाच. त्याला समजावलं तर त्याला वाटायचं की, तिच्याबद्दल मी त्याच्या मनात गैरसमज निर्माण करतो आहे. आणि ही जी आहे ना! ही पक्की ‘पुणेकर’ आहे. तासातून एक तरी फोन येतोच तिला तीच्या ‘मित्राचा’. बर तिला विचारलं तर, तो तीचा बॉयफ्रेंड वगैरे काही नाही अस सांगते. काय खर आणि काय खोटे देव जाणे. आणि स्पष्टच बोलायचे झाले तर, मी नेहमी अशा मुलीचा विचार केला जी माझा विचार करेल. ज्या भेटायच्या त्यातील बऱ्याच जणींना आधीच कोणी ना कोणी असायचे नाहीतर, त्यांना खूप फ्रेंड असायचे. आणि त्या सर्वांना त्याच पद्धतीने वागवायाच्या. कोणासाठी मी कधीच स्पेशल नव्हतो. होतो पण माझ्या भाऊ बहिणींसाठी.

ज्यावेळी मी ‘अप्सरा’ला पहिले तेव्हापासून माझे सगळंच बदललं. म्हणजे याआधी अस कधी माझ्यात काहीच बदललं नव्हते. अगदी सकाळी उठण्यापासून ते तीच जिकडे तिकडे दिसेपर्यंत. आणि याआधी कोणी इतके ओळखीचे वाटलेच नव्हते. तिच्याशी बोलतांना अस नवीनच भेटत आहोत अस वाटतच नाही. ती खूप साधेपणाने बोलते. म्हणजे कोणतेच बोलणे नाटकी वाटत नाही.ती सुंदर आहे. मला याआधी कोणतीच सुंदर मैत्रीण नव्हती अस नाही. पण त्या खुपंच नखरे करायच्या. ही एकदम ‘माझीच’ वाटते. त्यामुळे अप्सरावर ताबडतोप विश्वास बसला. यालाच प्रेम म्हणतात की अजून काय वेगळ ते मला माहित नाही. पण ती आल्यापासून रोजचं ती स्वप्नात येते. आणि दुसरा विचार येतंच नाही. आणि ती सोडून कोणाशीच दुसऱ्या विषयावर बोलावं वाटत नाही. सगळ् स्वप्नच वाटत आहे. इतकी कोणी चांगल असू शकत यावरच विश्वास बसत नाही आहे. असो, प्रेम म्हणजे काय असतं.. हे तर नसत?

Advertisements

49 thoughts on “प्रेम

 1. हेमंत,
  तुला डिसकरेज करायला म्हणून नाही पण एक वस्तुस्थिती सांगतो (मी पण त्यावर गेली अनेक वर्षे खुप विचार केला आहे). सध्याच्या मुलींना बाहेरच्या जगाचे एक्स्पोजर मिळते आहे. त्यांना शिक्षण, कामा निमित्त बाहेरच्या लोकांशी संपर्क ठेवावाच लागतो. आणि योग्य तो जीवनसाथी मिळेपर्यंत त्यांच मुलांना जोखणं, चाचपणं चालूच असतं and as groom, we have to accept this fact !! थोडेबहुत मित्र वगैरे असणारंच रे…. त्याला काही पर्याय नाही.
  मलाही फार extrovert मुली पसंद नाहीत. पण ’तुका म्हणे त्यातल्या त्यात……..’

 2. तुझीच नाही तर आजच्या पिढीतल्या बऱ्याच जणांची हीच कहाणी आहे. त्यात नवीन असे काही नाही.

  प्रेम आणि मैत्री ह्यात बोलायचं झाल तर जर्मन फिलोसोफेर निझ्चने छानच सांगितले आहे – ” प्रेम वैगरे सगळे झूट आहे, संसार यशस्वी होतात त्याला त्या जोडप्याती प्रेम कारणीभूत नसते. त्या जोपाप्यात निर्माण झालेली मैत्री त्या यशस्वी संसाराला कारणीभूत असते”.

 3. Dear HEmant.
  I thing u are doing mistek here.Friendship & Loveship are a two different things.
  Myself also agree with u about faith. Because whole world running arround this word, But in real life its very difficult to find a real love.
  The def of love is changes per attitude.Bellive that if ur Love is truth U will got any time in life, withot praying nothing is in our hand.
  Just chill & belive ur love.
  PRAMOD.

