पीएम बोले तो..

गाण्याला सुरवात होते. फोनची रिंग वाजते.. ट्रिंग ट्रिंग. ‘हाल्लो.. सार्क परिषदेला आ रेला हू| दहा जनपथ जा रे ला हू| जे जे टाटा आ रेला हू मेरे बाप’. मागे सगळे पंटर लोक गोंधळून हिरोकडे एकटक नजरेने पहात असतात. इकडे फोनवर हीरो ‘अरे अमेरिका आ रे ला हू| अरे किधर किधर.. सुप्रीम कोर्ट होल्ड मॅन होल्ड आय एम बिझी..अं’. मागे सर्किट काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आणि हातातील आदेशाची फाईल घेऊन हिरोकडे पहात असतो. हीरो मागे वळून दाढी कुरवाळतो. आणि चष्मा सावरून आपली नेहमीचीच स्माईल देतो. त्याचा आनंदी चेहरा बघताच सर्व पंटर लोक आनंदाने उद्या मारीत हिरोच्या दिशेने धावत सुटतात. आणि हिरोच्या अंगावर पडतात. हीरो आणि त्याची पंटरची टीम राजघाटावर जाते. जातांना पंटर लोक हातात फुगे घेऊन आणि हिरोच्या मागे अगदी स्टाईलमध्ये जातात.

राजघाटवर पक्षातील स्त्रिया आणि पुरुष कार्यकर्ते हातात पक्षाचा झेंडा घेऊन नाचत असतात. हीरो आपल्या चष्म्यातून डोळे मिचकावतो. आणि हातात झेंडा घेऊन इतर कार्यकर्त्यांसोबत नाचायला सुरवात करतो. आणि म्हणतो ‘एम बोले तो.. बोले तो.. बोले तो.. बोले तो.’. पुन्हा आपले डोळे मिचकावीत ‘एम बोले तो.. मी मास्तर’. पुन्हा आपली पगडी सांभाळीत विरुद्ध बाजूला तोंड करीत ‘बी बोले तो.. बोले तो..बोले तो.. बिंधास डॉक्टर’. आता दोन्ही हात वरती करून पुन्हा ‘बी बोले तो.. बोले तो..बोले तो.. बेमिसाल नेता’ नाचणारे सर्व कार्यकर्ते हे ऐकून ‘हे..’ अशी प्रतिक्रिया देतात. हीरो गडबडून नाचणे बंद करतो. आणि सरळ चालत पुन्हा ‘एस बोले तो..बोले तो..बोले तो..’ मग पुढे काही त्याला सुचतच नाही. विचार करीत तसाच पुढे चालतो तर एक अचानक मध्ये ‘शीला’वान लक्षित हिरोचा गाल पकडून ‘एस बोले तो..’ आणि धक्का देत ‘एस बोले तो (अति)शहाणा कॅरक्टर’. हे ऐकताच आंब्युलेन्सवर बसलेला सर्किट (कर्करोगवाला) जोरजोरात हसू लागतो.

हे पाहून हीरो एक खांदा लचकावीत ‘में सुप्रीम कोर्टका निर्णय सुन लु. में सुप्रीम कोर्ट को निर्णय सुना दु..’ आणि धावत सर्किटच्या दिशेने जात ‘रोते को झटसे हसा दु’ म्हणत ‘हात’ देवून सर्किटला आंब्युलेन्सवरून खाली उतरवतो. आणि ‘हसते को फट से रुला दु’ असे म्हणून ‘थरुरनाऱ्या कार्यकर्त्याच्या गालावर चिवचिवाट करतो’. आणि ते पाहून हसणारा तो रडायला लागतो. मग पुढे जाऊन एका छोट्या भिंतीवर पाय ठेवत ‘हे…. स्टाईल.. मेरा स्माईल..||’ बाजूने रिक्षा चाललेली असते. ती बाजूला येऊन थांबते. आणि त्यातून एक गोरीपान पोरी बाहेर पडतात. इकडे सर्वच कार्यकर्ते त्यात हीरो सुद्धा त्यांना पाहतो. आणि म्हणतो ‘ना कर दे दिल तेरा क्रॅक क्रॅक क्रॅक’. ‘क्रॅक’ शब्द एकताच एक गोरीपान ‘किटली’ मागे वळते आणि हिरोच्या गालावर हात फिरवत ‘उह..व्हाटस युअर नेम?’. इकडून एक मासा घेतलेली मुलगी ‘तुझा नाव काय रे?..’. हीरो हसत ‘माय नेम??’ नाक दाबत ‘माहित नाही काय?’. आणि मागे वाकून जात ‘मुन्नाभाई एमबीबीएस…….’ सगळे झेंडे हवेत नाचवत ‘मुन्नाभाई एमबीबीएस…….’ म्हणू लागतात.

