सुगंध

आता ‘बूट’ला मराठीत काय म्हणतात माहित नाही. मराठी भाषेत ‘पादत्राणे’ अस म्हणतात की काय? की ‘पादुका’? अस काही तरी म्हणत असतील. किती महत्वाचे असतात याची जाणीव आज होते आहे. जर ते चांगले असतील तरच.. नाहीतर आज मी तेच अनुभवतो आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे ‘न’ पॉलिश केलेल्या. आणि न धुतलेले मोजे घालून माझी स्वारी आज सकाळी घरातून निघाली.

खर तर, धुतलेला एकही मोज्याचा जोड नव्हता. कंपनीच्या बससाठी स्टॉपवर आलो. ‘परीवाहिनी’ दिसल्या. कृपा करून काहीच अर्थ काढू नका. त्या बससाठी आल्या होत्या(माझ्यासाठी नाही). त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. बोलतांना त्यांना ‘सर्दी झाली आहे का?’ अस विचारल्यावर त्या हो म्हणाल्या. बसमध्ये बसल्यावर मला तो ‘सुगंध’ हळू हळू यायला लागला. बहुतेक फक्त मलाच येत होता. कारण कोणातच ‘बुजगावणं’ हालाल नाही. ना ढुंकून मला बघितले नाही. ती फक्त नेहमीचीच फक्त ‘मिस्ट्री’च प्रेक्षक. पण तिच्याही वागण्यातही फरक जाणवला नाही.

खूप वेळ विचार केला की, नेमका माझ्या नाकातच गडबड आहे का?, तो ‘सुगंध’ मलाच का येतो आहे. बसमधून उतरतांना मित्राचा फोन, की कॅन्टीनमध्ये ये. कंपनीत आल्यावर, तसाच मागे फिरावं आणि मोज्याचा नवीन जोड घ्यावा का? असा विचार घोळत होता. पण शिरलो तसाच. ‘स्वाप’ करावं म्हणून मी त्या मेन दरवाज्यासाठी चाललेलो तर ‘अप्सरा’चे दर्शन झालं. आज, सोडा काय छान! लाल रंगाच्या ड्रेसमध्ये. तिने तो ड्रेस नको घालायला. नाहीतर हार्टअटॅक येण्याची शक्यता खूप वाढते ना! कसाबसा सावरून मित्राकडे गेलो. त्याला विचारलं तुला तो सुगंध येतो आहे का. तर तो देखील येतो आहे अस म्हटला.

पण मी विषय काढल्यावर बोलला. नाश्ता झाल्यावर डेस्कवर आलो. पाणी घ्यावे म्हणून पॅंट्रीमध्ये गेलो. मनात विचार तिचाच येत होता. वाटल होत जर आली तर.. नाक दाबावे लागेल तिला. आणि विचार करायला आणि ती यायला. झालं! आता वाजल. माझी हिम्मत होत नव्हती तिच्याकडे पाहण्याची. कारण तो सुगंध. पण मग तसंच ‘हाय’ केल. आणि तिनेही ‘हाय’. सहा दिवसांनंतर आज आमचे बोलणे झाले. नाहीतर इतके सगळ ‘व्हर्चुअल’ होत. लगेचच सटकलो. काय माहित तिला तो सुगंध आला की नाही. डेस्कवर आल्यावर काय करावं सुचत नव्हते. जावून नवे मोजे घ्यावे अस ठरवलं. पण तितक्यात ‘अप्सरा’ माझ्या डेस्क जवळून गेली. हे सुद्धा सहा दिवसानंतर घडलेलं. आजकाल तिची ती नेमप्लेट पाहण्यातच समाधान मानतो.

तसाच मित्राची बाईक घेऊन मोजे आल्याला गेलो. तेथून मग फायनान्स मध्ये गेलो. आणि पुन्हा कंपनीत आलो. खूप खुश होतो. वाटल होत आज तिच्याशी ती घरून कधी कशी आली हे विचारावे. पण फ्लोरवर येतांना पुन्हा सुगंध. मित्राच्या डेस्कवर गेलो तर, त्यालाही आणि मलाही सुगंध यायला लागला. मग प्रॉब्लेम बुटात आहे, हे लक्षात आल. मग काय, खूप वेळ डेस्कवरून इकडे तिकडे फिरलो. दुपारी कॅन्टीनमध्ये गेलो तर तिचे जेवण झालेले. आणि मी कुपनसाठी रांगेत आणि ती निघालेली. असो, हे मित्र ना. उद्यापासून मी एकटा जावू की काय अस विचार करतो आहे. ते खूप उशीर करतात जेवायला जायला. आणि त्या नवीन कॅन्टीनमध्ये तिच्या एका झलकसाठी मी जात असतो. आणि ती नसेल तर काय फायदा?

असो सोडा ते. आज लवकर निघावं म्हटलं तर, माझ्या संगणकावर तो एक कार्टून आलेला. त्यामुळे पाचची बस चुकली. मग आता तो भयानक सुगंध सहन करीत बसलो आहे. यार तो सुगंध इतका वाढला आहे ना! दुसर्या कोणाला येत नाही हे नशीब म्हणायचे. कोमात जातो की काय अस वाटायला आहे. आजचा दिवस मोजे आणि बूट किती महत्वाचे असतात याची खात्री पटली. वेळाही जात नाही आहे. कधी घरी जावून हे बूट काढून फेकतो अस झालेलं आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s