 4. kharach hote ase kadhina kadhi aausyat ekdatari,
  agdich achyanak ekhadi vyakti yete aani aaplishi banun jate.
  tya vyakti shivay kahich suchat nahi kadachit hech prem asel ka? he mahit nahi pan he prem asu shakte evdhe matra nakki.

 5. प्रेम हे कराव लागत

  आपल अस कुणिच नसत
  आपलस कराव लागत

  एकदा तरी स्वताहुन
  वादळात झोकायच असत
  नाहिच हाती आल तर
  “त्याच वादळात”
  मनसोक्त मरायला शिकायच असत

  म्हणूनच
  प्रेम हे होत नसत
  प्रेम हे कराव लागत
  आपल अस कुणिच नसत
  आपलस कराव लागत”

 6. aapan atishay changla lekh lihala aahe
  aaplya pramanech ha prashna pratyekalach padala aahe
  karan aaplyala kiti tari muli aawadat astat aani pratyeki barobar aaplyala prem hotach asatat
  mag prem he bhavana pradhan asata ki fakt shariracha aakarshan?

 7. shrimant
  dadasaheb

  Prem he acach aste tuzya ani itran sarkh…………..
  te facta jamle….??????????? cariache ani lakshat theviache…………………

  te mulani kariache ………………….
  taycha mulenshe kahi yek kadi matra sabhand nasto……………………

 8. Hemant sir,
  Mala tari vatat ki Mulinvar pram karan ha aak aaplach gunha aahe .
  Mulli haya Mulanbarobar friendship kartat parantu tya mulana tyancha premat eatke vede karun taktat ki mulana tyachavar prem karavec lagte parantu tya nanter nakar detat tyamule mule hi vavadha pavle ucaltat.
  Tya karita maze aase mat aahe ki Mulane sarv pratam apale carrar gadvave DHANYAVAD.

 9. tumala ek question vicharavasa vatato me mazya eka matriniver khup prem karat hoto me sarkha techakade baghayco ani ticha vichar sarkha manat yaycha pan tila kadhi prapose karayachi himmat ot navati pan ajunahi tichi mala khup athavan yete ti mala parat bhetel ka

  tiche nave sukeshini hote

 10. maazya mate PREM he aayushyat 1da ch pan asa karav ki TYALA kiva TILA aayushyat itar kunakadunahi premachi garaj hi na bhasavi…

  asa mhantat PREM ani MEETH yaat barech saamya aahe..
  MEETH jaast zala tari Ultya hotat aani
  PREM jaast zala tari kordya Ultya hotat
  TARIhi MEETHA shivay jevnala chav nahi, aani PREMA shivay jivnaat LOVE nahi…

 11. prem he prem aste tyamdhe kuthlahi prakaracha swarthi pana nasto v prem he ek pavitra nate aste je sarvana milat nahi love is everithing………….

 12. Hyalach prem mhanat astil tar me pan kartoy prem tichavar ani ti pan mazyawar. Pan me asa eklay ki
  pahil prem he kadhich safal nahi hot ani prem tar fact ekadach hot mag………….. taripan je kharach prem karatat they must go on. Life is so much beautiful with love.

 13. prem he prem aste dusre tisre kahi naste ‘ mazya mate g mulgi aaplya sathi kahihi karu shakte tic mulgi khar prem karte maza anubhav aahe ‘ pan pahile aaplya la aalya sahti var vishvas karava lagte . vishvas karnar nahi tar ti tumcha var prem karnar nahi .
  [prem mache dusre nav VISHAVAS aahe ] mi 8 te 10 zale pan ajun hi mi tichi vat pahat aahe mala vishavas aahe ti time milatach mala call karel
  i am wanting To BHARTI from SANDIP i miss u yaar , i love u p/z call mi

 14. love and friendship is different ,because love is only heart and friendship is heart and mind..explanation
  love apan manatun karto,he true or false but friendship is only true person..

 15. love and friendship is different ,because love is only heart and friendship is heart and mind..explanation
  love apan manatun karto,he is true or false but friendship is only true person..

 16. premachi vakhya krne far awaghad ahe tri pn mazya mate prem mahnje wishwas 2 ghani kadhi todla nahi paje sukh aso dukh satat doghachi sath havi agadi aauyshbhar…. tech khare prem…

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s