दुरावा

माफ करा, मी स्वतःला नाही ‘आवरू’ शकत. आजकाल रोजच नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत. कालपासून तिची जागा बदलली. आता ती तिच्या मैत्रिणीच्या आणि त्या तिच्या सिनिअरच्या क्यूबमध्ये बसते. मला ना, काहीच सुचत नाही आहे. आता मी तिच्या सोबत कसा बोलू. म्हणजे आधी ती माझ्या डेस्कच्या जवळच तिचा डेस्क होता. त्यामुळे येता जाता तिच्याशी बोलायची आणि तिला पाहण्याची संधी मिळत होती. पाणी आणायला जातांना सुद्धा जायची. पण आता ते सुद्धा नाही.

तसे कालपासून मी तिच्याशी कम्युनिकेटर वर आता गप्पा मारतो. पण त्याने काय होणार. काल तिने मला एक मेल पाठवला होता. खूप छान वाटल. पण नंतर ती डेस्कवर नाही. म्हणून मग ती गेली कुठे तेच कळेना. ती नाही म्हणून मी खूप वैतागलो होतो. मग राग इतका वाढला ना. आणि कोणीही सापडेना राग काढायला. माझ्या बहिणीला फोन केला तर तिने उचलला नाही. मित्राला केला. आणि त्यावर पिल्लू कारण देऊन त्यावर राग काढला. ती नसली की, वेळ जाताच नाही. आणि कशात मन सुद्धा लागत नाही. खर तर तिचा विषय सोडून कोणत्याच विषयावर मी आजकाल बोलतच नाही. म्हणून मग मी फोन करत बसतो. जातांना ती ऑनलाईन पण बिझी स्टेटस.

मग न राहून तिला पिंग केल. ‘बाय’ करायचे होते. पण ‘हाय’ करून बसलो. मग पुन्हा सॉरी बोलून ‘बाय’ केल. तिने बाय केल्यावर मला ‘तुला कळलेच असेल की माझी जागा आता बदलली आहे’ अस म्हणाली. मी ‘कधी?’ विचारल्यावर म्हणाली ‘आजपासून’. यार शुक्रवार ते रविवार सुट्टी होती. सोमवारी ती आलीच नव्हती. आणि काल आली तर जागा बदलली. खर तर अस म्हटल्यावर अजूनच बोर झाल होत. पण मी अस शांत बसलो असतो तर तिला शंका आली असती, म्हणून मी तिला ‘वा वा!’ अस म्हटले. ती ‘काय वाह?’. मला म्हणाली ‘मला ही जागा बिलकुल आवडत नाही’. काय सांगू किती आनंद झाला होता. माझ्या मनातल बोलत होती. तिला मी आपल ‘आता दिवसभर फेऱ्या मारायला नको, छान झाल’ अस म्हटलं. दोघांनी रडून काहीच फायदा नव्हता, म्हणून म्हटलं. आणि तिला ती जागा आवडत नाही. पण माझ्याकडे काहीच कारण नव्हते, म्हणजे तिला कस म्हणू की मला तू खूप आवडतेस, तू माझ्यापासून दूर नको जाऊ म्हणून.

त्यावर ती म्हणाली ‘हे पण एक आहे. पण इथं खूप गोंधळ असतो’. तिला मी म्हटले ‘हो, ते सुद्धा आहे. पण तू जागा का बदललीस?’. ती म्हणाली ‘त्यांनी मला फोर्स केल’. आता ही सुद्धा ना. मला माहिती आहे. कोणी केले असेल. तीच तिची कार्टून सिनिअर. तिला म्हटलं ‘आणि लगेचच हो म्हटलस?’. ती म्हणाली ‘त्यांचा तसा आदेश होता’. मग खर तर तिचा राग आलेला. रागात ‘वा ग्रेट, पण हे चुकीच आहे’ अस म्हटलं. तिने ‘का?’ विचारल्यावर ‘तुला ते सीट मॅप केलेलं आहे का?’ अस विचारलं. ती बहुतेक कंटाळली होती, म्हणून मग ‘हो रे, तू निघणार नाही?’. खर तर मी तिला बाय म्हणण्यासाठी पिंग केल होत हेच विसरून गेलेलं. मग डोक ठिकाणावर आल. काल मी माझ्या जुन्या मित्राच्या घरी गेलो होतो. आणि जातांना आधी जुन्या कंपनीत सुद्धा.

असो, तिथेही ‘वू वू’ झालेलं. काल रात्री, तीनपर्यंत झोपच आली नव्हती. खरच आता काय करू हेच सुचत नाही आहे. आता हे देखील खर आहे की सगळ्यांना या विषयात कंटाळा आला आहे. पण हेच माझे जीवन आहे. कदाचित नाविन्य नसलेले, आणि काही मोठे बदल घडत नसतील. पण ती माझ्यासाठी खूप ‘स्पेशल’ आहे. ती सोडून काहीच नाही. विचारात, स्वप्नात, बोलण्यात तीच आहे. तिचा हा दुरावा माझ्यासाठी इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा खूप जास्त महत्वाचा आहे. कदाचित राग येईल पण, मी ती सोडून नाही दुसरा विचार नाही आणू शकत. माझे हे  बोलणे, वागणे आणि हा ब्लॉग देखील ‘बुल शेट’ वाटत असेल. कदाचित मीच ‘बुल शेट’ वाटत असेल. पण मी खूप वेडा आहे. अस मानून माझ्या चुका क्षमा कराल अशी अपेक्षा करतो.

Advertisements

3 thoughts on “दुरावा

  1. हेमंतराव, तुम्हाला एक कथा सांगायची आहे मला. सांगेन कधीतरी. पण आता मात्र घाई करा राव. मी तुमचे सर्व लेख वाचतो. अजूनपर्यंत काही प्रगती केली नाही हो तुम्ही. लवकर करा. शुभेच्छा….

  2. या जगात केवळ दोन गोष्टी असतात.. १. ज्या आपल्या आहेत २. ज्या आपल्या नाहीत. आणि हे आपल्याला स्विकारायलाच हवं. पण कोणती गोष्ट आपली आहे!? आणि कोणती गोष्ट आपली नाही!? हे ओळखायचं कसं!? अशावेळी तू तुझ्या आणि तिच्या बाबतीत घडणार्‍या चांगल्या वाईट योगायोगांचा विचार करु करु शकतोस. जर चांगले योगायोग अधिक असतील तर ती तुझी आहे, आणि वाईट योगायोग अधिक असतील, तर समजून घे की, देवाची अशी ईच्छा नाहीये. तेंव्हा आपण विचार करुन करुन स्वतःचे शारिरीक आणि मानसिक हाल करणं व्यर्थ आहे.

    सांगणं कधीही सोपं असतं.. जावे त्याच्या वंशी तेंव्हाची कळे.. तेंव्हा फक्त इतकंच म्हणेन की, स्वतःची काळजी घे..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s