मग शिट्यावर नाचत कार्यकर्ते हिरोला हार घालतात. मग हीरो कला डगला घालून ‘मेरी डिग्री ए वन..’. सगळे म्हणतात ‘ढासू बडी’..हीरो ऐकून’ए क्या बोलाss’. मग हीरो समोरून मुली लाजत, लचकत जात असतात. हीरो त्यांना पाहून ‘मेरी मिनिस्ट्री बनेगी’.. सगळे म्हणतात ‘सोनी’ कुडी. हे ऐकताच मागून सर्किट टोपी घालून ‘ह्म्म्मssss’ म्हणतो. पण त्याचा आवाज पुढे निघतच नाही. मग त्याचे वाक्य हीरो पूर्ण करत म्हणतो ‘हर तरफ करप्शन का माहोल होगा’. हे ऐकताच सर्किट ‘सब बिल पे कंट्रोल होगा’. हीरो पगडी काढत ‘देखकर हमको दुनिया जलेगी..’. इकडे सर्किट अन्नाच्या टेबलावर पाय ठेवत ‘पर अपनी लाईफ मजे में चलेगी.’. हीरो एका पांढऱ्या रंगाच्या कबुतराला उचलत ‘सपना ये अपना.. ना होगा ब्रेक ब्रेक …’. गच्चीतून एक भगव्या आणि लाल रंगाची साडी घातलेली एक बाई म्हणते ‘अर्sरssss, थारू नाम की छे?’. तिकडे कर्नाटकी एक स्त्री ‘ए वड दे इंदा?’. इकडे हीरो गडबडून ‘मारू नाम?’. कर्नाटकी स्त्रीकडे जात एका शोकाकुल मुलाच्या कानाखाली देत ‘एंड रास्कला..’ म्हणून पुन्हा ‘मुन्नाभाई एमबीबीएस…….’.

नाचत नाचत एक स्टेजवर एक क़्वात्रोची इंग्लिश गाण्यावर नाचत असतो त्याला हटवत हीरो आपला मराठमोळा डान्स करतो. पुढे हीरो एका पेशंटला एक फुगा देत ‘दिन में दास बीस फ्रॉडपास’ बाकीचे कार्यकर्ते म्हणतात ‘अरे नो टेन्शन’. हीरो हसत ‘मस्का हे बाप..’ ‘भूल जाऊंगा भूक प्यास..’ म्हणत मिठाई खात. तिकडे सर्किट गाडीवर आंब्युलेन्सवर उभा राहून ‘होंगी डॉलरमें अपनी कमाई या’. खाली हीरो ‘रंग लायेंगी अपनी पॉलिसीया’. पुन्हा सर्किट ‘खुद भी खाऊगा, अपनोको खिलाउंगा’. गाडीत बसून हीरो ‘में आम जनता को डिस्को कराउंगा’. पुन्हा हीरो ‘नये बाग में, किसी राग में, नाचे झुमे गायेगा हम’. ‘किसी बार से, नयी कार से बियर पिके आयेगा हम’. ‘हो कुडिया, फुल झाडिया.. दिल अपना टू चेक?’ म्हणत पोरींसोबत नाचत असतो. तेवढ्यात एक बंगाली लाल बावटे बाई ‘तोमर नाम की?? बोले तो..’. दुसरी एक पंजाबी कुडी ‘दास्सो नाम?? तोरा नाम तो दास्सो?’. हीरो ‘आमार नाम?, सद्डा नाम???’ मुन्नाभाई एमबीबीएस…….ssss’.

Advertisements

One thought on “पीएम बोले तो..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s